नको भीमराव नोटेवर


विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो भारतातील सर्व बहुजन,उपेक्षित समाजाला 1000 च्या नोटेवर हवेत
पण एक कवी कवितेतून काय म्हणतो ते पहा ••••
"नकोय भिमराव नोटेवर"
नकोय भिमराव आम्हा नोटेवर |
विकला जाईल तो वाटेवर ||
आहेत समाजात काही दरिंदे |
नाहीत ते कुठलेच परिंदे ||
घेऊन जातील भिमराव दारुच्या अड्यावर |
लावतील त्यालाही सट्यावर ||
म्हणतील,भिमराव घ्या |
अन् दारू द्या ||
होतील ते पिऊन तराट |
माजवतील कल्लोळ घरात ||
नाचणारींवर जाईल पैसा उधळला |
नाचता-नाचता तोही जाईल तुडवला ||
फोफावला आहे भ्रष्टाचार |
नाही उरलेला शिष्टाचार ||
भाटाच्या ताटी जाईल थोपवला |
गणीकांच्या हाती जाईल भिमराव सोपवला ||
खाटीकाच्या दुकानात जातील घेऊन त्याला |
मंदिरात येतील देवासमोर ठेवुन त्याला ||
नाही विकणाऱ्यांमधला तो |
नाही मांडायचा आम्हाला त्याचा शो ||
फाटुन जाईल हृदय आमचं |
नाही ऐकणार आम्ही तुमचं ||
राहुद्या तुमचा गांधीच नोटेवर ||
भिमराव आमचा शोभतोय टाय अन् कोटावर ||

नमो बुद्धाय! जयभिम! जय भारत!  

विचार करा मित्रांनो आणि आपले मत काय आहे ते जर्रों कमेंट करा। 

गुलामीचे मुळ कारण :ब्राम्हणवाद


भारतात लोकशाही उदयास आली आणि तेव्हापासुन. ते आजपर्यंत लोकशाहीचे चारही स्तंभावर ब्राम्हणी व्यवस्थेचा अविरत कब्जा आहे.
१)संसद
-संसदेत आज राष्ट्रीय पातळीवर काम करणारे चारही पक्ष ब्राम्हणांचे
१)काँग्रेस २)भाजपा ३)त्रुनमुल काँग्रेस ४)कम्युनिस्ट
आजसुद्धा बहुजनांचा एक हि पक्ष राष्ट्रीय नाहि.पण क्षेञिय पक्ष लोकसभा, विधानसभा निवडनुकित चारही ब्राम्हणी पक्षांशी साटेलोटे करतात.आणि बहुजनाशी धोकेबाजी
कारण निवडून जाताना खासदार आमचा असतो पण निवडून गेल्यानंतर तो पक्षाचा होतो
खासदार हा कायदा पारित करण्यासाठी जातो पण आमचा खासदार जांभई द्यायलाच तोंड उघडतो.
अर्थात आमचे खासदार आणि आमदार समाजापेक्षा पक्षाचे गुणगान गातात.कारण पक्षाने निवडून जातानाच त्याना ठेचून घालवलेले असतात.
(जे काम करतात त्यांना सलाम)
२)न्यायपालिका
कार्मिक मंञालयाच्या रिपोर्ट नुसार न्यायव्यवस्थेत काम करणारे ३१च्या ३१उच्च सर न्यायाधीश ब्राम्हण.
अाज एखादी केस घातली तर माणूस मेल्यावर किंवा दुसर्या तिसर्या पिेढीला निकाल मिळतो.
म्हणूनच एक म्हण प्रचलित आहे
"शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढु नये"
याचा अर्थ कायद्याबद्दल आमच्या मनात भीती निर्माण करण्याचं काम ब्राम्हणी व्यवस्थेने केलं आहे.(अशा खूप गोष्टी आहेत)
३)प्रशासन
आज भारतात आय ए एस अधिकारी ३६०० आहेत
आरक्षणानुसार
मराठा ओबीसी
पाहिजेत१८७२
आहेत. ५०
मुस्लिम व इतर
पाहिजेत. ३७८.
आहेत. ००
अनुसूचीत जाति व जामाती पाहिजेत ८१०
आहेत. ६००
आणि सर्वात भयानक
ब्राम्हण
पाहिजेत ५४०
आहेत. २९५०
याचा अर्थ आमच्या मराठा बांधवांना आजपर्यंत सांगितले कि तुमच्या नोकर्या म्हारामांगानी पळवल्या पण म्हारामांगाच्याहि जागा पळवून नेण्याचं काम ब्राम्हणानी केलं आहे
आता राहिला शेवटचा मुद्दा
४)मिडिया
- आज भारतात असणारे सर्व चॅनल वर ब्राम्हणी व्यवस्थेचा कब्जा आहे.
न्यूज, चिंञपट,मालिका ,क्रिकेट यामधून ब्राम्हणवाद मोठ्या प्रमाणात पसरवण्याचे काम मिडिया करताना दिसतो आहे.
ग्लोबेलचा एक नियम आहे एखादी असत्य गोष्ट वारंवार सांगितल्या ने ती सत्य वाटते म्हणून मिडिया खोटं मोठं करुन सांगत असतो.
त्यासाठी काहि उदाहरणे देतो.
आज टीव्ही चॅनल वर सात ते दहा या वेळेत ज्या मालिका दाखविल्या जातात त्यातुन सररास व्यभिचार शिकवला जातो.ज्या घरातील स्ञि गुलाम ते कुटुंब गुलाम होत
बहुजन संमाजातिल स्ञियाना व्यभिचारी बनवि्याचं षड् यं ञ मालिकांच्य माध्यमातुन होत आहे.
एका. एका बाईचे चार चार नवरे
चार चार बायका
काय घ्यायचा आदर्श ?
आमच्या स्ञियानी,मुलिंनी?
विदेशात करमणुकीचे चार टक्के दाखविले जाते आणि भारतात ९४%
कसा सुधारणार समाज?
आज अन्याय,अत्यचार, बलात्कार याला जबाबदार ब्राम्हण आहे.
पण आम्ही षंड् झालो आहोत.
आमच्या भावना बोथट झाल्या आहेत.आपल्या पोराबाळांना सोबत घेऊन उघड्या नागड्या ब्राम्हण पोरिंचा अश्लील नाच बघणार्या बापाला अाज आम्ही समजावून सांगतो तेव्हा आमचं बोलणं जहाल वाटतं
.गुळगुळीत आणि बुळबुळीत बोलून लोकं जागी होणार नाहीत तर जहाल बोलून जा्ग्रुत करणार्यांना आम्हि नालायक ठरवतो.
ज्या संविधानात बहुजन समाजाचं ,आमचं भविष्य लपलं आहे.ते डोळ्यासमोर संपत आहे.
तरीही आम्हि थंड.
कलम क्रम ४५नुसार आम्हाला प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं त्याचं खाजगीकरण केलं
पहिली ते आठवी परिक्षा बंद केल्या
आमच्या पोरास्नि आय आय टी, आय आय एम, इस्ञो, माहितच करु दिलं नाहि आमची पोरं आय टी आय करुन कामगार होण्याचं स्वप्न बघतात
पण कलेक्टर बनण्याचं त्याचं स्वप्न ब्राम्हणी व्यवस्थेनं हिसकावून घेतल आहे.खाजगीकरण जागतिकिकरण, उधारिकरण करुन आम्हाला मातीमोल केलं आणि उद्योगपतिना मालामाल.
येणार्या काळात आपल्या डोळ्यासमोर आमची पोरं टाचा घासुन मरतील आणि आम्ही फक्त आसुसल्या नजरेनं पाहत राहू.
आज सरकारी, निमसरकारी नोकरदारानी सुद्धा आविर्भावात राहण्याची गरज नाहि कारण त्यांचे तर खुप हाल होणार आहेत
म्हणून आज लोकांना आम्ही खर्या गोष्टी सोशल मिडियाच्य माध्यमातून सांगत असतो कारण ब्राम्हण सोशल मिडियावर बंदि घालु शकत नाहि .
पण. आज आमची पोर सोशल मिडिया फक्त गुळगुळित बोलण्यासाठि,गप्पा मारण्यासाठी वापरतात, ग्रुपवर जेवलास का ?
जोक्स, टाकून चैनी, गम्मतीचं जीवन जगू इच्छितात.
पण. हि वेळ गम्मत करण्याची नाहि तर स्वताच्या डोक्यावर स्वताचा मेंदू ठेऊन विचार करण्याची आहे.
नाहीतर काळ आपल्याला माफ करणार नाहि.
कारण आमचा शञु कोणी मुस्लिम,जैन,लिंगायत,बौद्ध, ख्रिश्चन बहुजन नाहीत तर
आमचा एकच शञु ब्राम्हणव
कदाचित आपल्याला माझी भाषा पचेल न पचेल पण तर्काची भाकरी विचारांच्या चटणीसोबत एकदा खाऊन बघा. नाहीच पचली तर उलटी करुन थुकुन टाका.

ब्राह्मणायझेशन्' म्हणजे काय ?



ब्राह्मणायझेशन्' म्हणजे काय ? हे समजणे खुप गरजेचे व अतिआवश्यक बनलेले आहे.
जोपर्यंत आपल्याला हे समजत नाही तोपर्यंत आपण "डीब्राह्मणायझेशन " करू शकत नाही.
ब्राह्मणायझेशन म्हणजे नेमके काय हे थोडे विस्ताराने सांगणे गरजेचे आहे. ब्राह्मणायझेशन म्हणजे ब्राह्मण अनुकूल विचार करणे.
ज्या वेळी आपल्या महापुरूषांनी प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेशी संघर्ष केला तो संघर्ष आपणाला कळू नये म्हणून त्यांच्या संघर्षगाथेला त्यांच्या क्रांतीकारी विचारांना ब्राह्मण अनुकूल बनविणे म्हणजे ब्राह्मणायझेशन.
महापुरूषांचे क्रांतीकारी विचार लपवून त्यामध्ये मिलावट करून ते विचार विकृत स्वरुपात तुमच्याच समोर सादर करणे म्हणजे ब्राह्मणायझेशन.
आता काही उदाहरणच घेवू.
१. *लिंगायत धर्म संस्थापक
"महात्मा बसवण्णा"
हे नागवंशी आहेत. पण बसवण्णा ब्राह्मण होते हे सांगण हे ब्राह्मणायझेशन आहे.
त्यांच्या शिल्पाशेजारी ब्राह्मण गुरू उभा करणे हे ब्राह्मणायझेशन आहे. त्यांच्या वचनात ते स्वत म्हणतात मातंग मादार चेन्नयाचा पुत्र आहे मी*
*आपली लोक जास्त खोल तर्कशील वाचन करीत नाहीत. कारण आम्हाला तर्कपूर्ण अभ्यास पद्धती अभ्यासक्रमामध्ये शिकविलीच नाही. कारण अभ्यासक्रम नियंत्रण मंडळावर ब्राह्मणांचा कब्जा.आणि कुठलाही कब्जा हा बेकायदेशीरच असतो*
२ संत शिरोमणी
"गुरू रविदास "
हे उत्तर भारतातील क्रांतीकारी संत. त्यांच्याबद्दल सुद्धा असच.त्यांचे गुरू रामानंद नावाचे ब्राह्मण होते असा प्रचार करणे म्हणजे ब्राह्मणायझेशन होय.
त्यांच्या नावावर चमत्कारीत कथा प्रसारीत करणे म्हणजे ब्राह्मणायझेशन.
या देशामध्ये फार पूर्वीपासून ब्राह्मण विरूद्ध अब्राह्मण असा दोन विरुद्ध विचारधारेचा संघर्ष आहे.
यालाच आर्य-अनार्य, सुर-असुर, वैदिक-अवैदिक अशीसुद्धा नावे आहेत.
सध्या ब्राह्मण हिंदूच्या बुरख्याआड लपल्याने आपल्या लोकांना प्रत्यक्ष दिसत नाही.
आता हे बघा रविदासांचे समकालीन ब्राह्मण कवी तुलसीदास रामचरीतमानसमध्ये म्हणतात
पुजिए विप्र (विप्र म्हणजे ब्राह्मण) गुणग्यान शिलविहीणा,ना पुजिए शुद्र गुणग्यान शिलप्रविणा.
म्हणजेच ब्राह्मण कितीही गुणहीन असला तरी त्याचीच पुजा करावी पण शुद्र कितीही गुणवाण व शिलप्रवीण असला तरी त्याची पुजा करायची नाही.
आता आपले महापुरूष संत रविदास तुलसीदासाला उत्तर देताना काय म्हणतात पहा,
"ब्राह्मण मत पुजिए जो होए गुणहीन,
पुजही चरण चंडालके जो होए गुणप्रविण."
*म्हणजे जो गुणवान आहे जरी तो चांडाळ असेल तरी त्याची पुजा करा. गुणहीन ब्राह्मणांची पुजा करू नका. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य हा की हा दोन विरूद्ध विचारधारांचा संघर्ष आहे*
*वारकरी आंदोलन हे प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेवर वार करण्याचे आंदोलन होते.त्याला भक्ती आंदोलन म्हणणे हे ब्राह्मणायझेशन आहे*
३."संत नामदेव "
हे खरे वारकरी आंदोलनाचे संस्थापक. त्यांनी प्रबोधनाकरीता किर्तनाचा आधार घेवून पंजाबमध्ये दौरे काढले.
नाचु किर्तनाचे रंगी,
द्नानदिप लावू जगी
असा संदेश देणाऱ्या नामदेवांना पंजाबमध्ये घुमान या ठिकाणी अल्लाउद्दीन खिलजी या मुस्लीम शासकाने जागा दिली.
संत नामदेव, संत कबीर,संत रविदास यांच्या प्रबोधनामुळे पंजाबमध्ये गुरूनानक यांनी शीख धर्माची स्थापना केली.शीखांचा धर्मग्रंथ
"गुरू ग्रंथसाहेब "
मध्ये वरील तिन्ही संताचे अभंग आहेत.
अशा नामदेवांचे नावही न घेता फक्त माऊली माऊली करणे हे *ब्राह्मणायझेशन*आहे.
४. "संत तुकाराम "
*ज्यांनी वैकुंठ नाकारला त्यांचा खुन करून त्यांचे गुरू रामेश्वर भट व मंबाजी भट यांना दाखवणे व संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेले असा प्रचार करणे हे ब्राह्मणायझेशन आहे*
५."कुळवाडीभुषण बहुजनप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज"
यांची *गोब्राह्मण प्रतिपालक अशी प्रतिमा करणे हे ब्राह्मणायझेशन आहे*
*शिवाजी महाराज यांना भवानी मातेने तलवार दिल्याने महाराज पराक्रम करू शकले असे लिहीणे सांगणे हे ब्राह्मणायझेशन तर आहेच पण त्यांचा पराक्रम झाकण्याचा प्रकार आहे*
*कारण महाराजांनी तलवार बनवून घेतली होती याचे पुरावे समोर आलेत*
*शिवचरित्र लिहीताना नकली शिवशाहीर जाणुनबुजून दादू कोंडदेव यांना महाराज व जिजाऊं सोबत दाखवणं हे ब्राह्मणायझेशन आहे*
६. *छत्रपती शिवाजी महाराज यांची सर्व प्रथम समाधी शोधून सर्व प्रथम पुस्तक पोवाडा लिहीणारे व शिवजयंती सुरू करणारे*
" राष्ट्रपिता जोतीराव फुले"
*यांना शिवशाहीर न म्हणता ब.मो.पुरंदरेला म्हणणे हे ब्राह्मणायझेशन आहे*
७.इंग्रजांविरूद्ध पहिले बंड करून स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन करनारे *आद्य क्रांतीकारक नरवीर उमाजी नाईक (खोमणे)* यांचे शौर्य झाकून ठेऊन नाना फडणीस सारख्या बुळचट भटाला आद्य क्रांतिकारक संबोधने म्हणजे *ब्राह्मणायझेशन* आहे.
८. आधुनिक भारतामध्ये सर्वात प्रथम महिलांच्या शिक्षणाकरीता संघर्ष करणाऱ्या
"क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले"
यांच्या पुजनाऐवजी अन्य ( अस्तित्वात नसणाऱ्या  ) कुणाचे पुजन करणे हे *ब्राह्मणायझेशन* आहे.
९. "तेली,तंबोळी,कुणबटांनी काय संसदेमध्ये जावून नांगर हाकायचा आहे काय ?",  *असे म्हणणाऱ्या बाळ केशव गंगाधर टिळकाला 'लोकमान्य' म्हणणे म्हणजे ब्राह्मणायझेशन आहे*
१०. खरे स्वातंत्रवीर
"क्रांतीसिंह नाना पाटील"
यांचा ईतिहास झाकून ईंग्रजांना माफीनामे पाठवून तुरूंगातून सुटून ईंग्रजांच्या पेंशनवर जगणाऱ्या 'माफीवीर' विनायक सावरकरला स्वातंत्रवीर म्हणणे हे *ब्राह्मणायझेशन*आहे.
*त्यामुळे ब्राह्मणायझेशन ओळखा*
*ब्राह्मणीकरण ओळखा*
म्हणजे *डीब्राह्मणायझेशन*करणे सोपे जाईल.
आणि 'डीब्राह्मणायझेशन' झाल्याशिवाय
"व्यवस्था परिवर्तन"u'
होणार नाही....
*फक्त वाचू नका.....*
*विचारही करा......*

