जयभीम म्हणजे काय ?





काही लोक म्हणतात  कि : *जयभीम म्हणजे काय ?*
तर उत्तर असं पाहिजे :

*जयभीम म्हणजे भारतीय**जयभीम म्हणजे श्वास**जयभीम म्हणजे अस्मिता**जयभीम म्हणजे डॉ. बाबासाहेबांचा आदर**जयभीम म्हणजे एक ओळख**जयभीम म्हणजे आंबेडकरी विचार**जयभीम म्हणजे आंबेडकरी चळवळ**जयभीम म्हणजे भीमसैनिक**जयभीम म्हणजे आंदोलन**जयभीम म्हणजे सम्यक समाज**जयभीम म्हणजे सम्यक दृष्टी**जयभीम म्हणजे सम्यक क्रांती**जयभीम म्हणजे उत्साह**जयभीम म्हणजे उर्जा**जयभीम म्हणजे* *डाॅ.बाबासाहेबांच्या कष्टाला सलाम**जयभीम म्हणजे मुकनायक**जयभीम म्हणजे मुक्तीदाता**जयभीम म्हणजे मुक्तीचे भुषण**जयभीम म्हणजे वंचितांचा आवाज**जयभीम म्हणजे वंचितांचा विकास**जयभीम म्हणजे अन्यायाचा प्रतिकार**जयमीम म्हणजे गर्व**जयभीम म्हणजे दम, ताकद, शक्ती**जयभीम म्हणजे स्वाभिमान**जयभीम म्हणजे आपुलकी आणि आपलेपणा**जयभीम म्हणजे जीवंतपणा**जयभीम म्हणजे अजिंक्यता**जयभीम म्हणजे माणुसकी**जयभीम म्हणजे प्रामाणिकता**जयभीम म्हणजे एकता, एकतेचा विचार**जयभीम म्हणजे अंधश्रद्धेला नकार**जयभीम म्हणजे परिवर्तनवादी**जयभीम म्हणजे विज्ञानवादी**जयभीम म्हणजे बुध्दीप्रामाण्यवादी**जयभीम म्हणजे नव्याचा स्विकार**जयभीम म्हणजे जागृती**जयभीम म्हणजे दया,क्षमा,शांती**जयभीम म्हणजे प्रज्ञा ,शील, करुणा**जयभीम म्हणजे मैत्री**जयभीम म्हणजे सदाचार**जयभीम म्हणजे स्वातंत्र्य,समता,बंधुत्व**जयभीम म्हणजे भीमगर्जना**जयभीम म्हणजे बहिष्कृत भारत**जयभीम म्हणजे आंबेडकर भारत*जयभीम म्हणजे प्रबुध्द भारत**फक्त* जय भीम 

