Showing posts with label babasaheb. Show all posts
Showing posts with label babasaheb. Show all posts

बाबासाहेबांनी स्त्रीयांसाठि काय केल

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जातिधर्मातील समस्त स्त्रीवर्गाच्या समग्रमुक्ती व उद्धारासाठी हिंदूकोडबिल नावाची एक आदर्शसंहिता निर्माण करून स्त्रीवर्गाच्या समग्रमुक्तीची आशा बाळगली.
त्यात त्यांना स्त्री-पुरुषात समानता निर्माण करून मुलांच्या बरोबरीने मुलींनाही वारसाहक्क देऊन वडिलाच्या संपत्तीत समान वाटा,पुरुषाप्रमाणे स्त्रीलाही घटस्फोट मागण्याचा हक्क अशी तरतूद केली.
बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महापुरुषाने २५ डिसेंबर १९२७ रोजी विषम, अन्यायी मनुस्मृतीचे जाहीर दहन केले. ती एक प्रतिकात्मक कृती होती. ग्रंथ जाळून मनातील जळमटे जाळता येत नाहीत, हे त्यांना माहीत होते म्हणून तो एक जाहीर निषेध व अन्याय, अत्याचार,विषमता याबद्दलचा मानसिक संताप होता.
मनुस्मृती जाळून ते गप्प बसले नाहीत,त्यांनी त्याला एक अत्यंत समर्थ, समर्पक पर्यायी मार्ग दिला. त्याचेच नाव हिंदू कोडबिल होय. मनुस्मृतीतील युगायुगाच्या स्त्री-पुरुष,सवर्ण-अवर्ण इत्यादी भेदाभेद व इतर  अमानवीय भीषण रूढी, परंपरा, अटी-नियमांना कायमची मूठमाती देऊन सर्वांना समानता प्रदान करणारी ही एक आधुनिक आदर्श मानवी संहिता होती; म्हणूनच त्या वेळी काही राजकीय व सामाजिक धुरिणांनी हिंदूकोडबिलाला ह्यभीमस्मृतीह्ण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आधुनिक पुरोगामी मनू असे अभिमानाने संबोधले.स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्रीमुक्तीची समग्र सुरुवात आपल्या शैक्षणिक विचार-कृतीने निसंदेह क्रांतिबा फुलेंनी केली, पण त्याला कायद्याची जोड नव्हती. नंतरच्या काळात अस्पृश्योद्धारक राजर्षी शाहूमहाराजांनी स्वतंत्ररीत्या स्त्रीउद्धारासाठी काही केल्याचा इतिहास नाही. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी थोडाफार प्रयत्न केला होता. पुढे ‘मुली जन्माला आल्या नाहीत, तर या जगाचे काय होईल, मला सांगता येत नाही,’ असे म्हणून ६०-६५ वर्षांपूर्वीच स्त्रीभ्रूणहत्येला चोख उत्तर देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र
दलितोद्धारासह सर्व जातिधर्मातील समस्त स्त्रीवर्गाच्या समग्रमुक्ती व उद्धारासाठी आपल्या उत्तरायुष्याचा बराच
काळ खर्ची घातला आणि हिंदूकोडबिल नावाची एक आदर्शसंहिता निर्माण करून स्त्रीवर्गाच्या समग्रमुक्तीची आशा बाळगली.त्यात त्यांना स्त्री-पुरुषात समानता निर्माण करून मुलांच्या बरोबरीने मुलींनाही वारसाहक्क
देऊन वडिलाच्या संपत्तीत समान वाटा,पुरुषाप्रमाणे स्त्रीलाही घटस्फोट मागण्याचा हक्क, स्त्रीला संपत्ती धारण