* जय भीम *  नमो बुध्दाय * जय भारत * 



अम्बेद्कड़ म्हनजे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे .......
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे
पददलितांना वाचा फोडणारे नीलकंठ
मणी.....
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे
दलितांना गुलामगिरीतून बाहेर काढणारे
बुद्धिवंत योद्धे .......
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे धर्म
रूढींना मूठमाती देणारे विद्वान
महामानव .....
* डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणजे
दीनांचे मनोधैर्य वाढविणारे प्रमुख
पंडित.....
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे
पिढ्यानपिढ्या दलितांचे धर्म छळाचे
उत्तर .......
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे
जाती जुलमाविरुद्ध
उगारलेली वज्रमुठ .....
* डॉ .बाबासाहेब आंबेडकर म्हणजे धर्म-
वर्ण वर्चस्वाचा कोथळा बाहेर
काढणारी वाघनखे .......
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे पंख
छाटलेल्या पक्ष्यांना उड्डाणाचे बळ
देणारे ....
* डॉ .बाबासाहेब आंबेडकर म्हणजे
जातीभेदावर सोडलेले अस्त्र ......
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे
वजनदार सत्ताधाऱ्याविरुद्ध पुकारलेले
बंड....
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे
नव्या समाजाची रचना करणरे
शिल्पकार ....
* डॉ .बाबासाहेब आंबेडकर म्हणजे महान
चारित्र्याचा कळस .......
* डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणजे
ठिणगीला ज्वालामुखी करणारा
विद्वत्तेचा फुंकर........
* डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणजे
निष्ठावंत ध्येयवादी समाज सुधारक ....
* डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणजे
पार्लमेंटमधील कोहिनूर हिरा ......
* डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जन
कल्याणासाठी चंदनाप्रमाणे झिजणारे
महापुरुष .........
* डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणजे
मनुस्मृती दहन करणारे हिंदू धर्माचे
कर्दनकाळ .......
* डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हिंदू
कोड बिलाला वाचा फोडणारे स्त्री
स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते .......
* डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणजे
महाडच्या चवदार
तळ्याच्या पाण्याला गोड
करणारे अमृत ........
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे धम्माचे
पुनर्जीवि दर्शन घडविणारे
बोधिसत्व .......
* डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणजे
चैत्यभूमी ठिकाणी महासागराला मागे
हटविणारे दिव्य पुरुष ......
* जय भीम * जय भारत *  नमो बुद्धाय *

काय केल आंबेडकरांनी

डॉ . बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या बद्दल काही न माहित असलेल्या गोष्टी :- जगातील अव्वल प्रतिभावान मनुष्य म्हणून सम्मान ( काम्ब्रीज विद्यापीठ )- स्त्री वर्गासाठी असलेले "हिंदू कोड बिल " जेव्हा नेहरूंनी फेटाळले , तेव्हा कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला आणि पुढे झटून बिल पास केले . पण कुठलीही स्त्री संघटना आज त्यांच्या ह्या महत्वपूर्ण योगदाना बद्दल बोलताना दिसत नाही.- रिझर्व बँक ऑफ इंडिया ची कल्पना ही बाबासाहेबंचीच (१९३४, हिल्ल्तन यंग कमिशन )- दामोदर नदी प्रकल्प , हिराकुंद प्रकल्प , सोने नदी प्रकल्प ह्या मार्फत महानदी ला नियंत्रित करण्याची कल्पना सर्वस्व बाबासाहेबंचीच पण नंतर नेहरूंनी आपली म्हणून जगासमोर आणली .- भारतीय कामगार व कर्मचारी वर्गाचे दैवत ( कामाचे तास १२ तासांवरून ८ तासांवर आणले )- Central Water Irrigation & Navigation Commission(मार्च १९४४) ची स्थापना करून भारत देशात प्रथमच " सिंचन नियोजन " सुरु केले , ज्यामुळे पुढे आपल्या देशात शेती ला चालना भेटली आणि भर भराट आली .- दुसर्या महायुद्ध नंतर पडलेली अर्थव्यवस्था ,उद्योग ,पुनर्वसन , संरक्षण ची Reconstruction Committee of Council (RCC ) मार्फत आखणी करून देशाला सावरले.- एकमेव भारतीय ज्यांचा लंडन मध्ये "कार्ल मार्क्स " सोबत फोटो आहे .- अशोक चक्र ला राष्ट्रीय तिरंगा ध्वजा मध्ये स्थान मिळवून दिले व अशोक स्तम्बाला राष्ट्रीय चिन्ह बनवण्यात महत्वपूर्ण योगदान- भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस चे प्रथम विरोधक- भारतीय घटनेचे शिल्पकार- भारत देशात जन्माला आलेल्या व विलीप्त होत असलेल्या बौद्ध धर्माला नवजीवन दिले.- देशातील महिला व महिला कामगारांसाठी महत्वपूर्ण योग्न्दान ( प्रोविडेंड फंड , घटस्फोट कायदा,गर्भवती कर्मचारी साठी वेतन युक्त सुट्टी व बर्याच सोयी , महिला वेतन वाढ , ESI , महिला कर्मचारी कल्याण फंड ची स्थापना , इत्यादी… )आणखी बर्याच राष्ट्र हिताच्या गोष्टीत योगदान , पण काही खोडसाळ व जातीयवादी लोकांच्या चुकीच्या प्रचारा मुले त्यांना फक्त दलितांचे नेते म्हणून ओळखलं व संबोधित केलं जातं .चला त्यांच्या ५८ व्या महापारीनिर्वानाच्या दिवशी त्यांची खरी, सच्ची व राष्ट्रहिताची प्रतिमा लोकांसमोर आणून लोकांचे बरेच गैरसमज दूर करूया.डॉ . बाबासाहेब आंबेडकर ह्यांना विनम्र अभिवादन...

भारत बौद्ध राष्ट्र कसे

 भारत  देशात ८५% हिंदू धार्मिक  लोक राहतात पण  तरीही भारत देशाला कोणीही हिंदू देश म्हणत नाही असं  का ?
कारण आपण शोधू या
१)  भारत देशाचा झेंडा  -  भारत देशाच्या तिरंगा झेंडयाच्या मध्ये भागी जर अल्ला किंवा  आर्ध्या चंद्राची निशाणी असती तर  आपण समजलो असतो हा देश  मुस्लिम राष्ट्र  आहे*
भारत देशाच्या तिरंगा झेंड्याच्या मध्ये भागी  जर ॐ, श्री ,स्वातिक, गणपताय नमः अशि निशाणी असती तर आपण समजलो असतो  हा देश हिंदू  राष्ट्र आह*
भारत देशाच्या तिरंगा  झेंड्याच्या मध्ये भागी "आशोक चक्र " आहे* सम्राट आशोक जो बौद्ध राजा होऊन गेले त्यांच्या  राज्यात  संपूर्ण भारत  बौध्दमय होता* हे चक्र  बौद्ध  धम्माचे प्रतिक आहे* यावरून आपण समजू शकतो हा देश बौध्द राष्ट्र  आहे*
२)  भारत देशाचे चलन (रुपये ) -  भारत देशाच्या चलनावर  जर  आर्धा चंद्र  किंवा अल्ला असे काही  तरी असते  तर आपण समजलो असतो हा देश मुस्लिम  राष्ट्र आहे*
भारत देशाच्या चलनावर जर ॐ, श्री ,स्वातिक, गणपताय नमः असे काही तरी लिहिले असते तर आपण समजलो असतो हा देश हिंदू राष्ट्र आहे*
भारत देशाच्या चलनावर तर "आशोक  स्तंभ " जो सम्राट आशोक बौद्ध राजा होता* त्यांची राजामृद्रा  आहे*
या वरून आपण सभाजू शकतो की हा देश बौध्द राष्ट्र आहे*
३) भारत देशाचे संविधान -  भारत देशाच्या  संविधानाची सुरूवात जर अल्ला किंवा आर्ध्या चंद्राच्या  निशाणी पासून झाली असती तर आपण समजलो  असतो हा देश मुस्लिम राष्ट्र आहे*
भारत देशाच्या संविधानाची सुरूवात जर ॐ, श्री, स्वातिक , गणेशाय नमः पासून झाली असती तर आपण समजलो असतो हा देश हिंदू राष्ट्र आहे*
पण बाबासाहेब  आंबेडकरांनी भारत देशाच्या  संविधानाची सुरूवात " आम्ही भारताचे लोक , भारताचे एक ( सार्वभौम  समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य )घडविण्याचा वत्याचा सर्व नागरिकांसः सामाजिक , आर्थिक व राजनैतिक  न्याय विचार , अभिव्याक्ति, विश्वास , श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य "  अशी सुरूवात केली आहे* आणि घटनेचे तत्व जे बौध्द धम्माचे तत्व आहे तेच ठेवले * "  प्रज्ञा ,  शिल ,  करूणा  " म्हणजेच न्याय , स्वातंत्र्य , समता , बंधुता ह्या तत्वावर  घटना लिहिली * यावरून आपण समजू शकतो कि, हा देश बौद्ध  राष्ट्र आहे*
४)  भारत देशाचे कायदे -  भारत देशाच्या  घटनेत एकुन ३९५ कलमे आहेत *  त्या मध्ये  १ )  कोणाचीही हत्या  करणे  (२)  चोरी  करणे  (३)  व्याभिचार, बलत्कार  करणे  ( ४) खोटे बोलणे  (५) नशेली पदार्थाचे सेवन करणे  हे गुन्हे  करण्यांवर कडक कारवाई होते *
आणि हेच पाच  शिल भगवान बुध्दांनी  सर्व  माणुष्याला पालन  करायला  सांगितलेले  आहे*  त्यांनाच पंचशिल  म्हणतात*
यावरून आपण  समजू शकतो  हा देश बौध्द राष्ट्र  आहे*
५)  भारत देशाचे राष्ट्रपती  भवन -  भारत देशाच्या राष्ट्रपती  भवनात  कोणत्याही आय-या - गय-याची  मृर्ती नसून फक्त  म्हणजे फक्त " भगवान  गौतम  बुध्दांची "  मृर्ती आहे*
या सर्व  गोष्टी  वरून  आपण  सागू शकतो  जगाला  " भारत बौद्ध राष्ट्र " आहे *
हा फक्त  डाँ*  बाबासाहेब  आंबेडकर  यांचा विजय  आहे *

* नमो बुध्दाय * जय भिम  *  जय भारत *

२२ प्रतिज्ञा

१४ ओक्टोम्बर १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अस्पृश्य समजल्या जाणार्या समाजाला सन्मानीय असा बौद्ध धम्म दिला आणी पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या रूढींना लाताडून नवीन बौद्ध समाज निर्माण केला जो आज नाव बौद्ध म्हणून आज सन्मानाचं जीवन जगात आहेत .
तरी काही अजूनही याला अपवाद आहेच .अशांसाठी बाबा साहेबांकसाहेबानी दिलेल्या २२ प्रतिज्ञा नेहमी स्मरणात ठेवाव्यात .
पुढील विडिओ :-


  