* नमो बुद्धाय * जय भीम * जय भारत * 

बाबासाहेबांच दीक्षाभुमीवरिल भाषण


डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील
भाषण आणि बौध्दांची जबाबदारी
दिनांक १४.१०.१९५६ रोजी नागपूर येथे हिंदू
धर्माचा त्याग करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द
धम्माची दीक्षा घेतली व नंतर
उपस्थित लाखो अनुयानांना त्यांनी दिक्षा दिली.
दुसर्या दिवशी दिनांक १५.१०.१९५६
रोजी सकाळी १० ते १२ पर्यंत
त्यांनी धम्माचे विवेचन व समाजबांधवांना मार्गदर्शन
करणारे ऎतिहासिक, स्फुर्तिदायक व ओजस्वी भाषण
दिले. या घटनेला आज ५५ वर्षे लोटून गेलीत.
तेव्हा त्यांनी ज्या पोटतिडकीने दिशानिर्देश
दिलेत त्यानुसार समाजबांधव वागला कां याचा विचार करणे आवश्यक
आहे.
बाबासाहेब भाषणात म्हणाले होते की, ’आम्हाला इज्जत
प्यारी आहे आहे, लाभ प्य्रारा नाही.’
केसरीच्या बातमीदाराने संगमनेरच्या सभेत
चिठ्टी पाठवून बाबासाहेबांना विचारले होते की,
’तुमचे लोकं हलाखीमध्ये जगत आहेत.
त्यांच्या बायकांना लुगडे चोळी नाहीत.
त्यांना अन्न नाही.
शेतीवाडी नाही अशी त्याची बिकट
परिस्थिती असतांना मेलेली ढोरे ओढू नका असे
तुम्ही सांगत असल्यामुळे त्यांचे
दरवर्षी कातड्याचे, शिंगाचे, मांसाचे ५०० रुपये उत्पन्नाचे
नुकसान होते.’ तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते की,
’तुम्ही, तुमचे पांच मुले, तुमच्या भावाच्या ५/७ मुलांमिळून
तुमच्या कुटूंबानी हे काम करावे म्हणजे तुम्हाला ५००
रुपयाचे उत्पन्न मिळेल. त्याशिवाय
मी दरवर्षी तुम्हाला ५०० रुपये वर
देण्याची व्यवस्था करतो. माझ्या लोकांचे काय होईल,
त्यांना अन्न-वस्त्र मिळेल की नाही ते माझे
मी पाहून घेईन. मग
एवढी फायद्याची गोष्ट
तुम्ही कां सोडून देता? तुम्ही कां हे
करीत नाही? आम्ही हे काम
केले म्हणजे फायदा होतो, आणि तुम्ही केले म्हणजे
फायदा नाही?
ओढा ना तुम्ही मेलेली ढोरे…’
दुसर्या एका ब्राम्हण मुलाने, पार्लमेंट,
असेंब्ल्याच्या जागा कां सोडता असे विचारले होते. त्यावर बाबासाहेब
म्हणाले की, ’तुम्ही महार बनून भरा.’
म्हणून बाबासाहेब म्हणतात की,
आम्ही झगडतो आहोत ते
इज्जतीकरीता! मनुष्य मात्राला पूर्णावस्थेस
नेण्याकरितां आम्ही तयारी करीत
आहोत. त्यासाठी वाटेल तो त्याग
करण्याची आमची तयारी आहे.
काय बाबासाहेंबाच्या या म्हणण्यानुसार समाजबांधव वागत आला आहे
कां? की स्वार्थासाठी वाटेल ते,
प्रसंगी स्वाभिमान, मानसन्मान व इज्जत गहान
ठेवायला मागेपूढे पाहिले नाही. याचा जाब
अशा लोकांनी स्वत:ला विचारायला नको कां?
बाबासाहेब त्या भाषणात म्हणाले होते की,
’आम्ही हिंदू धर्मत्यागाची चळवळ १९३५
पासून येवले येथे एक ठराव करुन
हाती घेतली. मी.हिंदू धर्मात
जन्मलो असलो तरी मी हिंदू धर्मात मरणार
नाही, अशी प्रतिज्ञा मी मागेच
केली होती आणि काल
मी ती खरी करुन
दाखविली. मला इतका आनंद झाला की-
हर्षवायुच झाला आहे. नरकांतून सुटलो असे मला वाटते.’
काय आपण सुध्दा पुर्णपणे हिंदू धर्माच्या संकृतीचा,
रितीरिवाजाचा त्याग केला आहे कां? असा प्रश्न
आम्ही स्वत:ला विचारायला नको कां?
पुढे बाबासाहेब म्हणतात की,
’मला कोणी अंधभक्त नको आहेत. ज्यांना बौध्द धर्मात
यावयाचे आहे, त्यांनी जाणीवेने आले पाहिजे.
त्यांना तो धर्म पटला पाहिजे.’
काय बाबासाहेंबाच्या म्हणण्यानुसार, समाजबांधवांनी बौध्द
धम्म आतातरी पटवून घेतला आहे कां?
धम्माची शिकवन समजून घेऊन इतरांना समजून
सांगितली काय? याचा जाब
प्रत्येकांनी स्वत:ला विचारायला नको कां?
भगवान बुध्दाचा उपदेश सांगतांना बाबासाहेब म्हणतात की,
बौध्द संघ हा सागराप्रमाणे आहे. या संघात सर्व सारखे व समान
आहेत. सागरात गेल्यावर हे गंगेचं पाणी किंवा हे
महानदीचे पाणी ओळखणे अश्यक्य असते.
त्याप्रमाणे बौध्द संघात आले म्हणजे आपली जात जाते
व सर्वजण समान असतात.
काय लग्न जुळवतांना आपण पोटजातीचा विचार
करतो काय? याचा जाब अशा लोकांनी विचारायला नको काय?
बाबासाहेबांनी भाषणामध्ये धर्मास
ग्लानी कां येते?
या राजा मिलिंदानी विचारलेल्या प्रश्नाला भन्ते नागसेनाने
दिलेल्या उत्तराचे विवेचन करतांना तीन कारणे
सांगितली आहेत.
१. पहिले कारण हे की एखादा धर्मच कच्चा असतो.
त्या धर्माच्या मूळ तत्वांत गांभीर्य नसते. तो कालिक धर्म
बनतो व कालानुसार अशा धर्म टिकतो.
२. दुसरे कारण हे की, धर्म प्रचार करणारे विद्वान लोक
नसतील तर धर्मास ग्लानी येते.
ज्ञानी माणसांनी धर्म-ज्ञान सांगितले पाहिजे.
विरोधकांशी वादविवाद करण्यास धर्माचे प्रचारक सिध्द
नसतील
तरी धर्माला ग्लानी येते.
३. आणि तिसरे कारण हे की, धर्म व
धर्माची तत्वे विद्वानासाठी असतात. प्राकृत
व सामान्य लोकांकरिता मंदिरे-देवळे असतात. ते तेथे जाऊन
आपल्या श्रेष्ट विभूतिचे पूजन करतात.
बाबासाहेब म्हणतात की, आपण बौध्द धर्म
स्विकारतांना ही कारणे लक्षांत ठेवली पाहिजे.
बौध्द धर्माची तत्वे कालिक
(काही काला पुरती) आहेत असे
कोणासही म्हणता यावयाचे नाही.
काय धम्म प्रचारासाठी व गांवा-गांवात, मोहल्या- मोहल्यात
बुध्द विहारे बांधण्यासाठी समाज
बांधवांनी विशेषत:
शिकलेल्या बुध्दिजीवी वर्गांनी पुढाकार
घ्यायला नको काय? कारण हा वर्ग समजून घेउन इतरांना समजावून
सांगू शकतो. हा वर्ग बाबासाहेबांच्या चळवळीचा लाभधारक
आहे. तेव्हा या लोकांवर बाबासाहेबांची चळवळ पुढे
नेण्याची जबाबदारी येऊन पडत
नाही काय?
बाबासाहेब पुढे म्हणतात की, “मात्र
तूमचीही जबाबदारी मोठी आहे.
तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल, मान सन्मान वाटेल
अशी तुम्ही कृती केली पाहिजे.
हा धर्म म्हणजे आपण एक गळ्यात मढे अडकवून घेत आहोत
असे मानू नका. बौध्द धर्माच्या दृष्टीने
भारताची भूमी सध्या शुन्यवत आहे.
म्हणून आपण उत्तम रितीने धर्म पाळण्याचा निर्धार
केला पाहिजे. नाही तर महार
लोकांनी तो निंदाजनक स्थितीस आणला असे
होऊ नये, म्हणून आपण दृढ निश्चय केला पाहिजे. हे
आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर देशाचा, इतकेच नव्हे
तर जगाचाही उध्दार करु. कारण बौध्द धर्मानेच
जगाचा उध्दार होणार आहे.”
काय आपण उत्तम रितीने धर्म पाळण्याचा प्रयत्न
केला काय किंवा करतो काय? आपल्या कृतीने बुध्द धम्म
निंदाजनक स्थितीस आणला असे झाले तर
नाही ना? याचा अंतर्मुख होवून सर्वांनी विचार
करायला नको काय?
बाबासाहेब पुढे म्हणतात की, “ हा नवा मार्ग
जबाबदारीचा आहे. आपण काही संकल्प
केला आहे, काही इच्छिले आहे, हे
तरूणांनी लक्षांत घ्यावे. त्यांनी केवळ पोटाचे
पाईक बनू नये. आपल्या प्राप्तीचा निदान २०
वा हिस्सा या कामी देईन असा निश्चय करावा.
काय आपल्या उत्पनाचा विसावा हिस्सा म्हणजे पांच टक्के आपण
बाबासाहेबांच्या कार्याकरीता योगदान देतो काय?
कां हेही पैसे आपण आपल्याच घरात,
शौकपाण्यासाठी खर्च करतो? याचा विचार आपण
करायला नको काय? हा पैसा बाबासाहेबांचा आहे
आणि तो मी बाबासाहेबांच्याच कामाकरीता खर्च
करेन याची जाणीव
किती लोकांना आहे?
भाषणाच्या शेवटी बाबासाहेब म्हणतात की,
“दरेकांनी दरेकाला दीक्षा द्यावी.
दरेक बौध्द माणसाला दीक्षा देण्याचा अधिकार आहे असे
मी जाहीर करतो.”
काय इतर जाती-धर्माच्या लोकांनी बौध्द धम्म
स्विकारावा म्हणून आपण
अशी काही यंत्रना निर्माण करु शकलो काय?
याचा आम्ही विचार करायला नको काय?
बाबासाहेबांचे भाषण व त्यावर
आपली जबाबदारी याचा विचार करुन जर
सर्वांनी एकत्र येऊन एका सुत्रबद्द
पध्दतीने व निष्ठापूर्वक रितिने वाटचाल करण्याचा निर्धार
केला तर खर्या अर्थाने बाबासाहेबांचे ’भारत बौध्दमय’ करण्याचे
स्वप्न काही अंशी साकार झाल्याशिवाय
राहणार नाही, हे निर्वीवाद सत्य आहे.
PROOF :-
दिनांक २४.०९.२०११ दैनिक धम्मशासन, मुंबई,
दिनांक २५.०९.२०११ दैनिक वृतरत्न सम्राट, मुंबई,
दिनांक २९.०९.२०११ व ३०.०९.२०११ जनतेचा महानायक, मुंबई,
दिनांक ०६-१०-२०११ दैनिक बहुजन महाराश्ट्र पूणे धम्मचक्र
प्रवर्तन विशेषांक
व दिनांक ०६-१०-२०११ धम्मसंदेश यवतमाळ धम्मचक्र प्रवर्तन
विशेषांक मध्ये प्रकाशित झाला आहे.

समाज सुधारकांची विचारधारा


संत कबीर : कृतीशिवाय उपदेश करणे हे मूर्खांचे लक्षण होय.तो कृतीशून्य वागत असेल तर...रात्रंदिवस केलेले उपदेश उपयोगी पडत नाही.

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले : सर्वं मानव ही एकाच ईश्वराची लेकरे आहेत, हे जो पर्यंत आम्हाला कळत नाहीं, तो पर्यंत ईश्वराचे खरे स्वरूप आपणास कळणार नाहीं.उच्च जाती, नीच जाती ईश्वर्कृत नाहीं, स्वार्थी मानवाने स्वता:चे रूप व्यक्त करण्यासाठी आणी त्यायोगे आपले आपल्या वंशजांचे हित व्हावे म्हणून केलेले पाखंडी तत्वज्ञान आहे.

