धम्म आणि धर्म


'धम्म' या पाली शब्दापासूनच धर्म हा संस्कृत शब्द आल्याचे काही पुरावे भाषाशास्त्रामध्ये सापडतात.
पाली भाषा ही बोलीभाषा म्हणून बुद्धाच्या काळात प्रसिद्ध होती.
पाली भाषेतून बुद्ध धम्मातील अनेक ग्रंथ रचण्यात आले होते. त्याकाळात हिंदूंचा म्हणण्यासारखा एकही ग्रंथ
लिहिण्यात आला नव्हता.नंतरच्या काळात पाली भाषेतूनच हिंदू संहिता रचण्यात आल्या. हिंदूंची ग्रंथे
लिहिण्यात आले. आणि तो काळ अगदी अलीकडचा काळ होता. इ.स. ४ थे शतक ते इ.स. १२ वे शतक या दरम्यान हिंदूंची अनेक ग्रंथ रचण्यात आली आहेत. हिंदूंनी त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासा ठी 'धर्म' स्थापन केले. चौकटबद्ध जीवनाची आधारशीला म्हणजे 'धर्म'.मानवाला एका विशिष्ट चौकटीत विभाजित करून त्यांना त्यांचे मर्यादित हक्क व अधिकार बहाल करणारी संहिता म्हणजे 'धर्म'.
बुद्धीला गहाण ठेऊन डोळे बंद करून 'धर्माची संहिता' पालन करावयास लावणारा फतवा म्हणजे 'धर्म'.
पण मुळात 'धम्म' आणि 'धर्म' या शब्दांमध्ये मोठा फरक आहे. 'धम्म' म्हणजे अशी व्यवस्था ज्या व्यवस्थेत
प्रत्येकाला मानवी स्वातंत्र्य बहाल करून बंधनमुक्त जीवनातून मानवी विकासाच्या सर्व पातळ्या खुल्या करून दिल्या जातात.
मानवी विकासाच्या प्रक्रियेत समाविष्ठ असलेला असा समूह जो प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यक्तीला त्याच्या विकासाचे स्वातंत्र्य बहाल करतो. त्याला 'धम्म' असे म्हणतात.
मानवी बुद्धीला,तत्वचिंतनाला महत्व देऊन कुठल्याही चौकटीविना, बंधनाविना,अडथड्याविना विकासाची संधी बहाल करण्यासाठी एकत्र आलेला समूह म्हणजे 'धम्म'.'धम्म' आणि 'धर्म' या दोन शब्दांमध्ये गफलत
करणा-या विद्वानांनी जरा त्यांच्या 'धर्म' प्रेमाला आवर घालावा. तुमचा धर्म प्रेम फेसाळलेल्या समुद्रासारखा उतू जात असेल
मनूच्या गर्भात शिरून तुम्ही वाटेल तो नंगा नाच केला तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही.
"अबला नारी, ताडण के अधिकारी" या संदेशाला तुम्हीच तुमच्या शिरावर कोरून ठेवा. पण त्यासाठी तुम्ही बुद्धाच्या नैतिक तत्वज्ञानाला,भाषेची जननी पाली भाषेला,बुद्धाच्या वैश्विक धम्माला हिंदूंशी जोडण्याचा प्रयत्न
करत असाल. तर तो फसवा प्रयत्न बुद्धिवादी माणसे असेपर्यंत शक्य होणार नाही हे लक्षात घ्या !

धम्माचा संदेश "भवतु सब्ब मंगलम" हाच संदेश

आमच्या धम्माचा आधारस्तंभ आहे.तो राहील. तुमचे अस्तित्व संपेपर्यंत हा वैश्विक विचार जगाच्या शिखरावर कोरलेला असेल. एवढे मात्र ध्यानात ठेवा.

लेखक : धम्म मित्र  प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर.

No comments:

Post a Comment