बौद्ध समाजाने दिवाली साजरी करू नये


बौद्ध समाज जो डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुयाई आहे त्यांनी दिवाळी साजरी करू नये. 
कारण जर का आपण इतिहास पाहिला तर असे लक्षात येत कि कोणताही सण  म्हटला कि ब्राह्मणांचं काहीतरी कपट कारस्थान असणारा दिवस. 
आता दिवाळी बद्दल सांगायचं तर का करू नये याची कारणे अशी आहेत . 
पहिले कारण:- तथागत भगवान बुद्धांच्या श्रावक संघाचे दोन श्रेष्ठ सोबती सारीपुत्त सेनापती आणि
महामोग्गलायन हे उपसेनापती होते. या दोघांचा असीम त्याग आणि ४४ वर्षाची धम्मसेवा आणि त्यांच्या अंगी असलेले सद्गुण यामुळेच तथागतांनी त्यांच्यावर संघाची दूर सोपविली होती. महामोग्गलायनचा प्रभाव राजगृहामध्ये खूप वाढला. त्यामुळेच कार्तिक अमावास्येला ईसीगल पर्वतावर त्यांची क्रूर हत्या करण्यात आली. महामोग्गलायनला जिवंत जाळण्यात आले. तो दिवस दिवाळीचा होता. म्हणजेच इतिहासातील काळा दिवस.
दुसरे कारण:- मौर्य काळातील दहावा सम्राट बौद्ध राजा बृह्दरथ हा दहा व्यक्तींचे बळ असलेला महापराक्रमी अजिंक्य योद्ध होता. युद्धात त्याला हरविणे कठीण काम होते. यांची ब्राम्हणी सेनापती पुष्यमित्र शुंग याने कपट कारस्थानाने क्रूर हत्या केली. तोही दिवस कार्तिक अमावस्येचा होता. बौद्ध सत्ता उलथून लावण्यात आली. भिक्खुंच्या कत्तली करण्यात आल्या. भिक्खुंचे शीर कापून आणणाऱ्यास (१००)सुवर्ण मुद्रा देण्याचे फर्मान पुष्यमित्र शुंग याने सोडले. विहारे, स्तूप नष्ट केली आणि दिव्यांच्या माळा लावून आतिषबाजी केली. तो दिवस कार्तिक अमावस्येचा (दिवाळी) होता.
तिसरे कारण:- "ईडा पिडा टळो बळीचे राज्य येवो" हि म्हण आजही आपल्या माता-भगिनी एखाद्या प्रिय व्यक्तीला ओवाळताना म्हणतात. यामागे फार मोठा इतिहास आहे. बहुजनांचा सर्वश्रेष्ठ राजा बळी हा अत्यंत शूर, पराक्रमी, बुद्धिमान, सत्वशील, चारित्र्यवान, उदार, दयाशील, न्यायी असा सर्वगुण संपन्न राजा होता. त्याच्या राज्यात सर्वसामान्य बहुजन समाजातील जनता अत्यंत सुखी-संपन्न व समृद्ध होती. अशा या दानशूर बहुजन राजाला विष्णूने कपटकारस्थान रचून कैद केले. त्यांची सत्ता, शास्त्रे, विद्या, संपत्ती हिरावून घेण्यात आली. त्यांच्या मुलांना एकामागून एक ठार करण्यात आले. बलीप्रतीपदा या दिवशी बळी राजाची क्रूर हत्या करण्यात आली. तो दिवस कार्तिक अमावस्येचा म्हणजेच (दिवाळी) चा होता.
म्हणून बौद्धांनी, बहुजनांनी दिवाळी हा सण साजरा करू नये. 
आजवर आपण जे काही करत आलो त्यात आपले अज्ञान होते. परंतु आता तर आपल्याला खरा इतिहास समजलेला आहे आणि हा खरा इतिहास समजून देखील आपण जर परत तीच चूक करत असाल तर मात्र आपल्याला बौद्ध म्हणवून घेण्याचा काही एक अधिकार नाही. कारण; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि दीक्षा देत असतांना त्यांनी आपल्याला २२ प्रतिज्ञा देखील दिलेल्या आहेत. जर आपण त्या २२ प्रतीज्ञांचे पालन करत नाहीत तर याचा अर्थ स्पष्ट आहे कि आपण आपल्या उद्धारकर्त्याशी बेईमानी करत आहोत. त्यांचा अपमान करत आहोत व आपण फक्त आपल्या स्वार्थासाठी त्यांचा उपयोग करत आहोत. म्हणून बौद्धांनी, बहुजनांनी दिवाळी हा सण साजरा करू नये. घरावर विद्युत रोषणाई करणे, आकाश कंदिल लावणे, दिवे लावणे, रांगोळी काढणे, म्हणजे आपल्या पूर्वजांच्या, महापुरुषांच्या हत्येचा आनंदोत्सव साजरा केल्यासारखे होईल. आपण बौद्ध आहोत. आपली संस्कृती वेगळी आहे. आपले सण म्हणजे भिमजयंती, बुद्धजयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन, व आपल्या आदर्शांच्या जयंत्या व प्रत्येक महिन्याची पोर्णिमा हे आहेत. तेच फक्त साजरे करावेत...

* जय भिम * .नमो बुध्दाय *

भारतीय मिडिया


दलित पँथरच्या उदयासाठी १९७०च्या वेळी जी परिस्थिती होती, नेमकी तशीच परिस्थिती आज आहे. पण नवीन नेतृत्व उदयाला येताना दिसत नाही. या चळवळीला एवढा क्रांतिकारी वारसा असताना असे का व्हावे? चळवळीतून नेतृत्व उभे का राहत नाही? यासाठी संपूर्ण आंबेडकरी समाज जबाबदार आहे.
वर्तमान दलित चळवळ फार मोठ्या अरिष्टात सापडली आहे. दलित चळवळ संपली असा युक्तिवाद काही मंडळींनी सुरू केला आहे. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नसल्याने वरील युक्तिवाद जोरकसपणे मांडला जात आहे. म्हणून खरेच ही चळवळ संपली का, हे तपासणे महत्त्वाचे आहे.
एक बाब लक्षात ठेवणे आवश्यक आहे आणि ती म्हणजे जगातील कुठलीही सामाजिक चळवळ कायम गतिमान राहू शकत नाही. सामाजिक चळवळीत चढउतार असतात. चळवळीचे संदर्भ, प्रश्ान् आणि नेतृत्व बदलत राहते म्हणून चळवळही बदलत राहते. दलित चळवळ दिशाहीन झाली हे वादातीत आहे; पण याचे खापर फक्त नेत्यांवर फोडून कसे चालेल? याला चळवळीसाठीचे सर्व घटक जबाबदार असतात.
अलीकडे लोक दलित चळवळीत सहभागी होत नाहीत असे प्रकर्षाने जाणवते. असे का होते? या प्रश्ानच्या उत्तरासाठी आपण चळवळीचे सिद्धांत काय सांगतात ते बघू. लोक पुढील कारणांमुळे/ उद्देशांमुळे चळवळीत सहभागी होतात. १. चळवळीतील सहभाग्यांना वर्तमान परिस्थितीमध्ये बदल घडवून आणायचा असतो. २. कुठल्यातरी समुदायाचा/गटाचा सभासद असावे असे लोकांना वाटते. ३. लोकांच्या मनात स्वत:च्या जीवनाला वेगळा अर्थ व संदर्भ मिळवून देण्याची तीव्र इच्छा असते. ४. चळवळीतील सहभाग्यांना आपली वेगळी 'अस्मिता' निर्माण करायची असते. सामाजिक चळवळीतील सहभागाविषयी वरील प्रकारचे निकष दलित चळवळीला लावून बघा म्हणजे आजची दलित चळवळ दिशाहीन का झाली, याची उत्तरे आपोआप हाती लागतील.
दलितांची वेगळी अस्मिता (द्बस्त्रद्गठ्ठह्लद्बह्ल४) निर्माण झाली. (या अस्मितेला अनेक कंगोरे आहेत, ही गोष्ट वेगळी.) मग पुढे चळवळीचे काय प्रयोजन? सामाजिक प्रक्रियेतून निर्माण केलेली अस्मिता शाश्वत स्वरूपात ठेवण्यासाठी सुद्धा सामुदायिक पद्धतीने प्रयत्न सुरू असले पाहिजेत. याचा विसर दलितांना पडला आहे, असे ध्यानात येते.
आज संपूर्ण भारतीय समाजाचे संदर्भ व प्रश्न बदलले आहेत; पण दलित चळवळीचा अजेंडा भावनिकतेच्या व आक्रस्ताळेपणाच्या बाहेर यायला तयार नाही. खाजगीकरण व जागतिकीकरणामुळे हे संदर्भ बदलले आहेत. परिणामी खाऊजा (खाजगीकरण- उदारीकरण-जागतिकीकरण) धोरणाने क्रांतिकारी विचार बोथट झाला आहे. चळवळीच्या नावाखाली बिगर-सरकारी संघटनांचे पीक जोरात आले आहे. कामगार आहेत; पण कामगार चळवळ दिसत नाही. दलितांचा जमाव आहे; पण चळवळ दिसत नाही. दलित पँथरच्या उदयासाठी १९७०च्या वेळी जी परिस्थिती होती, नेमकी तशीच परिस्थिती आज आहे. पण नवीन नेतृत्व उदयाला येताना दिसत नाही. या चळवळीला एवढा क्रांतिकारी वारसा असताना असे का व्हावे? चळवळीतून नेतृत्व उभे का राहत नाही? यासाठी संपूर्ण आंबेडकरी समाज जबाबदार आहे. रिपब्लिकन नेत्यांना शिव्याशाप देऊन आपण मात्र नामानिराळे राहायचे अशी फॅशन दलित चळवळीत रूढ झाली आहे. आंबेडकरी अनुयायांचे कुठेतरी चुकतेच हे लोक मानायला तयारच नाहीत. डॉ. आंबेडकरांच्या नावावर लोक जमतात, पण त्याचे चळवळीत रूपांतर होत नाही. तथापि, सुट्या सुट्या विषयावर चळवळी करताना लोक दिसतात. चळवळीतील संघटन (मोबिलायझेशन) हे पारंपरिकतेच्या परिघात अडकून पडले आहे. 'नातीगोती' व 'जातीच्या' आधारावरच दलित चळवळीत मोबिलायझेशन केले जाते. या साच्याच्या पुढे चळवळ सरकायला तयार नाही. 'मॉडर्न मोड ऑफ मोबिलायझेशन' न अवलंबल्यामुळे एका जातीच्या पलीकडे दलित चळवळ सरकायला तयार नाही. कीनशिप व जातीच्या आधारावर चालवलेल्या राजकारणाला निवडणुकांत अपयश आले की मग संपूर्ण दलित चळवळ संपली असा अर्थ काढला जातो.
या चळवळीत कमालीचे साचलेपण आले आहे. दलित चळवळ वा आंबेडकरी समाज योग्य नेतृत्व निर्माण करू शकत नाही याचा अर्थ काय होतो? याला पूर्ण आंबेडकरी समाज जबाबदार आहे. आंबेडकरी विचारप्रणालीचे रूपांतर व्यवहारात किती केले जाते हा एक वेगळा संशोधनाचा विषय होऊ शकतो.
वर्तमान परिस्थितीत दलितांचे 'कॉम्पोजीशन' झपाट्याने बदलत आहे. वास्तविक असे होणे अपरिहार्य आहे. आपापल्या सोयीनुसार प्रत्येक स्तराने सुट्या सुट्या चळवळी सुरू केल्या आहेत. उदा. राजकारणी नेत्यांची राजकीय चळवळ, धम्माच्या क्षेत्रातील मंडळींची चळवळ, पांढरपेशा दलितांची चळवळ, साहित्यिकांची त्यांच्या क्षेत्रातील चळवळ, दलित कामगार व दलित स्त्रियांच्या चळवळी इ.
दलितांमध्ये अनेक घटकांच्या योगदानामुळे 'सामाजिक गतिशीलता आली आहे. या गतिशीलतेने काही अनपेक्षित परिणाम निर्माण केले आहेत. उदाहरणार्थ, ही मंडळी सामाजिक व्यवस्थेचे भाग होऊ पाहत आहेत. संघर्ष नको पण सामोपचाराने राहा असा संदेेश ते देतात. चळवळीच्या क्रांतिकारी जाणीवा बोथट करण्यासाठी यांचा फार मोठा हातभार लागला आहे. अशी मंडळी समाजात पूर्णपणे वगळलीही जात नाहीत वा त्यांचे सामीलीकरणही होत नाही परिणामी एक पेचपूर्ण परिस्थिती तयार झाली आहे. यातून मार्ग काढावा लागेल. कारण हा घटक चळवळीचा महत्त्वाचा भाग आहे. दलितांमधील निरनिराळ्या स्तरांमध्ये जोपर्यंत शाश्वत स्वरूपाच्या आंतरक्रिया होणार नाहीत, तोपर्यंत या चळवळीस बळकटी येणार नाही.
चळवळ चालविण्यासाठी संसाधने लागतात उदा. पैसा, ज्ञान, वेळ आणि सामाजिक भांडवल. हे देणार कोण? अशाप्रकारचे सामाजिक भांडवल (सोशल कॅपिटल) सुस्थितीत असलेला स्तर पुरवू शकतो. सामान्य दलिताजवळ हे भांडवल नाही, पण त्यांचा चळवळीतील सक्रिय सहभाग अत्यावश्यक आहे.
वास्तविक पाहता दलित चळवळीने लोकशाहीला बळकटी मिळवून दिली आहे याची अनेक उदाहरणे देता येतील. दलितांचा निवडणुकीतील सहभाग, मोठ्या संख्येने मतदानात सहभाग, अन्यायाविरोधात संघर्ष आणि सामुदायिक प्रतिनिधित्वासाठी आग्रह धरणे व त्यासाठी चळवळ करणे इ.
थोडक्यात, सामाजिक चळवळी या चक्राकार असतात. त्यात चढ-उतार निर्माण होतात. चळवळीत क्षीणता व पुनरुज्जीवन हे टप्पे निर्माण होतात. चळवळीस ऐतिहासिक व वर्तमान संदर्भ असतो. तथापि, चळवळीचे पक्षात रूपांतर झाले की चळवळ संपते. चळवळीचे उद्दिष्ट संपले, आवाहन संपले, तर चळवळ संपते. लोकांना संघटित करण्याची ताकद संपली, नेतृत्व व विचारप्रणालीची उपयोजिता संपली तर चळवळ संपते. चळवळीकडे सामाजिक भांडवल नसेल तरी चळवळ संपते. हे सर्व निकष वर्तमान दलित चळवळीस लावल्यास चित्र काय ते स्पष्ट होईल.
डॉ. पी. जी. जोगदंड
समाजशास्त्रे विभागप्रमुख,
मुंबई विद्यापीठ