संत तुकोबाराय : असत्याच्या बाजूने जरी बहुमत असले तरी ते स्विकारू नये.



छ . शिवराय : राज्यात जातीपातीला आजिबात थारा नाही .



राष्टमाता आहिल्यामाई होळकर : जे स्वराज्य माझ्या पुर्वजानि तलवारीच्या बळावर रक्ताचे पाणी करुन मिळवले आहे त्याला टिकवन्या साठि माझे रक्त जरी सांडले तरी चालेल पन ह्या देश द्रोही पेशव्यांचे कपट कारस्थान चालु देनार नाहि.

राष्ट्रसंत संत गाडगेबाबा :अरे अडाण्याला शिक्षण द्यावं, बेघरांना घर द्यावं,रंजल्या - गांजल्याची सेवा करावी,
मुक्या प्राण्यावर दया करावी...बापहो देव यांच्यात राहतो बापहो देव देवळात राहत नाही...देव आपल्या मनात राहतो...देवळात फक्त पुजा-याचे पोट राहते.

प्रबोधनकार ठाकरे. : समाजातील सर्व विकारांचे मर्म वैदिक कर्मकांडांत आहे ... धार्मिक पूजेचे विधी, उपासतापास,व्रतवैकल्ये आणि धर्म या नावाखाली सर्व जातींमध्ये जे रूढ परिपाठ आहेत...
ते सर्व परिपाठ भिक्षुकांनी आपल्या स्वत:च्या फायद्यासाठी प्रस्थापित केले आहेत...
या दुष्ट रूढींमुळेच स्त्रियांवर अन्याय होतो विशेष अधिकारांपासून वंचित अशा बहुजन समाजावर अन्याय होतो सारांश सर्व अशिक्षित जनता या रूढींखाली भरडली जाते .

विश्वंरत्न डॉ. भिमराव रामजी आंबेडकर : स्त्रियांची प्रगती ज्याप्रमाणात झाली असेल, त्यावरून समाजाची प्रगती मी मोजत असतो 


राजर्षी छत्रपती शाहू महाराज : "शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती नाही, असे इतिहास सांगतो. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मत्सुद्दी व लढवय्ये वीर कधीही निपजणार नाहीत.म्हणूनच सक्तीच्या व मोफत शिक्षणाची भारताला अत्यंत गरज आहे."

माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम सर : यश खूप दूर आहे असे जेंव्हा आपल्याला वाटते...तेव्हा ते खूप जवळही असू शकते.जेंव्हा तू प्रतिकुल परिस्थतीशी झगडत असशील तेव्हा खरेच प्रयत्न करणे मात्र सोडू नकोस... प्रयत्नांनीच तुला थकवा येईल,तेव्हा थोडा विसावा घे, पण माघार घेऊ नकोस अजिबातच माघार घेऊ नकोस...येणा-या सर्व आव्हानांसाठी सज्ज रहा, त्यांना खंबीर मनाने सामोरे जा ऐरण झालास तर घाव सोस... हातोडा झालास तर घाव घाल.

नेताजी सुभाषचंद्र बोस : सर्व प्रकारच्या अंधश्रध्दा आणि धर्माच्या नावाखाली केला जाणारा वेडाचार नष्ट करा.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज : प्रसन्न हवापाणी ऋतु । हाचि विवाहाचा मुहूर्त।बाकीचें झंजट फालतू । समजतों आम्ही ॥दिवस पाहावा सुंदर । हावापाणी सोयीस्कर ।सर्वांसि होईल सुखकर । म्हणोनिया ॥लग्नासाठी कर्ज करावे । जन्म भर व्याज भरीत जावे॥पैश्या साठी कफल्लक व्हावे । कोन्या देवे सांगितले ॥

राष्ट्रसंत संत गाडगेबाबा : बापहो आपल्या मुलाले शिक्षण द्या, पैसे नाही म्हणाल,तर जेवणाचे ताट द्या,हातावर भाकरी खा, बायकोले लुगडं कमी भावाचे घ्या, पण मुलाले शाळेत घातल्या विना राहु नका.

क्रांतीसुर्य ज्योतिराव फुले : ईश्वर एकच व निर्गुण-निराकार आहे... ईश्वराच्या भक्तीसाठी कोणालाही कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही... धार्मिक कर्मकांडावर विश्र्वास ठेवू नका !!

 साहित्यरत्न शाहीर अण्णा भाऊ साठे : "पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून, ती येथील दलित,कष्टकरी, उपेक्षितांच्या तळहातावर तरलेली आहे.''


प्रबोधनकार सत्यपाल महाराज : शेतकरी माय-बाप हो..जगाचा पोशिंदा म्हणून तुमची ओळख आहे..एका दाण्याचे शंभर दाणे करण्याची किमया तुमच्यातच आहे म्हणून म्हणतो जरा धीराने घ्या... एकाचे शंभर आणि शंभराचे कोटी होतील...असे करता करता सर्व कर्ज निकाली निघेल...आत्महत्या हा कोणत्याही संकटावरील पर्याय होऊ शकत नाही... बाबांनो जे बाजारात विकते , तेच पिकवा..

स्वामी विवेकानंद : जब पड़ोसी भूखा हो तब मंदिर में भोग चढ़ाना पुण्य नहीं पाप है !



सत्यशोधक विचारवंत आण्णा भाऊ साठे : हे दिन दुबळ्यांचे हात कष्ट मेहनत करून ते
स्वतः जगतात व इतरांना जगवतात. गरिबांच्या कष्टावरच सर्व व्यवहार चालत असतात. त्यांच्या मेहनतीला नेहमी फळ येते.ती जगतात आणि जगवतात !!

पु.लं.देशपांडे('एक शुन्य मी' या पुस्तकातुन) : एक तर धर्म, ईश्वर, पूजा-पाठ ह्यात मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही.पूर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे थोतांडावर माझा विश्वास नाही. देव, धर्म या कल्पना धूर्त सत्ताधा-यांनी दहशतीसाठी वापरलेल्या आहेत,याविषयी मला यत्किंचितही शंका नाही.

डॉ. श्रीराम लागू. : कुठल्याही अंधश्रद्धा निरुपद्रवी नसतात,आणि कुठल्याही श्रद्धा डोळस नसतात,डोळस श्रद्धा हा वदतोव्याघात आहे. प्रेम जसे आंधळे असते.तशी श्रद्धा ही आंधळीच असते. मी परमेश्वरावर श्रद्धा आहे असे म्हणण्याने ती श्रद्धा डोळस होत नाही.ज्या वस्तूच्या (किंवा संकल्पनेच्या) अस्तित्वाचा कसलाही पुरावा, काही हजार वर्षांच्या शोधानंतरही उपलब्ध झालेला नाही त्या वस्तूवरची किंवा संकल्पनेवरची म्हजे परमेश्वरावरची श्रद्धा डोळस कशी ? आपल्यावर पिढ्यानपिढ्या झालेल्या संस्कारांचा परिणाम म्हणून ती श्रद्धा फार तर प्रामाणिक म्हणता येईल पण डोळस नव्हेच. भूतपिशाच्च ह्या संकल्पनाच आहेत. त्याही परमेश्वर ह्या संकल्पनेइतक्याच जुन्या आहेत त्यांच्याही अस्तित्वाचा कसलाच पुरावा नाही. मग त्या तेवढ्या अंधश्रद्धा,आणि परमेश्वरावरची श्रद्धा मात्र डोळस श्रद्धा, हे कसे काय ?

