बाबासाहेबांचे सुविचार

* दैवावर भरवसा ठेऊन वागू नका,जे काम करावयाचे असेल ते आपल्या मनगटाच्या जोरावर करा

* आत्मोद्धार हा दुसर्याच्या क्रुपेने होत नसतो तो ज्यांच्या त्याने करायचा असतो.

* विचारक्रांती झाल्याशिवाय आचारात फेरबदल होवू शकत नाही. आचारात फेरबदल करावयाचा झाल्यास    आधी मनावर बसलेल्या जुन्या विचारांची छाप काढून टाकने अगदी आग्त्याचे आहे.

* धर्म हा मनसाकरिता नसून माणूस हा धर्माकरीता आहे.

* तिरस्कारनीय गुलामगीरी आणि अमानुष अन्याय यांच्या गर्गेत पिचत पडलेल्या ज्या समाजात मी जन्मास  आलो आहे.त्या समाजाची गुलामगिरी नष्ट करण्यात जर का मी अपयशी ठरलो, तर स्वत:स गोळी घालीन.

* भावी पिढीला आजच्या गुलामगीरीचा मागमसही दिसणार नाही,अशी अलौकिक स्वार्थत्यागाची कामे अगदी  निर्भयपणे करावयास तुम्ही सज्ज झालात की,माझ्या कार्याची जबाबदारी आपोआपच पार पाडण्याचे पुण्य  तुमच्या पदरात पडेल.

* स्वातंत्र्याचे हक्क भीक मागून मिळत नसतात,ते स्वसामर्थ्याने सन्पादवायचे असतात,देणगी म्हणून ते  लाभत नसतात.

* ज्याप्रमाणे कोणत्याही राष्ट्राला दुसर्या राष्ट्रावर राज्य करण्याचा अधिकर नाही,त्याप्रमाणे कोणत्याही एका विशिष्ट वर्गाला दूसर्या वर्गावर अधिसत्ता गाजविन्याचा अधिकार नाही.

* ज्या राष्ट्रांत माझ्या अस्पृश्य बांधवांची माणुसकी धूळीप्रमाणे तुडविली जात आहे, ती माणुसकी मिळण्यासाठी या राष्ट्राचे मी कितीही नुकसान केले तरी ते पाप न ठरता पुण्यच ठरणार आहे.

* माझा जन्म सर्वसाधारण जनतेची जबाबदारी घेण्यासाठी असावा.

* तुम्ही आपली गुलामगिरी नष्ट करा.स्वाभिमान शुन्यतेचे जीवन जगणे नामर्दपनाचे आहे.

* आपण मला देवपदाला चढवू नका.एखाद्या व्यक्तीला देवपनाला चढवून इतराने आंधळेपनाने त्याच्या मागे  धावत जावे,हे मी तरी कुम्कुवतपनाचे लक्षण मानतो

No comments:

Post a Comment