डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर : कशाचे डॉक्टर ...?

पुणे कराराच्या वेळी गांधी बाबासाहेबांना एकदा म्हणाले होते कि "मी हरीजन समाजाला रोटी कपडा मकान देवू शकतो. तुम्ही सुट बुट घालून या समाजात कसा बदल घडवणार ? "
तेव्हा बाबासाहेब न रागावता पण संयमाने डोळ्यात पाहुन म्हणाले" मिस्टर गांधी,मी सुट बुट यासाठी घालतो कारण माझा बहुजन समाज माझं अनुकरण करुन उद्या तो सुट बुटात फिरणार आहे हे मात्र नक्की ".
 आता एक अनोखा प्रश्न घेवूया  तार तो ऐसा की 
डॉक्टर .बाबासाहेब आंबेडकर ...
हे आहेत डॉक्टर ....(त्याना मिळालेल्या पदव्या याची साक्ष आहेच) जार का त्यांच सामाजिक कार्य पाहुन आपण जार डॉक्टर या पदविला थोड़े redirect  केल तर त्याच उत्तर बघुया काय आहे ... 
पण कशाचे डॉक्टर .....?
बाबासाहेब एकदा भाषणामध्ये म्हणाले होते  कि  जर का मी कॉंग्रेस बरोबर तडजोड केली असती, तर या देशाचा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू नव्हे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले असते,
पण बाबासाहेबांनी कधी सत्याशी आणि तत्वांशी तडजोड केली नाही.
तर  मग कशाचे डॉक्टर .....?
अरे,ब्रेन वर शस्रक्रिया करणारे अनेक डॉक्टर या भारतात आहेत.... 
काळजावर शस्रक्रिया करणारे अनेक डॉक्टर या इंडिया मध्ये आहेत.... 
हृदयावर शस्रक्रिया करणारे अनेक डॉक्टर या इंडिया मध्ये आहेत... 
परंतु बाबसाहेब ही डॉक्टर होते...
कशाचे डॉक्टर .....?
मेलेल्या माणसाला उठवून बसविणारे डॉक्टर.....!     
मुर्द्याला जागविणारे
डॉक्टर....!
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर....!
हजारो वर्षापूर्वी, भीम जन्मण्यापूर्वी आम्ही जिवंत होतो की मेलो होतो हे आमच आम्हालाच ठाऊक नव्हतं, एखादया मुर्द्यासारखे आम्ही हिंदू दलदलीत फसलेलो होतो, तथागत गौतम बुद्धांची धम्मरूपी संजीवनी बाबासाहेबांनी या मुर्द्यांवर शिंपडली, 

मुर्दे पटापट उठून बसले,
तुम्हाला आम्हाला वाचवलं...

अरे तुम्हाला आम्हाला उठवून बसवलच बसवलं, 

पण या देशाचं ऑंपरेशन बाबासाहेबांनी केलं.
या देशाला झालेला जातीयतेचा कॅन्सर बाबासाहेबांनी चरचरा ....चरचरा....कापला.
आणि संविधान देवून या भारत देशाला मनुवाद्यांच हिंदुस्तान नाव कायमच फुल स्टॉप दिला 
 ( त्यानी संविधानात मेंशन केल कि " INDIA THAT  IS BHAARAT " ). 
तसेच संविधानातून या देशाचं ऑंपरेशन केलं आणि ३९५ कलमाच एकच इंजेक्शन दिलं,
लांबच केले वळवळणारे जातीयवादी किडे,रोगमुक्त केलं भारताला.
तर असे होते डॉक्टर...
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर...

आमच्या राजाला दगडाच्या मंदिराची गरज नाही..!
आमच्या राजाला रोज
पुजाव लागत नाही..!
आमच्या राजाला दुध-तुपाचा
अभिषेक करावा लागत नाही.आमच्या
राजाला कधी नवस बोलावा लागत नाही..!
आमच्या राजाला सोने- चांदीचासाज ही चढवावा लागत नाही..!
एवढ असुनही जे जगातील
अब्जवधी लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतात असे एकमेव युगपुरुष...!
॥ बाबासाहेब ॥

आपले  बाबासाहेब म्हणजे सगळ्यांच्या बापाचा बाप आहे 

भले तो मनुष्य प्राणी असूदे किंवा काल्पनिक देवी देवता. 


एकच साहेब ,,,,,बाबासाहेब 

नमो बुद्धाय !जय भीम !जय भारत ! 


No comments:

Post a Comment