डॉ. नरेंद्र अच्युत दाभोलकर : अंधश्रद्धांना विरोध म्हणजे शोषण, अनिष्ट प्रथा, रूढी,कालविसंगत कर्मकांड, त्यातून होणारी दिशाभूल,फसवणूक याला विरोध. लोकांच्या श्रद्धेचा, सात्त्विक भावनेचा वा भयगंडाचा फायदा घेऊन ही सफाईदार धूळफेक वा चलाख लूटमार केली जाते. त्याला ना जात,ना पंथ, ना धर्म. त्याला विरोध हेच फुले, आंबेडकरांनी सांगितलेले सत्यशोधकी कर्म.

सिंधुताई सपकाळ : रात्रीच्या अंधाराला घाबरू नका, पहाटेचा इंतजार करा. एक दिवस तुमचाही उजाडेल.

डॉ.आ.ह.साळुंखे. : परिवर्तनाची प्रक्रिया हि एक सुंदर तपश्चर्या आहे.असे मला वाटते. आपणही तपश्चर्या निष्ठेने, विवेकाने,संयमाने, परस्पर विश्वासाने, परस्पर सहायाने करू.या परिवर्तनवादी कार्यकर्ता होण्यासाठी व्यक्तीने आधी चांगला माणूस कसे बनायचे ते शिकले पाहिजे आणि तसे बनले पाहिजे, असे मी मानतो. जे हि प्रक्रिया पूर्ण करून कार्यकर्ते बनले आहेत, त्यांच्या पुढे मी नतमस्तक आहे.

विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर : जातीभेद एक मनाचा रोग आहे . मनाने तो मानला नाही की, तो झटकन बरा होतो .

हिंदू धर्म कसा ?

स्वामी दयानंद सरस्वती म्हणतात "हिंदू- हि मोगलांनी दिलेली शिवी आहे.हि म्हणजे हीन आणि दु म्हणजे दुय्यम म्हणजेच शुद्र, तुछ्य, गुलाम, जिंकून घेतलेले होय." म्हणूनच दयानंद सरस्वती यांनी आर्य
समाजाची स्थापना केली. हिंदू समाजाची नव्हे. असे असेल तर गर्व काय गुलामीचा करIयचा?
१) एके काळी स्त्रियांच्या डोक्या वरील केस भादरून त्यांना बोडखे जीवन जगाय लावणारा हिंदू धर्म. एवढेच काय तर स्त्रियांना जिवंत जाळून ढोल तासे बडवत मंत्र म्हणनार्या ब्राह्मणांचा हिंदू धर्म खरच गर्वाची बाब आहे काय?
२) वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था निर्माण करून असमानता दर्शक वागणूक देणारा. माणसा माणसात भेद निर्माण करणारा. धर्म खरच मना पासून गर्व करण्याच्या लायकीचा आहे काय?
३) हिंदू धर्म एवढा ग्रेट होता तर मग संतांनी वेगळे धर्म का काढले ज़से कि महात्मा बसवेश्वर यांनी लिंगायत, संत चक्रधर स्वामी यांनी महानुभाव (परधर्म) तर संत नामदेव यांनी भागवत (वारकरी) धर्म का काढला?
४) आत्तापर्यंत ब्राह्मणांच्या मुलांचा हजेरी पटावरील धर्माचा रकाना रिकामा का असायचा? धर्म म्हणून "ब्राह्मण धर्म" हा शब्दप्रयोग ब्राह्मण आत्तापर्यंत का करत आलेत?
५)शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा नाकारणे असो कि किवा तुकोबांचा गाथा पाण्यात बुडवणे असो. आमचा धर्म असे कसे करू शकतो?
६) मनुस्म्रती हा ब्राम्हन धर्माचा कायदे ग्रंथ.ज्याने शूद्राला कुठलेही हक्क अधिकार दिले नाहीत पण शिक्ष्या मात्र भयानक दिल्या जसे कि संस्कृत चा अभ्यास का केला म्हणून छ.संभाजी महाराजांची हत्त्या या ग्रंथा प्रमाणे करण्यात आली.
संत चोखोबा हे जातीने महार पण लोकांना शहाणे करत आहेत म्हणून त्यांच्या अंगावर वेस ढकलून त्यांची हत्त्या करण्यात आली.
एवढेच नव्हे तर संत रविदास यांची हत्त्या चीत्तोदगडावर चर्म कापण्याच्या हत्त्याराने करण्यात आली
ग़ोरा कुंभाराचे हात तोडण्यात आले.
जनाबाई ला सुळावर देण्यात आले .
मीराबाई ला कृष्ण मंदिरात विष पाजून मारले गेले. सन्त
नामदेव यांच्या समवेत घरच्या १४ जणांना पाण्यात बुडवून मारण्यात आले.
कबीरां च्या देहाची म्हणे फुले झाली. हि सगळी कारस्थाने धर्म प्रमुख भटजींचे. काय समस्या होती ब्राह्मनांची?
७ ) बरे या धर्माचा ठोस धर्मग्रंथ कोणता? मुख्य देव कोणता? धर्म प्रमुख कोणता? अजून किती तरी पुरावे देता येतील.
आमच्या महापुरुषांना संपवणारा धर्म आमचा कसा?
वाचा विचार करा

डाँ बाबासाहेब यांचा जीवनपट ( थोडक्यात )