करण्याचा अधिकार,पुरुषाच्या बहुपत्नीत्वाला नकार, दत्तक विधानातील दत्तक पुत्रापासून तिचे संरक्षण अर्थात दत्तक पुत्र आपल्या दत्तक मातेस तिच्या संपत्तीच्या हक्कापासून पूर्णपणे वंचित करणार नाही, अशी तरतूद,
यासाठी विधवा स्त्रीची फक्त अर्धी संपत्ती दत्तक पुत्रास मिळेल,अशी तरतूद, यातून दत्तक आई भिकेस लागणार
नाही, याची पूर्णपणे काळजी घेतली.हे बिल कोण्या एका विशिष्ट जातिधर्माच्या स्त्रीपुरते मर्यादित नव्हते, ते
देशातील समस्त स्त्रीवर्गाशी संबंधित होते आणि विशेष म्हणजे हे बिल ब्राह्मण व अस्पृश्य वर्गातील स्त्रियांसाठी सर्वाधिक उपयुक्त होते; कारण त्या सर्वाधिक कुंठीत,पीडित, अन्यायग्रस्त होत्या. अस्पृश्य
वर्गातील स्त्रीची वेदना तर दुहेरी होती. म्हणून हे बिल म्हणजे स्त्रीहितसंहिता व आदर्श सनद होती. पण चालत आलेल्या रुढी, परंपरा व मनुस्मृती म्हणजेच भारतीय कायदा असे मानणाऱ्या पुराणमतवादी वर्गाने हे बिल हाणून पाडण्याचा चंग बांधला होता. रामाच्या काळात हिंदूकोडासारखा एखादा कायदा अस्तिवात असता, तर सीतेला घराबाहेर हाकलून देण्याचे धैर्य पुरुषोत्तम म्हटल्या जाणाऱ्या रामालासुद्धा झाले नसते,
या शब्दांत त्यांनी या बिलाची समकालीनता व मौलिकता पटवून सांगितली होती. पण, मुळातच  पुराणमतवाद्यांना व काही राजकारण्यांना हे मान्य नव्हते, यात त्यांचे हित बाधित होणारे होते. म्हणून त्यांना प्रस्थापित चौकट मोडू द्यायची नव्हती, म्हणून ते या बिलाला 'हिंदू धर्मावरील घाला' म्हणत विरोध करीत होते.
यातील दुसरी खोच ही होती, की या बिलाचे श्रेय डॉ. आंबेडकरांसारख्या एका अस्पृश्य कायदेपंडिताला देणे हे प्रतिगामी, पुराणमतवादी मानसिकतेला रुचणारे व पचणारे नव्हते, हे त्या वेळच्या अनेक कर्मठ
धर्मव्यवस्थापकांच्या प्रतिक्रियांवरून सहजच लक्षात येते. वि. स. खांडेकर, सेठ गोविंददास,पद्मजा नायडू इ. समाजसेवी, समाजधुरंधर मान्यवरांनी बिलाला समर्थन दिले.
या बिलाची अजून एक शोकांतिका अशी झाली,की शासनव्यवस्थेतील आणि बाहेरील महिला सदस्यांकडूनही या बिलाला प्रखर विरोध झाला. पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंचा अपवाद वगळता राष्ट्रपती राजेन्द्रप्रसाद व वल्लभभाई पटेल यांनी व मंत्रिमंडळातील अनेक सदस्य,प्रतिनिधी यांनी विरोधाची शिकस्त केली. पण, २५
फेब्रु. १९४९, मे १९४९, डिसें. १९४९ आणि त्यानंतर थेट फेब्रु.१९५१ अशा प्रदीर्घ खंडानंतर बिल लोकसभेत ठेवण्यात आले. या प्रत्येकवेळी एकतर बिलावर चर्चाच झाली नाही किंवा अल्पचर्चा झाली. या बिलावर चर्चा व निवेदन करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जेव्हा जेव्हा उभे राहिले त्या प्रत्येकवेळी लोकसभेच्या सभासदांनी आणि खुद्द सभापती व उपसभापतींनी अनेक अडथळे निर्माण करून त्यांचे वक्तव्य बंद पाडण्याचे प्रयत्न केले.