डॉ .आंबेडकरांना बाबासाहेब उपनाव कसे पडले

१९२७ ची गोष्ट आहे. अस्पृश्य चळवळीतील एक अत्यंत महत्वाचे नाव म्हणजे डॉ. भीमराव आंबेडकर. 
हे नाव १९२७ पर्यंत बरेच लोकप्रिय झाले होते. तेंव्हा बाबासाहेबांचे कार्यालय दामोदर हॉल, परळ, मुंबई येथे होते. बाबासाहेबाना भेटायला येणारी सर्व मंडळी त्याना डॉक्टर आंबेडकर, डॉक्टर साहेब वा साहेब असे संबोधत.
तेंव्हा बाबासाहेब बहिष्कृत भारत (ब.भा.) नावाचे पाक्षिक चालवत असत.
पोयबावाडीतील कावाराणा बिल्डिंग मधील दुस-या माळ्यावर ब.भा. चे कार्यालय होते.चळवळीसाठी काम करणारे व ब. भा.साठी लेखन करणारे बाबासाहेबांचे काही अनुयायी व विद्यार्थी ईथे मुक्कामी राहात.
सप्टे १९२७ च्या एका रविवारी मोकळ्या वेळेत जेंव्हा ही चळवळीतील तरुण मुले गप्पा टप्पा मारत
बसली तेंव्हा त्यांच्यातील चांगदेव भवानराव खैरमोडे या तरुण मुलाने असे सुचविले की,आपल्या साहेबांची किर्ती जगभर पसरत चालली आहे. तसेच ते आपल्या सर्व अस्पृश्य समाजाचे मोठे उध्दारक असून त्यांच्या धर्मपत्नी आम्हा सर्व पोरांस मातेसमान पाहतात. जन्माने आमचे आईबाप वेगवेगळे आहेत, पण आम्हाला या मानवी मुल्ये बहाल करणारे आपण सर्वांचे एकच बाप आहेत ते म्हणजे आंबेडकर साहेब व आपली सर्वांची एकच आई ती म्हणजे रमाई. म्हणून या पुढे आपण आंबेडकर साहेबाना ’बाबासाहेब’ व रमाईना ’आईसाहेब’
म्हणण्याचा प्रघात सुरु करु या.
उपस्थीत सर्व बांधवाना ही उपनावाची युक्ती आवडली. त्यांच्या त्यांच्यातील चर्चेत व संवादात ती आंबेडकरांचा बाबासाहेब असा उल्लेख करु लागली व रमाईस आईसाहेब म्हणने सुरु झाले. पण हा प्रघात सर्वत्र रुजवायचा होता.मग बाबासाहेबांच्या सभांमधून बोलताना वरिल प्रस्तावातील वक्ते प्रत्येक सभेतून बोलताना ठासून
बाबासाहेब व आईसाहेब असा उल्लेख करु लागली.सुरुवातीला बाबासाहेबानाही कळले नाही हे काय चाललं. तसही त्याना कळू न देताच ही उपनावं रुजवायची होती.मुख्यत्वे मोरे नि वडवळकर या दोन खंद्या वक्त्यानी बाबासाहेब व माईसाहेब ही उपनावं रुजविण्यात सिंहाचा वाटा उचलाला. हा हा म्हणतार महाराष्ट्रातील
प्रत्येक सभेतून या दोन वक्त्यानी वरील उपनावांचा वारंवार उच्चार करुन लोकांच्या मनात ही नावं
रुजविली.१९३० पर्यंत ही दोन्ही उपनावं सर्वत्र ईतक्या आत्मियतेने स्विकारली गेली की आता चळवळीतील
लोकं त्याना फक्त बाबासाहेब एवढच म्हणू लागली. नंतर मात्र विरोधकही कित्येक वेळा त्याना बाबासाहेब म्हणू लागले व रमाईस आईसाहेब.. 


! "जय भिम""जय भारत "!


अंधश्रढेची कारणे


 माणूस अंधश्रद्ध का बनतो... तर त्याची सुरुवात लहाणपणीच झालेली असते . 
लहानपणी आई म्हणते "राजा तिकडे नको जाउस 'भू' येईल...
लहानपणी आई म्हणते देवबाप्पासमोर हात जोडून बोल "मला पास कर देवबाप्पा"...
टीवीवर कार्टून मधे चमत्कार, जादू सारख्या अवैज्ञानिक गोष्टी दाखवून लहान मुलांचे मनोरंजन परंतु या चमत्कार व जादुंचे अंतर्मनात खोलवर संस्कार रुजुन मोठे झाल्यावरही त्या व्यक्तीच्या मनात चमत्कार व जादू बद्दल आकर्षण कायम राहणे.
शाळेत जे विज्ञान शिकविले जाते त्याचा दैनंदिन जीवनाशी संबंध न जोडणे.
Law Of Monopoly म्हणजेच जर समाजात 99% लोक जर याच मार्गाने चालत असतील तर ते नक्कीच योग्य
असावेत आपणही त्यांचेच अनुकरण करावे हा समज.
मानवी जीवन हे भावभावनेचे आणी गुंतागुंतीचे असल्याकारणी त्यात असीम सुखदुखःची आश्चर्यकारक
शॉकिंग सरमिसळ आहे ज्या गोष्टी त्याला धक्का देऊन जातात व त्याचा चमत्कारांवर विश्वास बसु लागतो
आपण हे केले म्हणून हे झाले आणी आपण ते केले म्हणून ते झाले अशा काही योगायोग घटनांना माणुस नियम मानून त्याचे ओझे जीवनभर वाहतो
Law Of Repeated Audio Visual
Effect - या तत्वा आधारे समाजात मिडिया, माउथ पब्लिसिटी, सामाजिक उत्सव, इत्यादी माध्यमातून
जे माणसाला पुनःपुन्हा दाखवले जाते ऐकवले जाते त्यावर मन सहज विश्वास ठेवते.
 'भय' आणी 'लोभ' या दोन नैसर्गिक भावना या प्रत्येका मानवामधे मोठ्या प्रमाणात असतात. पण ज्या दिवशी या भावना माणसाच्या जीवनावर प्रभुत्व मिळवतात तेव्हा तो मानसिक गुलामगिरित फसु लागतो
शेवटचे आणि सर्वात महत्वाचे 'चमत्कार' असतो हे शेकडो वेळा ठासुन सांगणारे सर्वच धर्मांचे ग्रंथ या गोष्टीला कारणीभुत आहेत.


आदर्ष पिता रामजी बाबा

रामजी बाबा वयाच्या १८ व्या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीच्या १०६ च्या सॅपर्स अॅण्ड मायनर्स विभागात भरती झाले. रामजीबाबांचे लष्करातील कसब पाहून त्यांना सेव्हन पायोनियर बटालीयनमध्ये बढती देण्यात आली. रामजीबाबा हे लष्करात नोकरी करीत असले तरी ते फार कुटुंबवत्सल्य , धर्मभोळे आणि शिस्तप्रिय स्वभावाचे होते. त्यांच्यावर कबीर पंथाचा प्रभाव होता. ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमधील आंबेटेंबें गावात स्थायिक असलेल्या लष्करातील सुभेदार रामजी मेजर धर्माजी मुरबाडकर यांच्या द्वितीय कन्या भीमाबाई यांच्यासोबत रामजीबाबांचा विवाह झाला. त्यानंतर त्यांना एकूण चौदा (१४ ) अपत्ये झाली . त्यापैकी १४ एप्रिल १८९१ रोजी जन्माला आलेले भीमराव हे चौदावे रत्न .
रामजीबाबांची प्रखर बुद्धिमत्ता आणि खेळातील प्राविण्य पाहून कंपनी सरकारमधील एका इंग्रज अधिकाऱ्याने त्यांना पुण्यातील नॅार्मल स्कूलमध्ये प्रवेश मिळवून दिला . येथे रामजीबाबांनी डी. एड . चे शिक्षण घेतले आणि लष्कराच्या छावणीत शिक्षक आणि कालांतराने मुख्याध्यापक म्हणून १४ वर्षे नोकरी केली . रामजीबाबांचे कर्तुत्व पाहून ईस्ट इंडिया कंपनीने त्यांना ' सुभेदार मेजर ' हि पदवी बहाल केली.
विवाह झाल्यानंतर रामजीबाबांनि आणि भिमाईने अनेक गंभीर प्रसंगांना तोंड दिले ; मात्र त्यांनी एकमेकांना डगमगू दिले नाही . त्यांनी आपल्या पोटची ७ मुले गमावली . तर बाळाराम , गंगा , तुळसा , आनंदराव , मंजुळा ,रमाबाई , भीमराव यांचा सांभाळ करतांना खूप कष्ट सोसले. कुटुंबातील आर्थिक चढ -उतार , मुलाबाळांचे संगोपन , भिमाईंचा मस्तकशुळाचा आजार आणि वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे रामजीबाबांची कमालीची ओढाताण होत असे , परंतु ते प्रत्येक परिस्थितीला धैर्याने सामोरे गेले.
त्यानंतर काही काळातच इ.स. १८९४ मध्ये रामजीबाबा ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्करी सेवेतून निवृत्त झाले. दरमहा त्यांना ५० रुपये पेन्शन मिळत असे; मात्र तुटपुंज्या पेन्शनमध्ये त्यांच्या कुटुंबाच्या प्राथमिक गरजाहि भागत नव्हत्या . त्यामुळे रामजीबाबांनी सातारा येथील पी.डब्लू .डी च्या कचेरीत स्टोअरकिपरची नोकरी सुरु केली. नोकरीकरिता ते सहकुटुंब सातारा येथे स्थायिक झाले . येथे सातारा कॅम्प स्कूलमध्ये भीमराव आणि आनंद यांनी आपल्या शैक्षणिक आयुष्याची सुरुवात केली .
भिवाचे प्राथमिक शिक्षण सुरु असतांनाच रामजीबाबांची नोकरी गेली .पी.डब्लू .डी .च्या कचेरीतील काम संपल्याने रामजीबाबांना आता कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता आपले बस्तान हलविणे अनिर्वाय झाले. मुलांचे संगोपन आणि शिक्षण याकरिता रामजीबाबांनि थेट मुंबई गाठली . मुंबईत आल्यानंतर रामजीबाबांनि सर्वप्रथम आनंदराव आणि भीमराव यांना परळच्या एल्फिन्स्टन विद्यालयात प्रवेश घेतला , परंतु तुटपुंज्या पेन्शनवर भागत नसल्यामुळे त्यांनी तेथेही नोकरीचे प्रयत्न सुरु केले. आपल्या कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीला हातभार लावता यावा याकरिता भीमरावांचे वडील बंधू आनंदराव यांनीही आपल्या शालेय शिक्षणाला पूर्णविराम देत कंपनीमध्ये नोकरी केली. १८९६ मध्ये भिमाईचे निधन झाले .भिमाईच्या निधनाने रामजीबाबा हताश झाले .परंतु त्यातूनही त्यांनी स्वतःला आपल्या कुटुंबाला सावरले. ते पुन्हा जोमाने उभे राहिले आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करू लागले.
रामजीबाबांनि आपल्या मुलाच्या उज्वल भवितव्याकरिता त्याला उच्चशिक्षित करण्याचे ध्येय शेवटपर्यंत सोडले नाही
भिवा मॅट्रिक उत्तीर्ण व्हावा आणि तेही चांगल्या गुणांनी याकरिता रामजीबाबांनी ज्या हाल अपेष्टा सहन केल्या त्या शब्दात व्यक्त करण्यापलीकडच्या आहेत. स्वतः रात्र रात्र जागून त्यांनी भिवाच्या मनात वाचनाची ,लेखनाची , अभ्यासासाठी अविट गोडी निर्माण केली . त्याच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही . तुटपुंज्या पगारात कुटुंबाचा गाढा ओढणे अशक्य, होते परंतु रामजीबाबांनी कधीही हार मानली नाही. त्यांनी प्रत्येक वेळा स्वतःच्या जीवाचे रान करून भीमरावांची प्रत्येक शैक्षणिक गरज भागविली.
२३ जानेवारी १९१३ ला भीमरावांची बडोदा सरकारच्या सैन्यात लेफ्टनंट नेमणुक करण्यात आली. सदर नोकरीवर रुजू झाल्यानंतर काही दिवसातच रामजीबाबांची प्रकृती खालावल्याची तार भिमरावांना मिळाली आणि ते तसेच बडोद्याहून मुंबईला पोहोचले . रामजीबाबा आणि बाबासाहेबांची ती अखेरची भेट ठरली .२ फ्रेब्रुवारी १९१३ रोजी रामजीबाबांचे निर्वाण झाले.

जाहला कुल उद्धार !
पितामह सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर !
तीन पिढ्यांच्या पुण्याईने ,
जाहला कुल उद्धार
ज्ञान दीप हा सुसंक्सारीला .......
सूर्य दिनांचा शिल्पकारीला ......
दिव्य ज्ञान हि जीवनी लाभे ,
पाजिले क्षीर सागर ....
जाई सामोरी आर्त दुःखाला .....
काही सर्वस्व सार्थ कार्याला
भीम कर्तव्य सैदव जागे,
साधले सुखी संसार .....
स्मरू आदर्श पितृ कृतीला
करू वंदन पुण्य स्मृतीला ......
आदर्श पिता रामजीबाबा यांना कोटी कोटी प्रणाम ......!

! जय भीम ! !! जय भारत !! !!! नमो बुद्धाय !!!