  • १४ एप्रिल १८९१ महू मध्यप्रदेश येथे सैनिक छावणीत जन्म 
  • १९०७ मँट्रीक परीक्षा पास केली
  • १९०७ रमाबाई वलंगकर यांच्या सोबत मंगल परिणय 
  • १९१० इन्टरमीडिएट परीक्षा पास 
  • १९१२ BA परीक्षा उत्तीर्ण 
  • १९१३ उच्च शिक्षणाकरिता न्युयॉर्क येथे रवाना 
  • १९१५ अँन्शंट इंडियन काँमर्स या प्रबंधावर MA ची उपाधी 
  • १९१६ ला Ph d पदवी बहाल 
  • ११ नोव्हेंबर १९१८ ला सडेनहँम काँलेज मध्ये अर्थशास्त्राचे प्रोफेसर म्हणून नियुक्ती 
  • ३१ जानेवारी १९२० राजश्री शाहू यांच्या साहाय्याने'मुकनायक'चा पहिला अंक प्रकाशित 
  • १९२२ बँरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण 
  • १९२३ डाँक्टर आँफ सायन्सची पदवी बहाल 
  • २० जुलै १९२४ ब बहिकृत हितकारणी सभा ची स्थापन मुंबई 
  • ३ एप्रिल १९२७ बहिकृत भारत पाकशियाचे प्रकाशन 
  • १९२७ मुंबई विधीमंडळात सदस्य म्हणून नियुक्ती 
  • २५ डिसेंबर १९२७ महाडचा सत्याग्रह आणि मनुस्मृती दहन 
  • २९ जून १९२८ समता पाक्षिकाचा आरंभ 
  • ३ मार्च १९३० काळाराम मंदीर नाशिक सत्याग्रह प्रारंभ 
  • २ आँक्टोबर १९३० लंडन येथे गोलमेज परिषदेचे साठी मुंबईहून रवाना 
  • २४ नोव्हेंबर १९३० जनता साप्ताहिकाचा आरंभ 
  • १४ आँगस्ट १९३१ मनीभवण मुंबई येथे गांधी सोबत पहिली भेट 
  • ८ आँक्टोबर १९३१ अल्पसंख्याकाच्या प्रश्नाबाबत गांधीजींच्या धोरणाला गोलमेज परिषदेत विरोध 
  • २६ नोव्हेंबर १९३१ गांधी-आंबेडकर-पंचम जाँर्ज यांची भेट २५ सप्टेंबर १९३२पुणे करारावर स्वाक्षरी 
  • २ जून १९३५ मुंबई विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावर नियुक्ती 
  • १३ आँक्टोबर १९३५ यवला हीन्दु म्हणून जन्माला आलो पण हीन्दु म्हणून मरणार नाही डाँ आंबेडकराची धर्मातराची घोषणा 
  • १५ ऑगस्ट १९३६ स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना
  • १७ फेब्रुवारी १९३७ मुंबई असेम्बली निवडणूक डाँ आंबेडकर विजय 
  • १७ एप्रिल १९४२ अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना 
  • १९४२ मजूर मंञी म्हणून नियुक्ती 
  • २० जून १९४६ मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना 
  • २९ आँगस्ट १९४७ भारताचे पहिले कायदे मंञी म्हणून नियुक्ती 
  • २९ आँगस्ट १९४७ संविधान मसुदा समितीच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती 
  • १५ एप्रिल १९४८ बाबासाहेब यांचा दुसरा परिणय 
  • २६ नोव्हेंबर १९४९ घटना समितीने घटना स्विकार केली 
  • १९ जून १९५० औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना 
  • २७ सप्टेंबर १९५१ हीन्दु कोड बिल व मागास वर्गीयाच्या आरक्षणा बाबत मंञी परिषदेचा राजीनामा 
  • जानेवारी १९५२ प्रथम सर्वाञीक निवडणूक मध्ये पराभव 
  • मार्च १९५२ राज्य सभेसाठी निवड 
  • ५ जून १९५२ कोलंबिया विद्यापीठा तर्फे डाँक्टर आँफ लाँ ही पदवी बहाल 
  • १२ जानेवारी १९५३ हैद्राबाद उस्मानीया विद्यापीठा तर्फे डाँक्टर आँफ लीटरेचर ही पदवी बहाल 
  • मे १९५४ भंडारा पोट निवडणूकी मध्ये पराभव 
  • ४ मे १९५५ भारतीय बौद्ध महासभेची स्थापना 
  • २४ मे १९५६ नरेपार्क येथे आँक्टोबर महिन्यात मी बौद्ध धर्माची दीक्षा घेईल अशी घोषणा 
  • १४ आँक्टोबर १९५६ नागपुरात पुज्य भन्ते महास्थवीर चंद्रमनी यांच्या हस्ते पत्नी सोबत धम्म दीक्षा घेतली व नंतर ५लाख अस्पृश बंधूना बौद्ध धम्माची दीक्षा दिली 
  • १६ आँक्टोबर १९५६ चंद्रपूर येथे २लाख अस्पृश बंधूना धम्म दीक्षा दिली 
  • ६ डिसेंबर १९५६ दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी महानिर्वाण 
  • ७ डिसेंबर १९५६ मुंबई येथे दादर चौपाटीवर १० लाख लोकांच्या साक्षीने बौद्ध पद्धतीनुसार अंतिम संस्कार 
* जय भीम * नमो बुद्धाय * जय भारत * 