शेवटी २६ सप्टें. १९५१ रोजी हिंदुकोडबिल कायमचे बारगळले, या गोष्टींचा क्लेश होऊन डॉ.बाबासाहेबांनी आपल्या कायदामंत्रिपदाचा २७ सप्टें. १९५१ रोजी राजीनामा दिला. या संबंधाने लोकसभेत डॉ. आंबेडकरांना निवेदन करण्याची परवानगीही नाकारण्यात आली. पण,नंतरच्या काळात घटनेतील तरतुदी व मार्गदर्शक
तत्त्वांच्या रूपाने हिंदुकोडबिलाला अपेक्षित असलेले स्त्रीसबलीकरणाच्या संबंधाने जवळपास तीनएक डझनांवर कायदे पारित करण्यात आलेले आहेत, हे डॉ. बाबासाहेबांच्या कार्याला आलेले यश व श्रेय
म्हणावे लागेल. 
डॉ. वामनराव जगताप सामाजिक, राजकीय प्रश्नांचे विश्लेषक मंगळवार ३० डिसेंबर २०१४ होम पेज 
 संपादकीय :स्टोरी : डॉ. आंबेडकरांचे स्त्रीदास्यमुक्तीचे कार्य



अम्बेद्कड़ म्हनजे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे .......
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे
पददलितांना वाचा फोडणारे नीलकंठ
मणी.....
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे
दलितांना गुलामगिरीतून बाहेर काढणारे
बुद्धिवंत योद्धे .......
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे धर्म
रूढींना मूठमाती देणारे विद्वान
महामानव .....
* डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणजे
दीनांचे मनोधैर्य वाढविणारे प्रमुख
पंडित.....
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे
पिढ्यानपिढ्या दलितांचे धर्म छळाचे
उत्तर .......
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे
जाती जुलमाविरुद्ध
उगारलेली वज्रमुठ .....
* डॉ .बाबासाहेब आंबेडकर म्हणजे धर्म-
वर्ण वर्चस्वाचा कोथळा बाहेर
काढणारी वाघनखे .......
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे पंख
छाटलेल्या पक्ष्यांना उड्डाणाचे बळ
देणारे ....
* डॉ .बाबासाहेब आंबेडकर म्हणजे
जातीभेदावर सोडलेले अस्त्र ......
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे
वजनदार सत्ताधाऱ्याविरुद्ध पुकारलेले
बंड....
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे
नव्या समाजाची रचना करणरे
शिल्पकार ....
* डॉ .बाबासाहेब आंबेडकर म्हणजे महान
चारित्र्याचा कळस .......
* डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणजे
ठिणगीला ज्वालामुखी करणारा
विद्वत्तेचा फुंकर........
* डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणजे
निष्ठावंत ध्येयवादी समाज सुधारक ....
* डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणजे
पार्लमेंटमधील कोहिनूर हिरा ......
* डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जन
कल्याणासाठी चंदनाप्रमाणे झिजणारे
महापुरुष .........
* डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणजे
मनुस्मृती दहन करणारे हिंदू धर्माचे
कर्दनकाळ .......
* डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हिंदू
कोड बिलाला वाचा फोडणारे स्त्री
स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते .......
* डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणजे
महाडच्या चवदार
तळ्याच्या पाण्याला गोड
करणारे अमृत ........
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे धम्माचे
पुनर्जीवि दर्शन घडविणारे
बोधिसत्व .......
* डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणजे
चैत्यभूमी ठिकाणी महासागराला मागे
हटविणारे दिव्य पुरुष ......