धम्म आणि धर्म


'धम्म' या पाली शब्दापासूनच धर्म हा संस्कृत शब्द आल्याचे काही पुरावे भाषाशास्त्रामध्ये सापडतात.
पाली भाषा ही बोलीभाषा म्हणून बुद्धाच्या काळात प्रसिद्ध होती.
पाली भाषेतून बुद्ध धम्मातील अनेक ग्रंथ रचण्यात आले होते. त्याकाळात हिंदूंचा म्हणण्यासारखा एकही ग्रंथ
लिहिण्यात आला नव्हता.नंतरच्या काळात पाली भाषेतूनच हिंदू संहिता रचण्यात आल्या. हिंदूंची ग्रंथे
लिहिण्यात आले. आणि तो काळ अगदी अलीकडचा काळ होता. इ.स. ४ थे शतक ते इ.स. १२ वे शतक या दरम्यान हिंदूंची अनेक ग्रंथ रचण्यात आली आहेत. हिंदूंनी त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासा ठी 'धर्म' स्थापन केले. चौकटबद्ध जीवनाची आधारशीला म्हणजे 'धर्म'.मानवाला एका विशिष्ट चौकटीत विभाजित करून त्यांना त्यांचे मर्यादित हक्क व अधिकार बहाल करणारी संहिता म्हणजे 'धर्म'.
बुद्धीला गहाण ठेऊन डोळे बंद करून 'धर्माची संहिता' पालन करावयास लावणारा फतवा म्हणजे 'धर्म'.
पण मुळात 'धम्म' आणि 'धर्म' या शब्दांमध्ये मोठा फरक आहे. 'धम्म' म्हणजे अशी व्यवस्था ज्या व्यवस्थेत
प्रत्येकाला मानवी स्वातंत्र्य बहाल करून बंधनमुक्त जीवनातून मानवी विकासाच्या सर्व पातळ्या खुल्या करून दिल्या जातात.
मानवी विकासाच्या प्रक्रियेत समाविष्ठ असलेला असा समूह जो प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यक्तीला त्याच्या विकासाचे स्वातंत्र्य बहाल करतो. त्याला 'धम्म' असे म्हणतात.
मानवी बुद्धीला,तत्वचिंतनाला महत्व देऊन कुठल्याही चौकटीविना, बंधनाविना,अडथड्याविना विकासाची संधी बहाल करण्यासाठी एकत्र आलेला समूह म्हणजे 'धम्म'.'धम्म' आणि 'धर्म' या दोन शब्दांमध्ये गफलत
करणा-या विद्वानांनी जरा त्यांच्या 'धर्म' प्रेमाला आवर घालावा. तुमचा धर्म प्रेम फेसाळलेल्या समुद्रासारखा उतू जात असेल
मनूच्या गर्भात शिरून तुम्ही वाटेल तो नंगा नाच केला तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही.
"अबला नारी, ताडण के अधिकारी" या संदेशाला तुम्हीच तुमच्या शिरावर कोरून ठेवा. पण त्यासाठी तुम्ही बुद्धाच्या नैतिक तत्वज्ञानाला,भाषेची जननी पाली भाषेला,बुद्धाच्या वैश्विक धम्माला हिंदूंशी जोडण्याचा प्रयत्न
करत असाल. तर तो फसवा प्रयत्न बुद्धिवादी माणसे असेपर्यंत शक्य होणार नाही हे लक्षात घ्या !

धम्माचा संदेश "भवतु सब्ब मंगलम" हाच संदेश

आमच्या धम्माचा आधारस्तंभ आहे.तो राहील. तुमचे अस्तित्व संपेपर्यंत हा वैश्विक विचार जगाच्या शिखरावर कोरलेला असेल. एवढे मात्र ध्यानात ठेवा.

लेखक : धम्म मित्र  प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर.

भारतातिल लोकशाहिचे भवितव्य

" मे 1956 मध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्हाॅइस ऑफ अमेरिका ह्या संस्थेने योजिलेल्या एका वादमालिकेत "भारतातील लोकशाहीचे भवितव्य"ह्या विषयावर भाषण केले.त्यात ते म्हणाले, 'लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे.लोकशाहीची मुळे सरकारी पद्धतीत, संसदीय किंवा दुस-या कोणत्याही पद्धतीत नसतात.
→लोकशाही म्हणजे सहजीवनाने राहण्याची एक पद्धती.
→लोकशाहीची मुळे सामाजिक संबंधांत
शोधावयाची असतात.
→जे लोक तो समाज बनवतात
त्यांच्या सहजीवनाच्या संदर्भात तिची मुळे शोधावयाची असतात.
हिंदी समाज हा जातिभेदावर अधिष्ठित आहे.आणि जाती या अलग असतात.भारतातील मतदान आणि उमेदवारांची निवड ही जातिनिष्ठेनेच करण्यातयेते.उद्योगधंद्यात उद्योगपतींचे जातभाईमोठया अधिकाराच्या जागा बळकावतात.मोठमोठी व्यापारी घराणी हे एकाच जातीचे संघ आहेत.
धर्मादाय पद्धतीसुद्धा जातिनिष्ठ आहे.
जातिसंस्था ही तिरस्काराची उतरंड आहे.
जात आणि वर्ग यात फरक असा आहे की जातिपद्धतीत जितका अलगपणा असतो तितका वर्गपद्धतीत नसतो.
भारतीय समाजाच्या खालच्या थरातील लोकांना जातीव्यवस्था मोडावयाची आहे,
खालच्या थराला जर तुम्ही शिक्षण दिलेत तर ही जातिव्यवस्था मोडून पडेल.
आजकाल अमेरिकन सरकार आणि भारतीय सरकार शिष्यवृत्त्या देऊन शिक्षणाला जी भरमसाट मदत करीत
आहेत ते शिक्षण जातिव्यवस्था बळकट करणार आहे.ज्यांना जातिव्यवस्था मोडावयाची आहे
त्यांना शिक्षण दिले तर भारतात लोकशाहीचे भवितव्य उजळेल.आणि लोकशाही सुरक्षित राहिल.भारतीय
लोकशाहीच्या भवितव्याविषयी विचार करणा-या शिक्षणतज्ञांना नि नेत्यांना हे भाषण चिंतनिय
वाटेल.
*संदर्भ:डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
*लेखक:धनंजय किर.

जागतिक सन्विधान मिमान्सा

जगात मोठे देश कोणते ?
तर प्रामुख्याने नावे समोर येतात ते देश म्हणजे रशिया , अमेरिका ,चीन इ .म्हणून आपण या देशांच्या संविधान आणि आपले भारतीय संविधान यातील थोडक्यात काय फरक आहे ते जाणून घेऊ ...... 
१) अमेरिका :-
अ )अमेरिकामध्ये राज्य आणि देश्यामध्ये एक करार आहे .त्यामुळे अमेरीकातील राज्ये कधीही वेगळी होऊ शकतात .
आ )प्रत्येक राज्याचे व  देशाचे वेगळे नागरिकत्व घ्यावे लागते .दुहेरी नागरिकत्व घ्यावे लागते
इ )दोन पार्टी निवडणूक असते ...राष्ट्राध्यक्ष हा प्रमुख असतो
२) इंग्लंड :-
अ)आजही इंग्लंडमध्ये पूर्ण लोकशाही नाही कारण इंग्लंडची आजही  प्रमुख हि राणी असते घराणे शाही      .   आ .इंग्लंडचे  हि कधीही तुकडे होऊ शकतात ..उदा ,...स्कॉटलंड चा उठाव ,....
३) रशिया :-
अ)रशियामध्ये सुद्धा तुम्हाला पूर्ण मुलभूत हक्क मिळत नाहीत .
आ)व्यवसाय स्वतंत्र ,तसेच तुम्ही घटनेच्या विरुद्ध बोलू शकत नाही ...
काही गोष्टी ह्या हुकुमशाही पद्धतीने लादल्या आहेत ...
उदा .. उक्रेन ..आणि क्रीमिया
४) चीन :-
अ)चीनमध्ये लोकशाही नाही ,सगळी सत्ता हि एकाच पार्टी च्या हाती असते .
आ)ते प्रतिनिधी हे अप्रत्यक्ष निवडले जातात   चीनमध्ये कधीही तुकडे होऊ शकतात ..उदारण  सिंगापूर   चा उठाव ...मकाऊ ,तसेच तैवान ...

बाकीच्या देश्यामध्ये कॅनडा ,ऑस्ट्रेलिया यांनी याच्यामध्ये थोड्या प्रमाणात लोकशाही आहे .पण जगातल्या इतर देश्यामध्ये लोकशाही नाही ...म्हणून जग हे भारतीय संविधानाचा  हेवा  करते आहे
 पूर्ण लोकशाही गणराज्य असलेले भारत हे एकमेव देश आहे .
भारत ....
अ ) भारताचा राष्ट्रप्रमुख हा सुद्धा लोकांच्या प्रतिनिधीने  निवडून दिलेला असतो .
आ) न्याय व्यवस्था हि सुद्धा लोकांच्या हातात आहे ,कारण उच्च नायालायाचे जज ,तसेच सुप्रीम कोर्ट जज हे संसद नेमणूक करते .
इ ) भारताची सगळी सत्ता हि लोकांच्या हातात आहे जनता हि "सार्व भौम" आहे .जनता हि राजा  आहे .
ई ) स्वातंत्र्य ,बंधुता ,न्याय ,समानता हे मुल्ये असणारी एकमेव संविधान हे भारताचे आहे .
उ ) राज्य आणि केंद्र यांचा सुरेख संगम हा संविधानामध्ये आढळतो.
हे समजण्यासाठी लोकांना संविधान माहित असणे गरजेचे आहे .
   या संविधानामध्ये प्रधान मंत्राच्या हातात काही नाही ..तो एक कार्यकारी अधिकारी आहे .प्रत्येक बिल हे राष्ट्रपतीकडे जाते .तसेच राष्ट्रपतीच्या हातात तिन्ही सैनिकी  दले आहेत .पण तरीही राष्ट्रपती काही करू शकत नाही कारण ..संसद मोठी आहे .म्हणजे लोकांचे राज्य  .....म्हणून आजही भारत ६५०० जाती ..कितेक धर्म व हजार पार्ट्या आहेत .चाली रिती ,पंथ ,भाषा .काही झाले तरी भारत वेगळा होऊ शकत नाही .....
कारण हे संविधान मेरे भारत सपूत Dr  भीमराव रामजी आंबेडकर ने लिखा है.
           भारतीय संविधान हे जगात सगळ्यात "महान "आहे
                 डॉ   बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो ...
                             बौद्ध व्हा !जागृत व्हा
                             जयभीम नमो बुद्धाय 

बौद्ध धम्म मोठा कसा

" बौद्ध धम्म सर्वोत्तम " आहे यात तिळमात्र  शंका  नाही.   
" आज प्रत्येक बौद्ध बांधव मोठ्या अभिमानाने
सांगतो की आमचा बौद्ध धर्म सर्वोत्तम आहे, पण
एखाद्यानी जर विचारलेच की तुमचा बौद्ध धर्म सर्वोत्तम कसा काय,ते जरा सांगा......
तेंव्हा मात्र आपल्याला ते सिद्ध करताना
नुसती धांदल उडते. कारण बौद्ध धर्माची व्याप्ती व
आवाका एवढा प्रचंड आहे, की ते काही शब्दात मांडता येण्यासारखे नाही. पण अगदीच थोड्या शब्दात सांगायचे झाल्यास ते असे सांगता येईल.
" स्वातंत्र्य, समता व बंधूता हे तीन बौद्ध धर्माचे
मुख्य आधारस्तंभ आहेत. बुद्धाने स्पष्ट सांगितले आहे की,तुमच्या बुद्धिला पटल्यास धम्म स्विकारावे मी सांगतो म्हणून नाही.
बुद्धाची शिकवण ओळखण्याच्या काही कसोट्या सांगितल्या आहेत.त्यातील मुख्य कसोटी
" तर्क व बुद्धिवाद होय "
" बौद्ध धर्म जगातील पहिला व एकमेव धर्म आहे
जो मनाच्या अवस्थांवर चिकीत्सक काम करतो
ईतर सर्व धर्मात दु:खाचे निवारण करण्यासाठी ईश्वराच्या चरणी लोटांगन घालण्याचे उपाय
सुचविले आहेत,
जसे की ख्रिस्चन धर्मात दु:ख मूक्तीसाठी प्रार्थना करण्याची प्रथा आहे,त्या प्रार्थने मूळे ईश्वर प्रसन्न होऊन आपल्याला दु:खातून मुक्त करतो,
इस्लाम मधे अल्लाची प्रार्थना केली जाते,
एखाद्यावर दु:खाचे डोंगर कोसळल्यास अल्ला नाराज असल्याचे म्ह्टले जाते,किंवा एखाद्याच्या वाट्याला सुख आल्यास अल्ला मेहरबान असल्याचे म्ह्टले जाते,म्हणजे सुख व दु:खाचा संबंध थेट देवाशी जोडल्या जातो,त्यांच्या मते दु:ख निवारणाची जबाबदारी सर्वस्वी देवाची आहे
" अगदी याच धर्तीवर पण थोडसं वेगळं हिंदू (वेदीक) धर्मात ही आहे.
दु:ख मूक्तीसाठी देवाची प्राथना करुन हिंदू थांबत
नाही,तो होम हवन, यज्ञ व बळी देणे ईथवर मजल
मारतो,कारण हे सर्व केल्याने दु:खातून सुटका मिळते अशी भाबळी समजूत आहे,
एकंदरीत वरील तीन्ही धर्म दु:खाचे कारण
जाणन्यात स्वारस्य दाखवत नाहीत तर ते ईश्वराला पुढे करुन हात वर करतात,त्यामूळे दु:ख निवारणाचे काम बाजूला पडते "
वरील धर्मातील प्रथा चूक की बरोबर यावर चर्चा करायची नाही,फक्त कुठल्या धर्मात काय प्रथा आहेत एवढेच अधोरेखीत करायचे होते,
पण वरील सर्व धर्मा मध्ये दु:खाचे कारण ईश्वर आहे व त्याला प्रसन्न केल्याने दु:ख निवारण होते.
असा समज आहे,या ईश्वराच्या अस्तीत्वा मूळे दु:ख उत्पन्न करणारा महत्वाचा घटक मन मात्र दुर्लक्षित राहिला,मनाच्या अवस्थांवर दु:ख अवलंबून असतो व त्या अवस्थांवर नियंत्रण ठेवून दु:ख मुक्ती साधता येते. याचा कधी कुणी विचारच केला नाही "
" तो फक्त बुद्धानी केला "
" आता आपण बौद्ध धर्माकडे वळु या........
माणूस म्हणून जन्माला आल्यावर दु:खाशी गाठ आहे हे सर्वज्ञात आहे,पण दु:खावर उपाय मात्र निरनिरळ्या धर्मात निरनिराळे आहेत,बौद्ध धर्मात मात्र सगळ्यात वेगळी पद्धत आहे.
" बौद्ध धर्म हा मुळात निरिश्वरवादी धर्म असल्यामूळे दु:ख निवारनाचे काम देवावर सोपविण्याची सवलत नाही,किंवा भगवान बुद्धाने मी ईश्वर नाही,ईश्वराचा दूत नाही वा प्रेशीत ही नाही,मी तुमच्या सारखा एक साधा माणूस आहे. असे सांगून ठेवल्यामूळे चमत्कारालाही स्कोप
नाही,मग आपसूकच या दु:खाचे निवारण
करण्याची जबाबदारी माणसावर येऊन पडते "
" दु:ख निवारणाची बौद्ध पद्धती "
" आजच्या भाषेत बोलायचे झाल्यास,डोळा दुखल्यास आपण आय स्पेशालिस्टकडे जातो, दाताचा आजार झाल्यास आपण डेंटिस्टकडे जातो, हृदयाचा आजार झाल्यास हार्ट स्पेशालिस्टकडे जातो...
पण..... मन आजारी झाल्यास कुणाकडे जायचे ?
" मन दुखावल्यास काय करावे ????
" तर यावर उत्तर आहे :- बौद्ध धर्माकडे जावे,तिथे
मनावर योग्य उपचार होतो,भगवान बुद्ध हे जगातील पहिले मानसोपचार तज्ञ होते,बौद्ध धर्मात
मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांचा अभ्यास केला जातो,विपश्यना द्वारे त्यावर उपचार केला जातो,
मनाला अधिक सुदृढ बनविण्याची कला विपश्यनेत
शिकविली जाते,दु:खाचे मूळ मानण्यात आहे. अन
ज्याला मनावर काम करता येते तो दु:खांच्या हातात हात घालून हसत खेळत हिंडु शकतो,अन हे सगळं विपश्यनेतून साधता येते.
पण गंमत अशी आहे की मनाच्या आजारावर आपण उपचार करण्याचा विचारच करत नाही,मनं दुखावल्यास त्याच्यावर उपचार आहे.हेच मुळात आपल्याला माहित नाही,मनाचे खच्चिकरण झाल्यास त्याला परत उभं करता येते,मनातील द्वेष,क्लेश नाहिसे करुन प्रसन्न मनानी जगता येते,
मनाला लागलेले चटके, ज्यामूळे आपण अत्यंत दु:खी होऊन नकारात्मक बनतो ते सारे चटके
धुवून काढता येतात "
" एखाद्याचे शब्द मनात खोलवर जाऊन रुततात व आपण कायमचे त्या व्यक्ती बद्दल नकारात्मक बनतो,पण मनावर योग्य ती प्रक्रिया करुन क्षमाशील बनता येते,मनातील असंतोष मिटविण्याची कला बुध्दानी हजारो वर्षापुर्वी विकसीत करुन ठेवली आहे,पण आम्ही तिकडे पाठ फिरवून जगतो आहे, मनाला स्थैर्य मिळवून देण्याची अत्यंत परिणामकारक विद्या भगवान बुद्धानी विकसीत केली आहे. मनाला निर्विकार करुन सुदृढ मन बहाल करण्याची किमया बौद्ध
धर्मात आहे "
" बौद्ध धर्मात मनावर उपचार करण्याची पद्धत फार प्राचिन आहे,माणसाच्या जिवनातील प्रत्येक घडामोडीत मनाचा सिंहाचा वाटा असतो,मन जर विचलीत वा दु:खी असल्यास कुठलेच काम करता येत नाही किंवा हवा तसा निकाल मिळत
नाही,
अगदी याच्या उलट मन जर प्रसन्न असेल तर कामं सोपी व सहज होतात,नात्यांतील
गोडवा वाढविता येतो.लहान सहान अडचणीना तोंड देताना माणूस डगमगत नाही,एखाद्यानी टिका केल्यास योग्य मार्गाने उत्तर देण्याची सुबुद्धी मनाचेच काम आहे,
अशा या अत्यंत महत्वाच्या मनावर उपचार
करण्याची पद्धत म्हणजे विपश्यना होय अन ही विपश्यना बौद्ध धर्माची सर्वोत्तम देण आहे .
" भगवान बुद्धाने मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांचे
विश्लेषण केले आहे,त्या त्या टप्प्यात मनावर उपचार करण्यासाठी विपश्यना अत्यंत प्रभावीपणे काम करते,कलुषित मनाला स्वच्छ करण्याचे काम विपश्यना करते,मनातील आकस काढून टाकण्याचे काम विपश्यनेद्वारे अत्यंत
प्रभाविपणे केल्या जाते,
आत्मविश्वास,एकाग्रता,चिंतन,स्मरण अशा विविध
आघाड्यावर मनाला शक्तीशाली बनविन्याचे काम
विपश्यनेतुन साधता येते "
" एख्याद्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन
हा जितका बौद्धिक बेसची डिमांड करतो तितकाच
मनाच्या अवस्थेची ही डिमांड करतो. अन
मनाची अवस्था कायम सुदृढ ठेवण्याची कला बौद्ध धर्मात आहे "
" दु:ख हे दुसरं तिसरं काही नसून मनाची अवस्था होय. अन बौद्ध धर्म आम्हाला या अवस्थांवर नियंत्रण ठेवण्याची कला शिकवतो,
म्हणून बौद्ध धर्म सर्वोत्तम होय "
 नमो बुद्धाय! जय भिम !