“चैत्यभूमी” नव्या क्रांतीचे एक विश्वकेंद्र

ज्या भूमीवर मानवाला मानवतेचे चैत्यन्य व स्फुलिंग मिळते,माणूस म्हणून समतेची मानवसेवा करायला प्रवर्ग होतो ती “चैत्यभूमी”. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या दादर भागात विवेकवाद व  विज्ञाननिष्ठा जपण्याचा मंत्र देणारी चैत्यभूमी. एक अशी भूमी जिथे दरवर्षी देश विदेशाच्या काना-कोपर्‍यातून आलेले लाखो लोक एका अनन्यसाधारण व्यक्तीला लहान मुलापासून तर आबालवृध्दा पर्यंत पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करून अगदी शिस्तीमध्ये गंभीर व भारदस्त मनाने आदरांजली वाहतात तर दुसरीकडे काही काळ स्तब्ध राहून निळ्याभोर समुद्राच्या लाटा आदरांजली वाहत असतात. त्यातच भारताच्या अफाट प्रगतीची साक्ष देणारा सी-लिंकदुरूनच दर्शन घेत त्यांना सलाम मारीत असतो. 
जगातील एकमेव अशी व्यक्ती की जिच्यावर लाखो लोक स्तुतीसुमने वाहन्यासाठी एकत्र येतात, ती व्यक्ती म्हणजेडॉ.बाबासाहेब आंबेडकर. दादरच्या याच चैत्यभूमीवरडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्थिवावर अग्नी संस्कार करण्यात आले. बौध्द संस्कृतीनुसार या स्थळावर एक चैत्य उभारण्यात आला आहे. त्यामुळे या परिसराला ‘चैत्यभूमी’असे म्हणतात. ६ डिसेंबर हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिन. येथे येणारी प्रत्येक व्यक्ती “जयभीम” चा नारा देत ‘बुध्दंम् शरणंम् गच्छामि’ च्या जयघोषात समर्पित होत असते. चैत्यभूमी आता केवळ भिमानुयायांच्या साठीचे आकर्षण केंद्र राहिले नसून ते बहुजनलाही वंदनीय झालेले आहे. देशविदेशातील अनेक मान्यवर मुंबईमध्ये येताच त्यांची पावले दादरच्या चैत्यभूमिकडे वळत असतात.
दादर परिसरातील प्रसिध्द पार्क म्हणजे “शिवाजी पार्क” होय. दरवर्षी ४ ते ६ डिसेंबर ह्या दिवसात शिवाजी पार्क हे “ज्ञानकेंद्र” बनलेले असते. डॉ. आंबेडकरांच्या समृद्ध वैचारिक वारशासोबतच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, वाङ्मयीन विचारांचे प्रतिबिंब ठायी-ठायी उमटताना दिसते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्व:साहित्यासोबतच इतर विद्वानांनी डॉ.आंबेडकर व त्यांच्या कार्यावर विविध भाषेतून केलेले भाष्य पुस्तकीरुपात बघायला मिळत असते. शेकडो पुस्तकांचे स्टॉल्स तसेच गीतांच्या सीडी जागोजागी दिसतअसतात. विविध संस्थांनी उभारलेल्या स्टॉल्समधून पत्रके व पुस्तिकाच्या माध्यमातून चैत्यभूमीवर येणा-यांना ज्ञानार्जीत करून माहितीपत्रकांचे विनामूल्य वाटप केले जाते. या ठिकाणी येणारा जनसमूह मूर्तीपूजक म्हणून येत नसतो तर तो  येथून विवेकवाद, वैज्ञानिक जाणीवा, मानवतावाद, बुद्धिनिष्ठ तर्क व सत्याचा अर्क तसेच समाजपरिवर्तनाच्या चळवळीसाठी नवे विचार व त्याचा प्रसार करण्याच बळ तो घेवून जात असतो. आजचा बहुजनवाद, मुलनिवासीवाद, सत्यशोधक, अंधश्रद्धा व धर्मांधभक्ती विरोध आणि ब्राम्हण्याविरुद्धची सत्यवादी चळवळ हे त्याचेच अपत्य आहे. 
शहरे व खेड्यातून डोक्यावर ओझे घेवून अनवाणी येणारे आबालवृध्द येतात तरी कशासाठी? असे आहे तरी काय या चैत्यभूमीवर? असा प्रश्न येथील प्रस्थापितांना नेहमी पडत असतो. या प्रस्थापितांना  विस्थापितांचे जीवन कसे कष्टमय व अन्यायकारक असते याची मुळातच जाणीव नसते. ते केवळ दुस-यांच्या दु:खावर आपले सुखवस्तू जीवन चैनीमध्ये जगत असतात. अशांना बाबासाहेब म्हणजे आपले शत्रूच वाटत असतात. ज्या आबालवृद्धांनी ज्यांच्यावर आपल्या निष्ठा अर्पण केल्या ते बाबासाहेब होते तरी कोण? बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी केल तरी काय? असे प्रश्न प्रस्थापितांच्या नव्या पिढीसमोर जरूर निर्माण होत असतील? अशांना बाबासाहेब सांगणे हे सुध्दा फार गरजेचे असते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सारखी युगायुगातून एखादीच निर्माण होणारी व्यक्ती असते. संसदेमध्ये श्रध्दांजली देतानानेहरू म्हणाले, हिंदू समाजावरचा कलंक धुवून काढण्यासाठी संसदेने प्रयत्नाची पराकाष्ठा केली आहे परंतु समाजाच्या हाडामासी खोल रुजलेली रुढी केवळ कायद्याने पूर्णपणे नष्ट होत नसते. परंतु बाबासाहेबांच्या तीव्र विरोधामुळे लोकांची मने या प्रकाराविषयी जागरूक बनलेली होती. डाक्टरांनी सात कोटी अस्पृश्यात एक अणुशक्ती व उर्जा निर्माण केली. आचार्य अत्रे म्हणतात त्याप्रमाणे, बाबासाहेब म्हणजे बंड, त्यांच्या देहाच्या कणाकणातून बंड थैमान घालत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुध्द उगारलेली वज्रमूठ, आंबेडकर म्हणजे ढोंग्याच्या डोक्यावर आदळण्यास सदैव सिद्द असलेली भीमाची गदा, आंबेडकर म्हणजे जातीभेद व विषमतेवर सोडलेले सुदर्शन चक्र, आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडाच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्याची आतडी बाहेर काढणारे वाघनख, आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधा-याच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक युध्द. बाबासाहेबांनी, तथागत बुद्ध, संत कबीर व म. फुले हे तीन गुरुच मुळी असे केले की, ज्यांनी देवाचे, धर्माचे, जातीचे आणि भेदाचे थोतांड माजाविणाऱ्या समाजव्यवस्थेविरुध्द बंड पुकारले. बाबासाहेब सत्तेच्या व धर्माच्या जुलुमाला कधीच शरण गेले नाहीत. शरणागती त्यांच्या रक्तातच नव्हती, मोडेन, मार खाईन पण वाकणार नाही, असी त्यांची जिद्द होती ती त्यांनी खरी करून दाखविली. जो तुमचा धर्म मला कुत्र्या मांजरापेक्षाही  हीन रीतीने वागवितो, त्या धर्मात मी कधीही राहणार नाही, असे ते हिंदू धर्मियांना बजावून सांगत. माणसासारख्या माणसांना अस्पृश्य बनविणारी ती तुमची मनुस्मृती मी जाळून टाकणार असे त्यांनी सनातनी हिंदुना छातीवर हात मारून सांगितले होते. बाबासाहेबांच्या याच करारीपनामुळे हिंदुना आंबेडकर हे गझनीच्या महंमदापेक्षा हिंदू धर्माचे भयंकर दुश्मन आहेत असे वाटत असे. आजही हिंदुत्ववाद्यांना बाबासाहेब म्हणजे कोणीतरी भयंकर असेच वाटते.
