बौद्ध धम्मग्रंथ : त्रिपिटक

***  त्रिपिटक परिचय ***
====================
       आज जगात विविध धर्म आणि विविध संप्रदाय आहेत. त्यांचे धर्मग्रंथ म्हणुन ओळखले जाणारे त्यांचे स्वतःचे एक एक ग्रंथ सुद्धा आहेत.
यहुदींचे बायबल (जुना करार), इस्लामचे कुरआन, ख्रिश्चनांचे बायबल (नवा करार), हिंदुंची गीता, वैदिकांचे वेद, शिखांचे गुरु ग्रंथ साहीब, इत्यादी, इत्यादी.
     या सर्वांचा विचार करता बुद्धाचा धर्म कोणत्या धर्मग्रंथाद्वारे सांगण्यात आलेला आहे असा आपल्याला प्रश्न पडतो.. काही बौद्धांचा धर्मग्रंथ म्हणून त्रिपिटकाचा उल्लेख करतात. परंतु या त्रिपिटकाचा आवाका पाहू जाता सरळ आणि सोपे एकच उत्तर मिळेल ते म्हणजे बुद्धाच्या धर्माचे धर्मग्रंथ म्हणण्यासारखे एकही पुस्तक नाही तर संपुर्ण ग्रंथालय आहे. कारण त्रिपिटक या नावाने ओळखले जाते ते काही एकच पुस्तक नाही आहे, तर विविध ग्रंथांचा तो ग्रंथ संग्रह आहे. या लेखामध्ये आपण बौद्ध साहित्याची व्याप्ती आणि थोडक्यात परिचय याबद्दल जाणुन घेऊया...
धम्माचे मुळ ग्रंथ त्रिपिटक तीन भागात विभागले आहे.
१.    विनयपिटक,
२.    सुत्तपिटक,
३.    अभिधम्मपिटक
१.     विनयपिटक
    विनयपिटकामध्ये सामान्यतः
(अ)   महावग्ग
(ब)    चुलवग्ग
(क)   पाराजिक
(ड)    पाचित्तिय
(इ)    परिवार.
या पाच ग्रंथांचा समावेश आहे.
२.   सुत्तपिटक
    सुत्तपिटकामध्ये पाच ग्रंथांचा समावेश होतो.
(अ)  दिघ निकाय - ३४ सुत्त,
(ब)   मज्झिम निकाय - १५२ सुत्त
(क)  संयुत्त निकाय - ७७६२ सुत्त
(ड)   अंगुत्तर निकाय - ९५५७ सुत्त
(इ)   खुद्दक निकाय - खुद्दक
निकायामध्ये सुत्तांऐवजी १५ ग्रंथांचा समावेश होतो. ते पुढील प्रमाणे :
१.    खुद्दकपाठ
२.    धम्मपद
३.    उदान
४.    इत्थिवत्थु
५.    सुत्तनिपात
६.    विमानवत्थु
७.    पेतवत्थु
८.    थेरगाथा
९.    थेरीगाथा
१०.  जातक
११.  अपदान
१२.  निद्देस
१३.  पटिसंभिदामग्ग
१४.  बुद्धवंश
१५.  चरियापिटक
३.  अभिधम्मपिटक
        अभिधम्मपिटकात प्रामुख्याने सात ग्रंथांचा समावेश आहे.
१.   धम्मसंगणि
२.   विभंग
३.   धातुकथा
४.   पुग्गलपञती
५.   कथावत्थु
६.   यमक
७.   पट्ठान
     पाली त्रिपिटकाशिवाय पाली वाङ्मयामध्ये पाली अनुपिटकांचाही समावेश होतो. अनुपिटक म्हणजे त्रिपिटकाच्या रचनेनंतर रचण्यात आलेले साहित्य.
पाली अनुपिटक :
१.   नेत्तिपकरण
२.   पेटकोपदेश
३.   मिलिंद प्रश्न
४.   विसुद्धीमग्ग
५.   अट्ठकथा
६.   टिका
दीपवंस, महावंस, चुळवंस, बुद्धघोसुप्पति, सद्धम्मसंगह, महाबोधिवंस, थूपवंस, गंधवंस, सासनवंस, अनागतवंस, बुद्धालंकार, जिनालंकार, तेलकटाहगाथा, जिनचरित, सद्धम्मोपाय, पञगतिदीपन, सहस्सवत्थुपकरण इत्यादी ग्रंथांचा समावेश पाली अनुपिटका विनयपिटक,सुत्तपिटक,विनयपिटक,अभिधम्मपिटक,मध्ये होतो.
पाली त्रिपिटकाची व्याप्ती खुप मोठी आहे, जर आपण त्यांचा संग्रह केला तर ५०० पेक्षा जास्त पानांचे एक खंड अशाप्रकारे १४५ पेक्षा जास्त खंड बनतील. शिवाय त्रिपिटकाच्या अट्ठकथा, टिका यांची व्याप्ती मुळ त्रिपिटकापेक्षाही जास्त आहे.
     याशिवाय तिबेटियन साहित्याचे ३३७ खंड,  चिनी साहित्याचे प्रत्येकी १००० पानांचे १०० खंड.  याखेरीज मंगोलीय आणि जपानी साहित्यांचा विचार केल्यावर आपल्याला बौद्ध साहित्याची व्याप्ती किती मोठी आहे याचे अनुमान लावणे कठीणच आहे.
     आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व ग्रंथांचा अभ्यास करून तथागत भगवान बुद्धांना अपेक्षित असलेला मानव कल्याणकारी, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा "भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म" हा ग्रंथ आम्हाला दिला.
    हा ग्रंथ, ८खंड, ३९भाग, २५४प्रकरण, ४४६पाने, ५०२०ओळींमधे सामावलेला आहे.
जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा.
नमो बुध्दाय! जय भिम !

No comments:

Post a Comment