डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांना `Buddha And His Dhamma` या अनमोल ग्रंथाची टंक लिखित प्रत भेट दिली होती. आणि हा ग्रंथ सरकार तर्फे छापण्यात यावा अशी सूचना केली, परंतु सरकार तर्फे लाखो रुपये कुंभमेळ्यासाठी देणा-या नेहरुने ग्रंथ छापणे ही खर्चिक बाब आहे म्हणून छापण्याचे नाकारले होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दि.२४ ऑक्टोबर १९५१ रोजी सकाळी ७ वाजता `Buddha And His Dhamma` हा आपला जीव की प्राण असलेला अनमोल ग्रंथ इंग्रजी मधून लिहिण्यास सुरूवात केली.जगात जेवढे म्हणून धर्माच्या बाबतीत विचारवंत होऊन गेले आहेत, त्यांनी सर्वांनी मिळून जेवढी धार्मिक पुस्तके वाचली असतील त्यांच्यापेक्षाअधिक पुस्तके बाबासाहेबांनी वाचली आहेत. तसेच त्या त्या धर्माच्याधर्मपंडीता बरोबर धार्मिक विचारांच्या बाबतीत समोरा समोरचर्चा करण्याची बाबासाहेबांची तयारी होती. एवढे त्यांचे सर्व धर्मांचे संदर्भासहीत अफाट ज्ञाण होते.बुध्द धम्माच्या बाबतीत सुध्दाबाबासाहेबांचे तर मॅट्रीक पासूनच वाचन सुरू केले होते. त्यांनी जगातील बुध्द धम्माचे जे उपलब्ध साहित्य होते त्रिपीठकासह ते सर्व वाचून काढले होते. त्यांचे चिंतन मनन करुन व त्या सर्वांचा अर्क काढून एक शुध्द ग्रंथ लिहिला. त्यासाठी त्यांनी आपल्या जीवाची, तब्बेतीची काळजी न घेताजो अनमोल ग्रंथ लिहिला व जो आपला जीव की प्राण असलेला ग्रंथआहे तो म्हणजे `बुध्द आणि त्यांचा धम्म` होय.बाबासाहेबांनी लिहीलेल्या अनेक अप्रतीम ग्रंथांपैकी ही त्यांची शेवटची रचना होती.हा ग्रंथ लिहीतांना त्यांच्या समोर संपूर्ण त्रिपिटक होतं. सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. प्रत्येक पिट्कात आणखी १०-१२ ग्रंथ तसेच या सर्व ग्रंथावर आधारीत अनेक अर्थ कथा होत्या, अनेक प्रकारचेबुध्द चरित्र संबंधित साहित्य होतं. बुध्दांसंबंधी जगत जेवढे म्हणून महत्वाचे साहित्य उपलब्ध होते या सर्व वाड्मयातुन त्यांना एक अशा ग्रंथाची रचना करायची होती ज्यात संपूर्ण बुध्द चरित्र त्याची शिकवण समाविष्ट होईल आणि त्याची भाषा सर्वसामान्यांनासमजायला सोपी असेल.हा ग्रंथ एकुण आठ काण्डात विभागला आहे. प्रत्येक काण्डात ७-८ भाग आहेत. प्रथम काण्ड बुध्दजीवन कथेनी व्याप्त आहे.
उर्वरित काण्डात धम्म दीक्षा, त्यांच आंदोलन, धर्म-धम्म, धर्म-अधर्म आणि त्यांच्या समकालीन विचारंबद्दल लिहीण्यात आले आहे. "जे विचार बुध्दी संगत आहेत, जे विचार तर्क संगत आहेत तेच बुध्द विचारआहेत" अशी बुध्द विचारांची अतिशय सोपी आणि समर्पक व्याख्या बाबसाहेबांनी या ग्रंथात मांडली आहे.दि.५ डिसेंबर १९५६ या दिवशी"Buddha And His Dhamma" या अनमोल ग्रंथाची प्रस्तावना लिहून पूर्ण केली.मूळ इंग्रजी ग्रंथ सिध्दार्थ कॉलेज पब्लीकेशन मुंबई यांनी १९५७ मध्ये प्रकाशित केला होता."Buddha And His Dhamma" या अनमोल ग्रंथाचे सर्व प्रथम इंग्रजी मधून हिंदी भाषेत अनुवाद डॉ. भदंत आनंद कौसल्यायनयांनी केले. सिध्दार्थ प्रकाशन मुंबई यांनी ते १९६१ मध्ये प्रकाशीत केले. त्याचे सर्वाधिकार पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई यांच्या कडे होते.त्यानंतर "Buddha And His Dhamma" या अनमोल ग्रंथाचे इंग्रजी किंवा हिंदी भाषेमधून सर्व प्रथम मराठी भाषांतर सुध्दा सिध्दार्थ प्रकाशन मुंबई यांनीच प्रकाशीत केले. त्याचे सर्वाधिकार पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई यांच्याकडेच होते.आता मात्र हा "Buddha And His Dhamma" अनमोल ग्रंथ भारतातीलआणि जगातील अनेक प्रकाशाकांकडून व भारतातील आणिजगातील अनेक भाषांमध्ये भाषांतरीत झाला आहे, होत आहे आणि होणार आहे .

No comments:
Post a Comment