आचार्य दोंदे बाबासाहेबांना श्रन्दांजली वाहतांना म्हणतात, “जागतिक कीर्तीचा विद्वान” हा महान सन्मान पदरी बांधून भारतामध्ये जन्मास आलेली महान व्यक्ती. या विद्वानाला सुध्दा अनंत हाल सोसावे लागले. खेड्यापाड्यात बॅरीस्टरचे काम करायला निघाले, तर प्रवासात पाणी कोणी द्यायचे नाही, टांगेवाला टांग्यामध्ये घ्यायचा नाही. स्पृश्य समाजापैकी एखादा दुसराच क्लायंट त्यांना लाभायचा. त्यांना शाळेमध्येही प्रवेश मिळेना. मिळाला तर वर्गाच्या दारात त्यांच्यासाठी निराळे बाक, संस्कृत शिकवायचे नाकारल्यामुळे पर्शियन शिकावे लागले. नोकरीत स्पृश्य शिपायाकडून अपमान असे अनेक अपमान पचवून ते बाबासाहेब झालेत. ३१ मे १९३६  रोजी मुंबईमध्ये “मुक्ती कोण पथे” या विषयावर भाषण झाले. ते एका सामाज क्रांतीकारकाचे भाषण होते. साधना साप्ताहिक म्हणते स्वातंत्र्यपूर्व काळात बाबासाहेबांना कट्टर हिंदुत्ववादी वगळता इतर समाजगटात मानसन्मान प्राप्त झाला होता.
बाबासाहेबांचे स्थान कसे उच्च कोटीचे होते हे विदेशी वृत्तपत्रांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेतून प्राप्त होते.  न्यूयार्क टाईम्स आपल्या भावना व्यक्त करताना लिहिते, डॉ. आंबेडकर ६ डिसेंबर १९५६ रोजी निर्वतले. ते जगात सुप्रसिध्द होते. अस्पृश्य जगाचा धुरंधर म्हणून त्यांचा जगातील गौरव विशेष महत्वाचा होता. अस्पश्य समाजात जन्म घेतल्यानंतर त्यांना अत्यंत बिकट परीस्थितीमधून जगावे लागले. परंतु डॉ. आंबेडकरांनी या परिस्थितीलाही आव्हान दिले होते. नैसर्गिक व परिश्रमपूर्वक मिळविलेली बुद्धिमत्ता असल्यामुळे अशा परिस्थितीला कसे आव्हान देता येवू शकते? याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डाक्टर आंबेडकर होत. भारतीय अस्पृश्यांचा प्रश्न सोडविण्याचा सर्वोत्कृष्ठ उपाय कोणता? याबाबत मोहनदास के. गांधी यांचेसोबत आंबेडकरांचे मतभेद झाले तरी ही गोष्ट निर्विवाद आहे की, आंबेडकरांचा अस्पृश्यांचे प्रश्न सोडविन्याबाबतचा दृष्टीकोन गांधीपेक्षा अधिक कायदेशिरपणाचा होता. भारताच्या शासनाचा कायदेशीर पाया मुख्यत: डाक्टर आंबेडकर यांनी बसविला. भारतीय घटनेचे आंबेडकरच खरेखुरे शिल्पकार होते. आंबेडकर जगातील एक महान व्यक्ती होती. ते आपल्यासभोवार असलेल्या परिस्थितीतून व साधनातून उत्कृष्ट मार्ग शोधीत असत. त्यांचे गांधीबरोबर एकमत झाले नाही आणि त्यांनी नेहरुचे मंत्रिमंडळ केवळ मतभेदानेच सोडले. त्यांनी आपल्या कर्तुत्वाने वैशिष्ठपूर्ण दर्जाच्या प्रथा पाडल्या होत्या. आणि त्या प्रथेनुसार आंबेडकर सतत वागले. त्यांच्या अनेक महान कार्यांपैकी काही कार्यांना फळे यावयास वेळ लागेल. मात्र आंबेडकरांचा प्रभाव हा अपुर्वपणे भारतावर पडलेला आहे. त्यांच्या कार्याचा व त्यांचा बहुमान राखण्यातच भारताचे शहाणपण आहे. (न्यूयार्क टाईम्स, इंटरनशनल ८.१२.१९५६)
लंडन टाईम्स बाबासाहेबांना अभिवादन करताना म्हणते, भारतातील सामाजिक व राजकीय घटनांच्या कोणत्याही इतिहासात आंबेडकराचे नाव अजरामर झाल्याशिवाय राहणार नाही. हिंदू धर्माच्या जातीव्यवस्थेमुळे अपमानस्पद वागणूक मिळाली. तरीदेखील आंबेडकरांनी बहुमानाचा व नेतृत्वाचा मार्ग बरोबर काढला. ते शरीराने व बुद्धीने फार मोठे होते. निश्चय व धैर्य ही जणू त्यांच्या चेहऱ्यावर लिहिल्याप्रमाणे दुग्गोच्चार होत होती. त्यांनी तिन्ही खंडामध्ये अध्ययन करून ज्ञान मिळविले होते. अमेरिकेतील न्यूयार्क मधील कोलंबिया युनिव्हर्सिटी मध्ये त्यांनी अर्थशास्त्र व समाजशास्त्र याचा दीर्घ अभ्यास केला. त्यांनी बॉन युनिव्हर्सिटीत देखील अभ्यास केला. लंडनच्या स्कूल ऑफ एकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी संशोधनाचे कार्य केले. त्यांचा अभ्यास इंडिया ऑफीस मध्ये चालत असे. आंबेडकरांची बुद्धी व लेखणी कामात सतत गर्क असायची. “कांग्रेस व गांधीनी अस्पृशांचे काय नुकसान केले” या नावाचा जो ग्रंथ लिहिला आहे. त्यामध्ये आंबेडकरांच्या चळवळीची संपूर्ण कथा आहे. त्यांनी पाकीस्तानावर ग्रंथ लिहिला त्याचप्रमाणे रुपयाचा प्रश्न, भारतीय भांडवलाची वाढ व विकास अशा अनेक महत्वाच्या विषयावर ग्रंथ लिहिले आहेत. भारताची घटना देखील त्यांच्या लेखणीतून तयार झाली. जीवनाच्या अखेरपर्यंत त्यानी अंगीकारलेली कामे चालविली होती. त्यांच्या आयुष्यातील शेवटचा अविष्कार म्हणजे त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौध्द धर्माचा केलेला स्वीकार होय. ( दिनांक: ०८.१२.१९५६) तर मँचेस्टर गार्डियन बाबासाहेबांचा धन्यवाद देताना म्हणते, भारतीय बिगर मुसलमान पुढा-यापैकी ज्या मोजक्या पुढा-यावर गांधीजीचा प्रभाव कधीच पडू शकला नाही त्यापैकी डॉ.आंबेडकर एक प्रमुख  होत. गांधीजींच्या विचारामुळे भारतातील जातीव्यवस्था तशीच पुढे सदासर्वकाळ राहील असे वाटत असे. हिंदू लोकांच्या हातात अस्पृश्य मानलेल्या समाजाचे भवितव्य सुरक्षित राहील असा आंबेडकरांना विश्वास वाटत नव्हता. हिंदुपैकी काहीजन तात्पुरते प्रगतीकारक व हितकारक असले तरी अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांचे कल्याण त्यांचे हातून घडणार असे त्यांना सतत वाटत असे. म्हणूनच अस्पृश्य समाजाकरिता स्वतंत्र मतदार संघ असावा अशी अतिशय आग्रहाची मागणी आंबेडकरांनी केली होती. पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी स्वतंत्र मतदार संघाची मागणी मान्य केल्यावर गांधीनी निकराचा उपवास आरंभला. डॉ. आंबेडकरावर गांधीच्या मित्राचे खूप दडपण आले व त्यामुळे आंबेडकरांना आपला मार्ग सोडणे भाग पडून गांधीचा जीव वाचविला. हिंदू लोकासबंधीचा आंबेडकरांना वाटणारा अविश्वास त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत कायम राहिला. ते नुकतेच लाखो अनुयायांसह बौद्धजन बनले. अस्पृश्यतेविरुध्द आंबेडकरांनी प्रचंड लोकमत तयार केले, व त्या लोकमतामुळे, अस्पृश्यांच्या कल्याणाची दखल घेण्यात आली. एवढेच नव्हे तर, नोकऱ्या व शैक्षणिक संस्था यामध्ये अस्पृश्य लोकांना खास व विशिष्ठ असे अधिकार प्राप्त झाले. (०७.१२.१९५६).
डाक्टर आंबेडकरांचे जीवन म्हणजे अखंड झगडा होता. अस्पृश्यतेचे चटके त्यांना लहानपणापासून खावे लागले. कुशाग्र बुद्धी असली तरी शाळेत, महाविद्यालयात, कोर्टात वा समाजात त्यांना अस्पृश्य म्हणून वागविले जात होते. सर्व प्रकारची लायकी व कर्तबगारी असतानाही केवळ जातीमुळेच आपणाला बाजूला सारले जात आहे. आपला अपमान होतो हे त्यांना समजत होते. माझ्याबाबतीमध्ये जर असे होत असेल, तर माझे अशिक्षित समाजबांधव कोणत्या परिस्थितीमध्ये जगत असतील? यावर ते गंभीर होत असत. यातूनच मग एका बंडखोरांचा जन्म झाला. या बंडखोरीतूनच शिक्षण संस्था, वृत्तपत्रे, सामाजिक संस्था निर्माण करीत राजकीय व सामाजिक चळवळी उभारून शोषितांच्या मनात बंडाच्या भावना निर्माण केल्या.
  