बौद्ध धम्मग्रंथ : त्रिपिटक

***  त्रिपिटक परिचय ***
====================
       आज जगात विविध धर्म आणि विविध संप्रदाय आहेत. त्यांचे धर्मग्रंथ म्हणुन ओळखले जाणारे त्यांचे स्वतःचे एक एक ग्रंथ सुद्धा आहेत.
यहुदींचे बायबल (जुना करार), इस्लामचे कुरआन, ख्रिश्चनांचे बायबल (नवा करार), हिंदुंची गीता, वैदिकांचे वेद, शिखांचे गुरु ग्रंथ साहीब, इत्यादी, इत्यादी.
     या सर्वांचा विचार करता बुद्धाचा धर्म कोणत्या धर्मग्रंथाद्वारे सांगण्यात आलेला आहे असा आपल्याला प्रश्न पडतो.. काही बौद्धांचा धर्मग्रंथ म्हणून त्रिपिटकाचा उल्लेख करतात. परंतु या त्रिपिटकाचा आवाका पाहू जाता सरळ आणि सोपे एकच उत्तर मिळेल ते म्हणजे बुद्धाच्या धर्माचे धर्मग्रंथ म्हणण्यासारखे एकही पुस्तक नाही तर संपुर्ण ग्रंथालय आहे. कारण त्रिपिटक या नावाने ओळखले जाते ते काही एकच पुस्तक नाही आहे, तर विविध ग्रंथांचा तो ग्रंथ संग्रह आहे. या लेखामध्ये आपण बौद्ध साहित्याची व्याप्ती आणि थोडक्यात परिचय याबद्दल जाणुन घेऊया...
धम्माचे मुळ ग्रंथ त्रिपिटक तीन भागात विभागले आहे.
१.    विनयपिटक,
२.    सुत्तपिटक,
३.    अभिधम्मपिटक
१.     विनयपिटक
    विनयपिटकामध्ये सामान्यतः
(अ)   महावग्ग
(ब)    चुलवग्ग
(क)   पाराजिक
(ड)    पाचित्तिय
(इ)    परिवार.
या पाच ग्रंथांचा समावेश आहे.
२.   सुत्तपिटक
    सुत्तपिटकामध्ये पाच ग्रंथांचा समावेश होतो.
(अ)  दिघ निकाय - ३४ सुत्त,
(ब)   मज्झिम निकाय - १५२ सुत्त
(क)  संयुत्त निकाय - ७७६२ सुत्त
(ड)   अंगुत्तर निकाय - ९५५७ सुत्त
(इ)   खुद्दक निकाय - खुद्दक
निकायामध्ये सुत्तांऐवजी १५ ग्रंथांचा समावेश होतो. ते पुढील प्रमाणे :
१.    खुद्दकपाठ
२.    धम्मपद
३.    उदान
४.    इत्थिवत्थु
५.    सुत्तनिपात
६.    विमानवत्थु
७.    पेतवत्थु
८.    थेरगाथा
९.    थेरीगाथा
१०.  जातक
११.  अपदान
१२.  निद्देस
१३.  पटिसंभिदामग्ग
१४.  बुद्धवंश
१५.  चरियापिटक
३.  अभिधम्मपिटक
        अभिधम्मपिटकात प्रामुख्याने सात ग्रंथांचा समावेश आहे.
१.   धम्मसंगणि
२.   विभंग
३.   धातुकथा
४.   पुग्गलपञती
५.   कथावत्थु
६.   यमक
७.   पट्ठान
     पाली त्रिपिटकाशिवाय पाली वाङ्मयामध्ये पाली अनुपिटकांचाही समावेश होतो. अनुपिटक म्हणजे त्रिपिटकाच्या रचनेनंतर रचण्यात आलेले साहित्य.
पाली अनुपिटक :
१.   नेत्तिपकरण
२.   पेटकोपदेश
३.   मिलिंद प्रश्न
४.   विसुद्धीमग्ग
५.   अट्ठकथा
६.   टिका
दीपवंस, महावंस, चुळवंस, बुद्धघोसुप्पति, सद्धम्मसंगह, महाबोधिवंस, थूपवंस, गंधवंस, सासनवंस, अनागतवंस, बुद्धालंकार, जिनालंकार, तेलकटाहगाथा, जिनचरित, सद्धम्मोपाय, पञगतिदीपन, सहस्सवत्थुपकरण इत्यादी ग्रंथांचा समावेश पाली अनुपिटका विनयपिटक,सुत्तपिटक,विनयपिटक,अभिधम्मपिटक,मध्ये होतो.
पाली त्रिपिटकाची व्याप्ती खुप मोठी आहे, जर आपण त्यांचा संग्रह केला तर ५०० पेक्षा जास्त पानांचे एक खंड अशाप्रकारे १४५ पेक्षा जास्त खंड बनतील. शिवाय त्रिपिटकाच्या अट्ठकथा, टिका यांची व्याप्ती मुळ त्रिपिटकापेक्षाही जास्त आहे.
     याशिवाय तिबेटियन साहित्याचे ३३७ खंड,  चिनी साहित्याचे प्रत्येकी १००० पानांचे १०० खंड.  याखेरीज मंगोलीय आणि जपानी साहित्यांचा विचार केल्यावर आपल्याला बौद्ध साहित्याची व्याप्ती किती मोठी आहे याचे अनुमान लावणे कठीणच आहे.
     आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व ग्रंथांचा अभ्यास करून तथागत भगवान बुद्धांना अपेक्षित असलेला मानव कल्याणकारी, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा "भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म" हा ग्रंथ आम्हाला दिला.
    हा ग्रंथ, ८खंड, ३९भाग, २५४प्रकरण, ४४६पाने, ५०२०ओळींमधे सामावलेला आहे.
जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा.
नमो बुध्दाय! जय भिम !

बुद्ध आनी धम्म ग्रंथ vishesh


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांना `Buddha And His Dhamma` या अनमोल ग्रंथाची टंक लिखित प्रत भेट दिली होती. आणि हा ग्रंथ सरकार तर्फे छापण्यात यावा अशी सूचना केली, परंतु सरकार तर्फे लाखो रुपये कुंभमेळ्यासाठी देणा-या नेहरुने ग्रंथ छापणे ही खर्चिक बाब आहे म्हणून छापण्याचे नाकारले होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दि.२४ ऑक्टोबर १९५१ रोजी सकाळी ७ वाजता `Buddha And His Dhamma` हा आपला जीव की प्राण असलेला अनमोल ग्रंथ इंग्रजी मधून लिहिण्यास सुरूवात केली.जगात जेवढे म्हणून धर्माच्या बाबतीत विचारवंत होऊन गेले आहेत, त्यांनी सर्वांनी मिळून जेवढी धार्मिक पुस्तके वाचली असतील त्यांच्यापेक्षाअधिक पुस्तके बाबासाहेबांनी वाचली आहेत. तसेच त्या त्या धर्माच्याधर्मपंडीता बरोबर धार्मिक विचारांच्या बाबतीत समोरा समोरचर्चा करण्याची बाबासाहेबांची तयारी होती. एवढे त्यांचे सर्व धर्मांचे संदर्भासहीत अफाट ज्ञाण होते.बुध्द धम्माच्या बाबतीत सुध्दाबाबासाहेबांचे तर मॅट्रीक पासूनच वाचन सुरू केले होते. त्यांनी जगातील बुध्द धम्माचे जे उपलब्ध साहित्य होते त्रिपीठकासह ते सर्व वाचून काढले होते. त्यांचे चिंतन मनन करुन व त्या सर्वांचा अर्क काढून एक शुध्द ग्रंथ लिहिला. त्यासाठी त्यांनी आपल्या जीवाची, तब्बेतीची काळजी न घेताजो अनमोल ग्रंथ लिहिला व जो आपला जीव की प्राण असलेला ग्रंथआहे तो म्हणजे `बुध्द आणि त्यांचा धम्म` होय.बाबासाहेबांनी लिहीलेल्या अनेक अप्रतीम ग्रंथांपैकी ही त्यांची शेवटची रचना होती.हा ग्रंथ लिहीतांना त्यांच्या समोर संपूर्ण त्रिपिटक होतं. सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. प्रत्येक पिट्कात आणखी १०-१२ ग्रंथ तसेच या सर्व ग्रंथावर आधारीत अनेक अर्थ कथा होत्या, अनेक प्रकारचेबुध्द चरित्र संबंधित साहित्य होतं. बुध्दांसंबंधी जगत जेवढे म्हणून महत्वाचे साहित्य उपलब्ध होते या सर्व वाड्मयातुन त्यांना एक अशा ग्रंथाची रचना करायची होती ज्यात संपूर्ण बुध्द चरित्र त्याची शिकवण समाविष्ट होईल आणि त्याची भाषा सर्वसामान्यांनासमजायला सोपी असेल.हा ग्रंथ एकुण आठ काण्डात विभागला आहे. प्रत्येक काण्डात ७-८ भाग आहेत. प्रथम काण्ड बुध्दजीवन कथेनी व्याप्त आहे.
उर्वरित काण्डात धम्म दीक्षा, त्यांच आंदोलन, धर्म-धम्म, धर्म-अधर्म आणि त्यांच्या समकालीन विचारंबद्दल लिहीण्यात आले आहे. "जे विचार बुध्दी संगत आहेत, जे विचार तर्क संगत आहेत तेच बुध्द विचारआहेत" अशी बुध्द विचारांची अतिशय सोपी आणि समर्पक व्याख्या बाबसाहेबांनी या ग्रंथात मांडली आहे.दि.५ डिसेंबर १९५६ या दिवशी"Buddha And His Dhamma" या अनमोल ग्रंथाची प्रस्तावना लिहून पूर्ण केली.मूळ इंग्रजी ग्रंथ सिध्दार्थ कॉलेज पब्लीकेशन मुंबई यांनी १९५७ मध्ये प्रकाशित केला होता."Buddha And His Dhamma" या अनमोल ग्रंथाचे सर्व प्रथम इंग्रजी मधून हिंदी भाषेत अनुवाद डॉ. भदंत आनंद कौसल्यायनयांनी केले. सिध्दार्थ प्रकाशन मुंबई यांनी ते १९६१ मध्ये प्रकाशीत केले. त्याचे सर्वाधिकार पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई यांच्या कडे होते.त्यानंतर "Buddha And His Dhamma" या अनमोल ग्रंथाचे इंग्रजी किंवा हिंदी भाषेमधून सर्व प्रथम मराठी भाषांतर सुध्दा सिध्दार्थ प्रकाशन मुंबई यांनीच प्रकाशीत केले. त्याचे सर्वाधिकार पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई यांच्याकडेच होते.आता मात्र हा "Buddha And His Dhamma" अनमोल ग्रंथ भारतातीलआणि जगातील अनेक प्रकाशाकांकडून व भारतातील आणिजगातील अनेक भाषांमध्ये भाषांतरीत झाला आहे, होत आहे आणि होणार आहे .

