" मे 1956 मध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्हाॅइस ऑफ अमेरिका ह्या संस्थेने योजिलेल्या एका वादमालिकेत "भारतातील लोकशाहीचे भवितव्य"ह्या विषयावर भाषण केले.त्यात ते म्हणाले, 'लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे.लोकशाहीची मुळे सरकारी पद्धतीत, संसदीय किंवा दुस-या कोणत्याही पद्धतीत नसतात.
→लोकशाही म्हणजे सहजीवनाने राहण्याची एक पद्धती.
→लोकशाहीची मुळे सामाजिक संबंधांत
शोधावयाची असतात.
→जे लोक तो समाज बनवतात
त्यांच्या सहजीवनाच्या संदर्भात तिची मुळे शोधावयाची असतात.
हिंदी समाज हा जातिभेदावर अधिष्ठित आहे.आणि जाती या अलग असतात.भारतातील मतदान आणि उमेदवारांची निवड ही जातिनिष्ठेनेच करण्यातयेते.उद्योगधंद्यात उद्योगपतींचे जातभाईमोठया अधिकाराच्या जागा बळकावतात.मोठमोठी व्यापारी घराणी हे एकाच जातीचे संघ आहेत.
धर्मादाय पद्धतीसुद्धा जातिनिष्ठ आहे.
जातिसंस्था ही तिरस्काराची उतरंड आहे.
जात आणि वर्ग यात फरक असा आहे की जातिपद्धतीत जितका अलगपणा असतो तितका वर्गपद्धतीत नसतो.
भारतीय समाजाच्या खालच्या थरातील लोकांना जातीव्यवस्था मोडावयाची आहे,
खालच्या थराला जर तुम्ही शिक्षण दिलेत तर ही जातिव्यवस्था मोडून पडेल.
आजकाल अमेरिकन सरकार आणि भारतीय सरकार शिष्यवृत्त्या देऊन शिक्षणाला जी भरमसाट मदत करीत
आहेत ते शिक्षण जातिव्यवस्था बळकट करणार आहे.ज्यांना जातिव्यवस्था मोडावयाची आहे
त्यांना शिक्षण दिले तर भारतात लोकशाहीचे भवितव्य उजळेल.आणि लोकशाही सुरक्षित राहिल.भारतीय
लोकशाहीच्या भवितव्याविषयी विचार करणा-या शिक्षणतज्ञांना नि नेत्यांना हे भाषण चिंतनिय
वाटेल.

*संदर्भ:डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
*लेखक:धनंजय किर.
*लेखक:धनंजय किर.
No comments:
Post a Comment