ज्या व्यवस्थेविरोधात बाबासाहेब झगडले त्या व्यवस्थेचा उगम असलेल्या मनुस्मृतीला बेकायदा ठरवून नवीन व्यवस्था निर्मितीचे संपूर्ण श्रेय त्यांच्याकडेच जाते. डाक्टर आंबेडकरांच्यातील बंडखोर कधीही झोपी गेला नाही. केवळ कायद्याने बंदी करून अस्पृश्यता व वर्णव्यवस्था नष्ट होत नाही हे जेव्हा दिसले. तेव्हा  ती नष्ट करण्यास अत्यंत उतावीळ झालेल्या बाबासाहेबांना मग “मी हिंदू धर्मात जन्मलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही” अशी घोषना करावी लागली. ते म्हणत, जो धर्म माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला पटेल, माझ्या मनाची पूर्ण खात्री करून देईल त्याच वेळी मी करून ठेवलेल्या धर्मांतराच्या नावेत माझ्या सात कोटी बांधवांना बसवून त्यांना अगदी सुरक्षितरीत्या पैल तीराला घेवून जाईल, आणि त्याचे जीवन स्थिरस्थावर करीन. पुढे आयुष्याच्या उत्तरार्धात बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्यांनी आपल्या कोट्यावधी अनुयायांना मानव मुक्तीचा नवा प्रकाश दिला. आधुनिक विवेकवादाने धार्मिक श्रध्देपुढे उभ्या केलेल्या आव्हानाला तत्वज्ञानाच्या पातळीवर उत्तर देण्याचा प्रयत्न आंबेडकरी अनुयायांकडून होतो आहे.
बाबासाहेबांचे तिसरे मोठे धर्मांतर मुंबई येथे होवू घातलेले होते. परंतु त्याअगोदरच काळाने झेप घेत त्यांना बुद्धवास प्राप्त झाला. बाबासाहेब आज नसले तरी त्यांच्या विद्वतेचा आणि नैतिकतेचा फार मोठा वारसा सामाजिक परीवर्तनवाद्यासाठीमागे ठेवला आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या बोधी विचारांचीशिदोरीच शोषितांचे उभे आयुष्य उजळवून टाकेल, माणूसम्हणून त्याला सन्मान मिळेल व शोषकाचे आक्रमण परतवून लावण्यास सक्षम आहे.
चैत्यभूमिवरील गर्दी म्हणजे वास्तव भारताचे प्रातिनिधिक रूप आहे. अभिवादन करण्यासाठी येणा-या गर्दीच्या शिस्तीची दखल सर्वानाच घ्यावी लागते परंतु या देशातील मुख्य वृत्तपत्रे व इलेक्ट्रानिक मिडिया या मोठ्या समूहाकडे पाठ फिरविताना दिसते. जातीयवाद व वर्णव्यवस्थेचा अहंगड हे त्यामागील कारण आहे. परंतु नाउमेद होतील असे आंबेडकरवादी कसे? आंबेडकरांच्या अनुयायांनी यावरही मात केली. त्यांनी विविध वर्तमानपत्रे (महानायक, सम्राट, लोकनायक), इलेक्ट्रानिक मिडिया केंन्द्रे ( लार्ड बुद्धा टीव्ही, आवाज इंडिया, महाबोधी चॅनेल) व अनेक पाक्षिके, मासिके चालवून परिवर्तनाच्या चळवळीत झोकून दिले आहे.
विवेकवाद, बुध्दिप्रामान्यता व विज्ञानवाद हा आंबेडकरी अनुयायांचा सकस आहारच असतो. भंपक धर्मवाद, अंधश्रद्धा, देवपूजा व मंत्रपठण अशा वाह्यात बाबी त्यांना रुचनारच कशा? आपले अशिक्षित बांधव हिंदू धर्मवाद्यांच्या अंध्दश्रध्देला बळी पडला याची जाणीव त्यांना आहेच. यातुनच २२ प्रतिज्ञा अभियानांसारखे प्रकल्प उभे राहिले. श्री अरविंद सोनटक्के सारखे सामाजिक कार्यकर्ते दरवर्षी चैत्यभूमीवरमनगटाभोवती पांढरे धागे गुंडाळने, विभूतीपुजा, गळ्यात साई व इतर देवाची प्रतीके लटकाविना-या अशिक्षित बांधवांचे प्रबोधन करीत गंडदोरे व गळ्यातील तोडतात व त्यांचे सार्वजनिकरित्या दहन केल्या जाते. बहुजन समाजातील अंधश्रद्धा घालविण्याचे कार्य आंबेडकरांच्या विचाराच्या प्रयत्नातूनच होत आहे.
मनुष्याला जीवनात खरे सुख, समाधान व मुक्ती मिळवायची असेल तर ती बौध्द धम्मातच मिळू शकेल अशी ज्यांची खात्री झाली असे अनेक बुद्ध धम्मास शरण गेले. त्यात सुरेश भट, रुपा कुलकर्णी, लक्ष्मण  माने या सारख्या अनेक साहित्यिकांचा समावेश आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात जागोजागी धर्मांतरे झाली. २९ सप्टेंबर १९९० आग्रा येथे दोन लाख दलितांनी हिंदू धर्म त्यागून बौध्द धर्म स्वीकारला. आग्रा, मथुरा, एटा, फिरोजाबाद, मैनपुरी, अलीगढ़या १२ जिल्ह्यातील दलितांनी हे सामुहिक धर्मांतर केले. या धर्मांतराच्या स्फुर्तीमधून कानपुर येथे ५० लोकांनी १८ नोव्हेंबर १९९० बौद्ध धम्म स्वीकारला. छत्तीसगढ येथे हजारो सतनामी समुदायांनी १९९० मध्ये धम्म स्वीकारला. दक्षिण भारतात सुध्दा धर्मांतर गतिमान झाले. १९९० मध्ये  आंध्रप्रदेश मध्ये हजारो माला व मादिगा या जातींनी भिक्षु संघरक्षित यांच्या हस्ते बौध्द धम्म स्वीकारला. ४ नोव्हेंबर २००१ रोजी उदित राज यांनी ५० हजार दलितांना सोबत घेवून दिल्ली येथे धर्मांतर केले. जगात विपश्यनेच्या माध्यमातूनसुध्दा बुद्ध धर्माचे तत्वज्ञान व त्याच्या प्रसाराचे काम चालू असताना दिसते. देशात आंबेडकरी अनुयायी मोठ्या प्रमाणात बुद्धाच्या विपश्यनेचा प्रचार करून बुद्ध तत्वज्ञान जागृत करू पहात आहेत.
बाबासाहेब अस्पृश्य जनतेला उद्देशून म्हणाले होते, तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाटेला कोणीही जाणार नाहीत. मेंढरांचा कोणीही बळी देतो, वाघाचा कोणीही बळी देतो का? खाटेवर बसून चालणार नाही. दुसऱ्यावर विसंबून राहू नका. हिंमतवान बना! तुम्ही दिव्याप्रमाणे स्वंयप्रकाशित व्हा. स्वत:वरच विश्वास ठेवा. दुसऱ्या कोणाचे अंकित होवू नका, सत्याला धरून रहा व दुसऱ्या कोणाला शरण जावू नका. तुम्हीच आपले आधार व्हा. स्वत:च्या बुद्धीला शरण जा, दुसऱ्या कोणालाही वश होवू नका. सत्यालाच शरण जा हा बाबासाहेबांचा उपदेश केवळ अस्पृश्याना नव्हे तर अखिल मानवजातीसाठीचा संदेश होता.
आज देशातील राजकारण, समाजकारण, धर्म, शिक्षण या सर्वच क्षेत्रांमध्ये घडणा-या घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नांच्या चिंध्या करणा-या घटना आहेत. बाबासाहेबांच्या नामाचा गजर करत बाबासाहेबांना नाकारण्याची स्पर्धा देशाच्या राजकारणात, समाजकारणात आणि धर्मक्षेत्रातही सुरू आहे. आजचा काळ हा लोकशाही,समाजवाद, सेक्युलॅरिझम आणि सर्वकल्याणकारी स्वप्नांच्या हत्यांचा काळ आहे. माणसांची स्वप्ने मारली की माणसांना वेगळे मारण्याची गरज नसते. आजचा काळ हा स्वप्न मेलेल्या लाचारांचा, लोभ्यांचा आणि बेईमानांच्या बेसुमार गर्दीचा काळ आहे. एकावर एक संकटे आ वासून समोर उभे आहेत तरीही काहीजन दुस-यांची गुलामी करण्यात गर्क आहेत तर काही केवळ आपला इगो व आपले वेगळेपण शाबूत ठेवण्यासाठी दुकानदा-या मांडून बसलेले दिसतात. शहाणपणाच्याउजेडापासून फारकत घेवून त्यांनी आपले जनावरीकरणकायम ठेवले आहे. या अवस्थेमध्ये नव्या दमाच्या तरुण पिढीची प्रचंड घुसमट होतेय. देशभरात दलित समाजाबाबत घडत असलेली एकाहून एक अन्यायकारक प्रकरणं उघड्या डोळ्यांनी पाहिल्यावरही काहीही करू शकत नसल्याची चीड त्यांच्यात खदखदतेय. तरुणांच्या या घुसमटीचा उद्रेक या चैत्यभूमिवरून झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ते क्रांतीच प्रेरणाकेंद्रच आहे. तेव्हा संपूर्ण विश्वच बघेल की, या दुकानदारांना आपापले दुकान बंद करण्यावाचून गत्यंतर उरणार नाही. त्यासाठी चैत्यभूमिवरून पुन्हा एकदा संघटित व्हा आणि संघर्ष करा या संदेशाचे पुनर्जागरण होण्याची गरज आहे.