* जय भीम * जय भारत *  नमो बुद्धाय *

काय केल आंबेडकरांनी

डॉ . बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या बद्दल काही न माहित असलेल्या गोष्टी :- जगातील अव्वल प्रतिभावान मनुष्य म्हणून सम्मान ( काम्ब्रीज विद्यापीठ )- स्त्री वर्गासाठी असलेले "हिंदू कोड बिल " जेव्हा नेहरूंनी फेटाळले , तेव्हा कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला आणि पुढे झटून बिल पास केले . पण कुठलीही स्त्री संघटना आज त्यांच्या ह्या महत्वपूर्ण योगदाना बद्दल बोलताना दिसत नाही.- रिझर्व बँक ऑफ इंडिया ची कल्पना ही बाबासाहेबंचीच (१९३४, हिल्ल्तन यंग कमिशन )- दामोदर नदी प्रकल्प , हिराकुंद प्रकल्प , सोने नदी प्रकल्प ह्या मार्फत महानदी ला नियंत्रित करण्याची कल्पना सर्वस्व बाबासाहेबंचीच पण नंतर नेहरूंनी आपली म्हणून जगासमोर आणली .- भारतीय कामगार व कर्मचारी वर्गाचे दैवत ( कामाचे तास १२ तासांवरून ८ तासांवर आणले )- Central Water Irrigation & Navigation Commission(मार्च १९४४) ची स्थापना करून भारत देशात प्रथमच " सिंचन नियोजन " सुरु केले , ज्यामुळे पुढे आपल्या देशात शेती ला चालना भेटली आणि भर भराट आली .- दुसर्या महायुद्ध नंतर पडलेली अर्थव्यवस्था ,उद्योग ,पुनर्वसन , संरक्षण ची Reconstruction Committee of Council (RCC ) मार्फत आखणी करून देशाला सावरले.- एकमेव भारतीय ज्यांचा लंडन मध्ये "कार्ल मार्क्स " सोबत फोटो आहे .- अशोक चक्र ला राष्ट्रीय तिरंगा ध्वजा मध्ये स्थान मिळवून दिले व अशोक स्तम्बाला राष्ट्रीय चिन्ह बनवण्यात महत्वपूर्ण योगदान- भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस चे प्रथम विरोधक- भारतीय घटनेचे शिल्पकार- भारत देशात जन्माला आलेल्या व विलीप्त होत असलेल्या बौद्ध धर्माला नवजीवन दिले.- देशातील महिला व महिला कामगारांसाठी महत्वपूर्ण योग्न्दान ( प्रोविडेंड फंड , घटस्फोट कायदा,गर्भवती कर्मचारी साठी वेतन युक्त सुट्टी व बर्याच सोयी , महिला वेतन वाढ , ESI , महिला कर्मचारी कल्याण फंड ची स्थापना , इत्यादी… )आणखी बर्याच राष्ट्र हिताच्या गोष्टीत योगदान , पण काही खोडसाळ व जातीयवादी लोकांच्या चुकीच्या प्रचारा मुले त्यांना फक्त दलितांचे नेते म्हणून ओळखलं व संबोधित केलं जातं .चला त्यांच्या ५८ व्या महापारीनिर्वानाच्या दिवशी त्यांची खरी, सच्ची व राष्ट्रहिताची प्रतिमा लोकांसमोर आणून लोकांचे बरेच गैरसमज दूर करूया.डॉ . बाबासाहेब आंबेडकर ह्यांना विनम्र अभिवादन...

बौद्ध समाजाने दिवाली साजरी करू नये


बौद्ध समाज जो डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुयाई आहे त्यांनी दिवाळी साजरी करू नये. 
कारण जर का आपण इतिहास पाहिला तर असे लक्षात येत कि कोणताही सण  म्हटला कि ब्राह्मणांचं काहीतरी कपट कारस्थान असणारा दिवस. 
आता दिवाळी बद्दल सांगायचं तर का करू नये याची कारणे अशी आहेत . 
पहिले कारण:- तथागत भगवान बुद्धांच्या श्रावक संघाचे दोन श्रेष्ठ सोबती सारीपुत्त सेनापती आणि
महामोग्गलायन हे उपसेनापती होते. या दोघांचा असीम त्याग आणि ४४ वर्षाची धम्मसेवा आणि त्यांच्या अंगी असलेले सद्गुण यामुळेच तथागतांनी त्यांच्यावर संघाची दूर सोपविली होती. महामोग्गलायनचा प्रभाव राजगृहामध्ये खूप वाढला. त्यामुळेच कार्तिक अमावास्येला ईसीगल पर्वतावर त्यांची क्रूर हत्या करण्यात आली. महामोग्गलायनला जिवंत जाळण्यात आले. तो दिवस दिवाळीचा होता. म्हणजेच इतिहासातील काळा दिवस.