बाबासाहेबांचे सुविचार

* दैवावर भरवसा ठेऊन वागू नका,जे काम करावयाचे असेल ते आपल्या मनगटाच्या जोरावर करा

* आत्मोद्धार हा दुसर्याच्या क्रुपेने होत नसतो तो ज्यांच्या त्याने करायचा असतो.

* विचारक्रांती झाल्याशिवाय आचारात फेरबदल होवू शकत नाही. आचारात फेरबदल करावयाचा झाल्यास    आधी मनावर बसलेल्या जुन्या विचारांची छाप काढून टाकने अगदी आग्त्याचे आहे.

* धर्म हा मनसाकरिता नसून माणूस हा धर्माकरीता आहे.

* तिरस्कारनीय गुलामगीरी आणि अमानुष अन्याय यांच्या गर्गेत पिचत पडलेल्या ज्या समाजात मी जन्मास  आलो आहे.त्या समाजाची गुलामगिरी नष्ट करण्यात जर का मी अपयशी ठरलो, तर स्वत:स गोळी घालीन.

* भावी पिढीला आजच्या गुलामगीरीचा मागमसही दिसणार नाही,अशी अलौकिक स्वार्थत्यागाची कामे अगदी  निर्भयपणे करावयास तुम्ही सज्ज झालात की,माझ्या कार्याची जबाबदारी आपोआपच पार पाडण्याचे पुण्य  तुमच्या पदरात पडेल.

* स्वातंत्र्याचे हक्क भीक मागून मिळत नसतात,ते स्वसामर्थ्याने सन्पादवायचे असतात,देणगी म्हणून ते  लाभत नसतात.

* ज्याप्रमाणे कोणत्याही राष्ट्राला दुसर्या राष्ट्रावर राज्य करण्याचा अधिकर नाही,त्याप्रमाणे कोणत्याही एका विशिष्ट वर्गाला दूसर्या वर्गावर अधिसत्ता गाजविन्याचा अधिकार नाही.

* ज्या राष्ट्रांत माझ्या अस्पृश्य बांधवांची माणुसकी धूळीप्रमाणे तुडविली जात आहे, ती माणुसकी मिळण्यासाठी या राष्ट्राचे मी कितीही नुकसान केले तरी ते पाप न ठरता पुण्यच ठरणार आहे.

* माझा जन्म सर्वसाधारण जनतेची जबाबदारी घेण्यासाठी असावा.

* तुम्ही आपली गुलामगिरी नष्ट करा.स्वाभिमान शुन्यतेचे जीवन जगणे नामर्दपनाचे आहे.

* आपण मला देवपदाला चढवू नका.एखाद्या व्यक्तीला देवपनाला चढवून इतराने आंधळेपनाने त्याच्या मागे  धावत जावे,हे मी तरी कुम्कुवतपनाचे लक्षण मानतो

बाबासाहेबांचा शिक्षण


बाबासाहेब म्हणत, "अडाणी आई बापाच्या पोटी जन्म घेऊन जर आपण पदवीधर झालात, तर त्याचा दुराभिमान बाळगू नका, आपल्या कर्तुत्वाची जाणीव ठेवून झटून अभ्यास करा व अधिकाधिक पुढच्या पायऱ्या गाठा....!!! बाबासाहेबंशिवाय शिक्षणाचे महत्व जाणणारा या भूमीवर जन्माला न्हवता आणि कदाचित जन्मणार देखील नाही.

इतिहासाची पाने चाळताना आपण बऱ्याच गोष्टी पाहतो, जॉर्ज पंपन च्या स्वागतासाठी कोणी मुंबईत "गेट-वे ऑफ इंडिया" बांधले शहजाहने आपल्या प्रिय पत्नी मुमताज हिच्या साठी "ताजमहाल" बांधले, राजे महाराजे यांनी विस्तीर्ण वैशिष्ठपूर्ण राजवाडे, शिश महाल, राजमहाल, सोनेरी महाल, तर कुणी मंदिरे मस्जीदी बांधल्या, कोणी सोन्याच्या विटांनी तर कोणी हिरे मानिकांनी मढवलेले सुवर्ण मंदिर अशी कित्येक सुंदर कालाकृत्या बांधल्या, परंतु पुस्तकांसाठी घर बांधण्याचे स्वप्न, पहिले आणि शेवटचे एकाच व्यक्तीने बाळगले, ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. माणूस स्वत:ला राहण्यासाठी घर बांधतो, मात्र ग्रंथांना जीव की प्राण मानणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आवडत्या ग्रंथांसाठी स्वत:चे राजगृह बांधले, पुस्तकांसाठी घर बांधणे हे केवळ त्यांच्या आयुष्यातील निव्वळ स्वप्न न्हवते तर त्यांच्या आयुष्यातला तो एक मोठा संकल्प होता.
बालपणापासून अस्पृश्य समाजातील इतर आपल्या समाज बांधवांसह जो अन्याय अत्याचार प्रचंड मानहानी त्यांनी सोसली, त्यामुळे व्यथित झालेल्या बाबासाहेबांनी विचार केला कि, "हे माझ्यावर अत्याचार केवळ माझ्यापुरतेच मर्यादित नाहीत तर ते सर्वच बांधवांवर होत आहेत. त्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी आपण स्वत मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या पूर्ण समर्थ असणे अत्यंत आवश्यक आहे." यासाठी ज्ञानप्राप्ती करून घेणे गरजेचे आहे, या विचारातून त्यांच्या मनात जिद्द निर्माण झाली आणि ज्ञानप्राप्ती साठी "पुस्तकभांडार" असणे त्यांना आवश्यक  वाटत होते,

बाबासाहेबांची सुरवातीचे दिवस अत्यंत कठीण परीस्थित गेले, समाजाच्या हितासाठी त्यांनी वकिली सुरु केली, एक हुशार वकील म्हणून त्यांची ख्याती चोहीकडे पसरली होती,   एक प्रसंग सांगावासा वाटतो... एकदा गेमे वाडीच्या महाराची जमीन ऐंशी वर्षे दुसऱ्याच्या ताब्यात होती. ती बाबासाहेबांनी सोडवून दिली, त्यांनी साहेबाना फी दिली. बाबासाहेबांनी घरी येवून धोतराच्या सोग्यातील सारे रुपये रमाई च्या पुढे ओतले, आणि म्हणाले,
"हे घे पैसे, मी संसारात लक्ष घालत नाही,बायको मुलांकडे लक्ष देत नाही, असा सारखी माझ्यावर ओरडत असतेस, हे पैसे मोजून किती ते  सांग...!
रमाई ने पैसे गोळा केले आणि वीस वीसच्या चवडी आणि दोन दहाच्या अन एक एकची चवड आहे असे सांगितले...बाबासाहेब म्हणाले... "आग पण ते किती ?,
रमाई म्हणाल्या...."मी अडाणी हाय.....या सगळ्या रुपयाला किती म्हणतात ते तुमालाच ठावूक..!"  
तेव्हा बाबासाहेब म्हणाले..."तू अडाणी आहेस ते बरे झाले नाहीतर बॅरिस्टर होऊन मला चांगल हैराण केलं असतंस..!"
त्यावर रमाई म्हणाल्या, " मी  ब्यारीस्टरच हाय....., "तुम्हाला एवढ बी काळात नाही.....बॅरिस्टर ची बायको   बॅरिस्टरच कि" त्यावर दोघेही खो खो हसले...


बाबासाहेबांची आर्थिक स्थिती सुधारली ती १९३० सालानंतर, त्यांनी मुंबईत दोन इमारत बांधायचे ठरविले, एक राहण्यासाठी आणि दुसरी पुस्तकांसाठी..त्यांच्या ग्रंथ संपादांसाठी म्हणून त्यांनी दादर हिंदू कॉलनी येथे ९९ व १२९ क्रमांकाचे प्रत्येकी ५५ चौरस यार्ड क्षेत्रफळाचे दोन प्लॉट खरेदी केले. दोन्ही प्लॉट चे भूमिपूजन १९३० सप्टेंबर महिन्यात झाले. ९९ क्रमांकाचे प्लॉटवरील इमारतीस "चारमिनार" तर १२९ क्रमांकाच्या प्लॉट वरील इमारतीस सिद्धार्थ गौतमाच्या राजमहालाचे नाव "राजगृह" असे नाव दिले.   इमारतीचे प्रत्यक्ष बांधकाम १९३१ च्या जानेवारी महिन्यात सुरु होऊन ते सन १९३३ मध्ये पूर्ण झाले. बांधकामावर देखरेख करण्याचे कामास श्री. आईसकर यांना नेमले होते. बाबासाहेब हे स्वत ज्ञानपिपासू असल्यामुळे त्यांची ज्ञान ची भूक मोठी होती, त्यांची विद्यासंपन्न करण्याची अभिलाषा महान होती, त्यांची शिक्षण घेण्याची दुर्दम्म इच्छाशक्ती अपार होती. त्यांचे शिक्षणा विषयी आधुनिक व उदार मतवादी दृष्टीकोन या संबंधी जगभरातील विद्वानांमध्ये कुतूहल होते, आजही आहे.  इंग्लिश लेखक थॉम्पसन म्हणतो की,"डॉ. आंबेडकरांचे जे जे साहित्य दृष्टीस पडेल ते ते वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की डॉ. आंबेडकरांमुळे सनातनी प्रवृत्तींना वेडाचे झटके येतात."    
डॉ.  बाबासाहेबांनी  परदेशी आपला विद्याभ्यास मोठ्या जिद्दीने पूर्ण केला. बाबासाहेब भारतात परत येताना त्यांनी काही ग्रंथ भारतात पाठविण्यासाठी एका जहाज कंपनीला दिले होते. ते जहाज भारतात येताना काही प्रमाणात क्षतिग्रस्त झाल्याने जहाजातील काही ग्रंथ समुद्रात पडले, हे जेव्हा बाबासाहेबांना कळले तेव्हा ते फार दुखी झाले होते.  मायदेशी परतल्यावर बाबासाहेब अभ्यासात गुंतून जात, एकदा वाचायला लागले कि पुस्तकामध्ये अगदी गढून जात, अन्न पाणी सर्व काही विसरून जात, त्यांच्या अभ्यासाच्या मध्ये कोणी आलले त्यांना खपत नसे ते लगेच रागवत, परदेशातून आल्यावर परदेशातील वाचनालायासारखे आपले स्वताचे एक भव्य दिव्य वाचनालय असावे असे त्यांना नेहमी वाटे। ..
त्यामुळे त्या दृष्टीने ते प्रयत्नशील होते, स्वताच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण एक सुवर्ण संधी समजून ती सत्कारणी लागावी म्हणून बाबासाहेब नेहमी झटत.  
बाबासाहेबांसारखा ज्ञान साधनेसाठी धडपडणारा हा ज्ञानमहर्षी स्वतचे ग्रंथालय कश्या प्रकारे ठेवीत असेल याची कल्पना करावी. ग्रंथांसाठी घर बांधताना त्यांनी त्या संम्बंधी  पुरेपूर अभ्यास केला होता. त्यांना हवे असणारे ग्रंध क्षणार्धात मिळाले पाहिजेत, अश्या पद्धतीने त्यांनी ग्रंथालयाची बांधणी केली.  
ग्रंथालयाची मांडणी त्यांनी न्यूयार्क मधील ग्रंथालायासारखीच केली तर मोठमोठ्या इमारती सारख्या खिडक्या, रोमन पद्धतीचे भव्य असे उत्तुंग खांब, भरपूर प्रकाश येईल अश्या विशिष्ट अंतराच्या खिडक्या, मोकळी जागा, भिंतींमध्ये बांधलेला सज्जाचा माळा, हि पुत्कांसाठी बांधलेल्या राजगृहाची वैशिष्टे पाहताना रोम,नुयार्क, इंग्लंड,अमेरिका, या देशांमधील जगप्रसिद्ध वाचनालयातील उत्तर ग्रंथांचे प्रतिबिंब आतमध्ये उमटलेले दिसते.  बाबासाहेबांच्या संकल्पनेतील राजगृह दादर येथी हिंदू  कॉलनीत दिमाखाने उभे होते. त्या कॉलनीत साहित्यिक, डॉक्टर, इंजिनियर, वकील, राजकारणी, मोठ मोठे व्यापारी देखील राहत होते, परंतु रत्नजडीत  हिऱ्याच्या कोंदणात "कोहिनूर" जसा चकचकवा तसे बाबासाहेबांचे "राजगृह" चमकत होते.    बाबासाहेबांचे ग्रंथप्रेम जगविख्यात आहे, देश विदेशातील नानाविविध ग्रंथालयांना भेटी देवून, नाव नवीन ग्रंथ मागवून त्यांनी आपल्या संग्रही ठेवले. बाबासाहेब जेवढे प्रेम इंग्रजी पुस्तकांवर करत तेवढेच ते मराठी पुस्तकांवर देखील करत. परदेशात असताना ते आवडीने मराठी ग्रंथ मागवून त्याचे वाचन करीत व त्यावर टिप्पणी हि करत, बाबासाहेबांच्या या ग्रंथ प्रेमामुळे बाबासाहेबांचे विचारांचे सामर्थ अत्यंत बळकट असे झाले होते. मराठी व इंग्रजी पुस्तकाबरोबर राजगृहामध्ये गुजराथी, उर्दू फ्रेंच जर्मन, पारशी ग्रंथ असे सर्व मिळून ५०,००० च्या जवळपास राजगृहामध्ये ठासून भरलेले आहेत. या ग्रंथांमध्ये प्रामुख्याने राजकारणावर ३०००, इतिहासावर २६००, कायद्यावर आधारित ५०००, धर्मशास्त्रावर २०००, चरित्रे १२००, इतर साहित्य ३०००, अर्थशास्त्र १०००, तत्व ज्ञान ६०००, युद्धशास्त्र ३००० व इतर ७९०० असा आकडा होतो.
या वर्गीकरणावरून त्यावेळी क्रमांकासह लेबल लावून ग्रंथ रचून ठेवलेले आहेत.  राजगृहाच्या या ग्रंथालयामध्ये त्यांच्या गैऱ्हाजेरीमध्ये कोणासही जाण्याची मुभा न्हवती. राजगृहाच्या दाराशी त्यांचा कुत्रा पीटर हा बाबासाहेबांच्या ग्रंथालयाची राखण करीत असे.  एवढ्या प्रचंड ग्रंथ भांडारामध्ये कोणतेही पुस्तक हवे असल्यास त्यांना अचूक मिळत असे, इंग्लंडच्या ठक्कर कंपनीतून त्यांनी त्यासाठी खास ग्रंथालय कार्डे बनवून घेतली होती व श.शा.रेगे यांच्याकडे ती जबाबदारी सोपवून ती यादी पूर्ण करून घेतली होती.  
राजगृहाचे काम पूर्ण होताच बाबासाहेबांनी प्रथम आपल्या लाडक्या रामुस, रमाईस राजगृहामध्ये आणले होते. राजगृह उभा राहिल्या नंतर  बाबासाहेबांनी डबक चाळीतील सर्वाना आमंत्रित केले होते. तेव्हा राजगृहात प्रवेश करताना रमाई सांगत "साहेबांच्या कष्टातून आम्ही हिंदू कॉलनी परिसरात "राजगृह" नामक एक नवीन आणि लेखणी, टोलेजंग वास्तू उभी केली.हे घर नसून एखाद्या महान पंडिताच भव्य - दिव्य ग्रंथ भांडार वाटत.....!"   बाबासाहेबांचे गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी म्याट्रिक पास झाल्यानंतर त्यांना भेट दिलेले "बुद्धचारित्र" ह्या ग्रंथाने पुत्कांची सुरुवात करून "बुद्ध आणि त्यांचा धम्म" असे कित्येक ग्रंथ बाबासाहेबांनी याच राजगृहातील ग्रंथालयात आणला, "भारतीय संविधान", "बुद्ध आणि त्यांचा धम्म" असे कित्येक ग्रंथ बाबासाहेबांनी लिहल्याचा हा "राजगृह" साक्षी आहे. आज हि बाबासाहेबांच्या स्पर्शाने पावन झालेले "राजगृह" त्यातील ग्रंथासह बाबासाहेबांची आतुरतेने वाट पाहत आहे...कारण बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी घर बांधले होते..."पुस्तकांसाठी घर बांधणारे" बाबासाहेब हे जगातील एकमेव व्यक्ती ठरले....!!!