दुसरे कारण:- मौर्य काळातील दहावा सम्राट बौद्ध राजा बृह्दरथ हा दहा व्यक्तींचे बळ असलेला महापराक्रमी अजिंक्य योद्ध होता. युद्धात त्याला हरविणे कठीण काम होते. यांची ब्राम्हणी सेनापती पुष्यमित्र शुंग याने कपट कारस्थानाने क्रूर हत्या केली. तोही दिवस कार्तिक अमावस्येचा होता. बौद्ध सत्ता उलथून लावण्यात आली. भिक्खुंच्या कत्तली करण्यात आल्या. भिक्खुंचे शीर कापून आणणाऱ्यास (१००)सुवर्ण मुद्रा देण्याचे फर्मान पुष्यमित्र शुंग याने सोडले. विहारे, स्तूप नष्ट केली आणि दिव्यांच्या माळा लावून आतिषबाजी केली. तो दिवस कार्तिक अमावस्येचा (दिवाळी) होता.
तिसरे कारण:- "ईडा पिडा टळो बळीचे राज्य येवो" हि म्हण आजही आपल्या माता-भगिनी एखाद्या प्रिय व्यक्तीला ओवाळताना म्हणतात. यामागे फार मोठा इतिहास आहे. बहुजनांचा सर्वश्रेष्ठ राजा बळी हा अत्यंत शूर, पराक्रमी, बुद्धिमान, सत्वशील, चारित्र्यवान, उदार, दयाशील, न्यायी असा सर्वगुण संपन्न राजा होता. त्याच्या राज्यात सर्वसामान्य बहुजन समाजातील जनता अत्यंत सुखी-संपन्न व समृद्ध होती. अशा या दानशूर बहुजन राजाला विष्णूने कपटकारस्थान रचून कैद केले. त्यांची सत्ता, शास्त्रे, विद्या, संपत्ती हिरावून घेण्यात आली. त्यांच्या मुलांना एकामागून एक ठार करण्यात आले. बलीप्रतीपदा या दिवशी बळी राजाची क्रूर हत्या करण्यात आली. तो दिवस कार्तिक अमावस्येचा म्हणजेच (दिवाळी) चा होता.
म्हणून बौद्धांनी, बहुजनांनी दिवाळी हा सण साजरा करू नये. 
आजवर आपण जे काही करत आलो त्यात आपले अज्ञान होते. परंतु आता तर आपल्याला खरा इतिहास समजलेला आहे आणि हा खरा इतिहास समजून देखील आपण जर परत तीच चूक करत असाल तर मात्र आपल्याला बौद्ध म्हणवून घेण्याचा काही एक अधिकार नाही. कारण; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि दीक्षा देत असतांना त्यांनी आपल्याला २२ प्रतिज्ञा देखील दिलेल्या आहेत. जर आपण त्या २२ प्रतीज्ञांचे पालन करत नाहीत तर याचा अर्थ स्पष्ट आहे कि आपण आपल्या उद्धारकर्त्याशी बेईमानी करत आहोत. त्यांचा अपमान करत आहोत व आपण फक्त आपल्या स्वार्थासाठी त्यांचा उपयोग करत आहोत. म्हणून बौद्धांनी, बहुजनांनी दिवाळी हा सण साजरा करू नये. घरावर विद्युत रोषणाई करणे, आकाश कंदिल लावणे, दिवे लावणे, रांगोळी काढणे, म्हणजे आपल्या पूर्वजांच्या, महापुरुषांच्या हत्येचा आनंदोत्सव साजरा केल्यासारखे होईल. आपण बौद्ध आहोत. आपली संस्कृती वेगळी आहे. आपले सण म्हणजे भिमजयंती, बुद्धजयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन, व आपल्या आदर्शांच्या जयंत्या व प्रत्येक महिन्याची पोर्णिमा हे आहेत. तेच फक्त साजरे करावेत...

* जय भिम * .नमो बुध्दाय *