नमो बुद्धाय! जय भीम!  जय भारत!

सम्राट अशोक विजया दशमी

























दिन  विषेष  : सम्राट अशोक विजयादशमी ( ११ ऑक्टोबर २०१६ )  याच दिवशी सम्राट अशोकाने बौद्ध धम्माची दिक्षा घेतली आणि सारा भारत दैश बौद्ध झाला .
सम्राट अशोकाचा पङ पणतु सम्राट बृहद्रथचा खुन कपटाने केला तो त्याचा ब्राम्हण सेनापती पुष्यमित्र शुंगाने आणि याच कथेला नाव दिलं  रामायण .
आणि नंतर भृगुसंहितेला मनुस्मृती नाव देऊन त्यावरून आधारित चातुर्वर्ण्य व्यवस्था अंमलात आणली .
हजारो वर्षांनी परत एका "युगपुरूषाने" हे धम्मचक्र फिरवून विषमतेवर आधारित समाजरचनेला धक्का दिला आणि माणसा माणसातील भेदभाव दूर करण्यासाठी एक नवीन आदर्श संहिता ( भारतीय संविधान ) या देशाला अर्पण केली.......
यानंतर सामाजिक उतरंडी वरचे जातीच्या आधारित समाजातील हीनतेला मुठमाती देऊन १४  ऑक्टोबर  १९५६ रोजी सम्राट अशोक विजयादशमी दिवशी , त्याच पुष्यमित्र शुंगाच्या प्रतिक्रांतीस जमिनीत गाडले आणि समतेवर आधारित बौद्ध धम्म त्याच्या जन्मभूमी भारतात परत आणला .......
प.पू..डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आणि त्यांच्या महान विचारांना त्रिवार वंदन !!!
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

त्रिशरण पंचशिल अर्थ

* ञिसरण पंचशील *
*****************
  नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुध्दस्स..!
  नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुध्दस्स..!
  नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुध्दस्स..!
      
     बुध्दं सरणं गच्छामि  ||
     धम्मं सरणं गच्छामि  ||
      संघं सरणं गच्छामि  ||
दुतियम्पि, बुध्दं सरणं गच्छामि ||
दुतियम्पि, धम्मं सरणं गच्छामि ||
दुतियम्पि, संघं सरणं गच्छामि ||
      
ततियम्पि,बुध्दं सरणं गच्छामि ||
ततियम्पि,धम्मं सरणं गच्छामि ||
ततियम्पि, संघं सरणं गच्छामि ||
पाणातिपाता वेरमणी- सिक्खापदं समादियामि ||1||
अदिन्नादाना वेरमणी- सिक्खापदं समादियामि ||2||
कामेसु मिच्छाचारा वेरमणी- सिक्खापदं समादियामि ||3||
मुसावादा वेरमणी- सिक्खापदं समादियामि ||4||
सुरा- मेरय- मज्ज- पमादठ्ठाना वेरमणी- सिक्खापदं समादियामि ||5||
   साधु | साधु ||  साधु |||
******************************************************
  बुद्ध वंदणेतील 
पाली शब्धांचे  मराठी अर्थ
नमो — वंदन ,नमस्कार , हात जोडणे
तस्स — तुझ्या सारखा ,गोतमा सारखा.
भगवतो — पविञ  Blassedone
भगवा —तेजस्वी Bright
भगवतो —उदात Sublime
अर्हतो —निष्पाप  Worthyone
सम्मा — योग्य Righty
सम्मबुध्द —सम्मबोधी प्राप्त ,प्रज्ञा प्राप्त
प्रज्ञा प्राप्त — Enlightened one
प्रज्ञा —योग्य ज्ञान
बुद्ध  —गोतम बुद्ध
सरणं —आश्रय Refugeshelter
गच्छामि —मी जातो
संघ —भिक्खूंचा संघ
धम्म —सदाचाराचा मार्ग
दुतियम्पि — दुस-यांदा
ततियम्पि — तिस -यांदा
पंचशील —पाच शील
पाणातिपाता — प्राणि हिंसा
वेरमणि— अलिप्त राहने
सिक्खापदं  — शिक्षण
समादियामि —अंगिकारणे, अनुसरणे
अदिन्न — जे दिले नाही ते
आदान — ते घेण्यापासुन
अदिन्नदाना —चोरी
कामेसु  —लैंगिक
मिच्छाचारा —दुराचार
मुसावादा —असत्य वाचा ,खोटे बोलणे
सुरा  —दारु  ,मादक द्रव्य
मेरय —फळापासुन काढलेली दारु
मज्ज —मद्य
पमा —प्रमादकारक ,उत्तेजनकारक
दठ्ठाना — सेवन करणे ,खाने
साधु  —योग्य
अब्रम्हचरिय —अनैतिक जीवन
विकाल —अवेळी
नच्छ —नाच, नृत्य
गीत — गाने
वादित्य — वाद्य
विस्सुक — अश्लील
दस्सन —दृष्य
माला — फुलांची माळा
गंध — अत्तर
विलेपन — सौंदर्यप्रसादने
धारण — धारण करणे
मंडण — श्रृंगार
विभुस्स — अलंकार
उच्च सयना —उंच बिछाना
महा सयना — विलासी बिछाना
जातरुप —सोने
रजत — चांदी
पट्टी— मिळवणे
गहना —जबरजस्तीने घेणे
कायिक — शारिरीक
वाचिक — शाब्दीक
मानसिक — मनाची
फरुसवाचा — कठोर बोलने
सम्फपलाप — व्यर्थ बडबड करने
पिसुन — निंदानालस्ती
अभिज्झा — लोभ
व्यापज्झा — व्देश
मिच्छादस्सना — मोह
व्यापाद — व्देश
******************************************  
हि वंदना पुढे शेअर करा व  धम्म प्रसार करा....
******************************************

भारतीय सन्विधान निर्माता कोन

















आज काल लोकांच्या मनात सम्भ्रम राजकारनी मंडळी  करित आहेत आनी त्यांच टार्गेट आहे बहुजनांचे उद्धारक व घटनाकार डॉ .बाबासाहेब आंबेडकर .
जे म्हणतात कि घटना काय एकट्या डाँ बाबासाहेब आंबेडकारांनी लिहली काय?
त्याच्यांसाठि हे उत्तर :-
भारताचे संविधान तयार करण्यासाठी जी मसुदा समिती नेमण्यात आली होती त्यात सात सदस्य होते घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी नेमलेल्या लेखन समितीचे एक सभासद टी.टी. कृष्णाम्माचारी यांनी
घटना समितीत 5 नोव्हेँबर 1948 रोजी एकभाषण दिले त्यात ते म्हणतात ,
सभागृहाला कदाचित माहित असेल आपण घटना मसुदा समितिवर निवडलेल्या सात सदस्यापैकी एकाने राजीनामा दिला त्याची जागा भरण्यात आली नाहि एक सदस्य मृत्यु पावला त्याचीही जागा रिकामीच राहिली एक सदस्य अमेरीकेस गेले त्यांचीही जागा तशीच राहिली चौथे सभासद संस्थानिकाच्या संबधित कामात गुंतलेले राहिले.त्यामुळे ते सभासद असुनहि नसल्यासारखेच होते एक दोन सभासद दिल्लीपासुन खुप दुर
राहत होते त्यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे तेहि उपस्थित राहु शकत नव्हते शेवटी झाले असे कि घटना तयार करण्याचा सर्व भार एकट्या डाँ आंबेडकरांवर येऊन पडला अशा स्थितीत त्यांनी ज्या पद्धतीने ते कार्य पार पाडले त्याबद्दल ते निसंशय आदरास आणि सन्मानास पात्र आहेत अशा या अनंत अडचणीतुनही मार्ग
काढुन त्यांनी हे महत्तम कार्य पार पाडले. त्याबद्दल आपण सदैव आपण त्यांचे ऋणी राहु म्हणुन घटनेच्या शिल्पकारांचा मान त्यांच्या एकट्याचाच आहे...


बाबासाहेबांना दिलेल्या उपमा तथा उपाध्या




जगातील सर्व श्रेष्ठ उपमा व उपाध्या एवढया मोठया प्रमाणात फक्त एकाच व्यक्तिच्या नांवापुढे आहेत   आणि  ते म्हणजे फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकरांना .
त्यातिल काही पुढीलप्रमाने आहेत...
    
⇛बोधीसत्व- बुद्धत्व प्राप्त करणारा,बौद्धीक ज्ञान मिळवणारा.
⇛प्रज्ञा सूर्य-जगातील सर्वश्रेष्ठ शैक्षणीक पात्रता मी मिळवणारा
महामानव-मानवातील असामान्य मानव, महान व्यक्ति.
क्रान्तिसूर्य-जगातील क्रांति घडविणा-या क्रांतिकारी मानवातील सर्वात श्रेष्ठ
घटनाकार-जगातील सर्वात श्रेष्ठ भारताची घटना लिहून लोकशाहित्व सीद्ध करणारा.
प्रकांड विद्वान-जगातील सर्वात विद्वान व विद्ववता मीळवना-या व्यक्तितिल नंबर 1 विद्वान्
शीलवान-संस्कारीक, शुद्ध, निस्वार्थ विश्वाप्रती चांगले आचरण ठेवणारा.
त्यागपुरुष-धनसंपत्ति, संसारसुख, सुखमय जीवन, शरीर,मोहाचा त्याग करणारा
दलित शोषित उद्धारक-मानव निर्मित धर्म जात एका वर्गा कडून दुस-या वर्गाचे शोषण  दलित गरीब शोषित पीङीत मानवाला मानवाकडून मुक्त करून त्यांचा उद्धार करणारा
राष्ट्रपिता-खरा राष्ट्र प्रेमी,स्वातंत्र मिळवण्यासाठी स्वत्तःचीही पर्वा न करता  ब्रिटिश्यांबरोबर त्यांच्याच देशात त्यांच्याशी लढ़त देणारा एकमेव योद्धा.
महापुरुष-जगात कार्य सिद्ध करून सम्राज्याच्या हिताकरिता आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करणारा महान असा महापुरुष.
धर्मनिष्ठ-इतर कोणत्याही धर्माशी तडजोड न करता मानव जीवन प्रणाली त्यावरील सिद्धान्त असा गौतम बुद्धांचा धम्म स्वीकारणारा एकमेव धर्मनिष्ठ.
भारतरत्न-भारतातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार मिळालेला
महासूर्य-सुर्यालाही लाजवेल असा स्वयं प्रकाशातून मानवाला आंधारातुन प्रकाशाकडे नेणारा महाकाय सुर्य.
महापरिनिर्वाण-ह्या जगात स्वतःच निर्वाणपद निवडणा-या दोनच व्यक्ति आहेत,एक भगवान गौतम बुद्ध
आणि दुसरे बाबासाहेब,
धम्मदीप
बाबासाहेब, स्त्रीउद्धारक, अर्थतज्ञ, कायदेपंडीत, भारत भाग्य विधाता, साहित्यीक
अशा अनेक उपाधिन्नी
डॉ. बाबासाहेब आंबेडकराना संबोधतात, कारण बाबासाहेबांनी त्यांच पूर्ण आयुष्य, राष्ट्रसेवा, समाज कल्याणाकरिता मानवाच्या हिताकरिता अर्पण केले.
आयुष्यभर एखाद्या तूफानी वादळ। सारखे लढत राहीले.
म्हणून त्यांना वादळ वारा ही सुद्धा उपमा दिली आहे.
                            माझे हे आयुष्य  बासाहेबांच्या विचारांना समर्पीत
जय भीम! नमो बुद्धाय!  जय भारत!